सध्या बॉलीवूडमध्ये गुडन्यूचा जणू सीझन सुरु आहे. नुकतीच दिया मिर्झाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि आता प्रीती झिटांही आई होणार असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. पापाराझीनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये प्रीती झिंटा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. जो ड्रेसपाहून आणि तिच्याकडे पाहू लोकांनी ती आई होणार असल्याची चर्चा सुरु केली आहे. पण या बातमीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. प्रीती खरंच आई होणार आहे की नाही हे कळू शकलेले नाही. पण नेटीझन्सने मात्र या फोटोवर धूम माजवून दिली आहे.
सप्तरंगी स्विमसूटमधल्या जान्हवीच्या अदा, मालदिव्ज वेकेशनचे फोटो व्हायरल
हा तर काळा ड्रेस गोड बातमीचा
पापाराझींनी प्रीतीन झिंटाला ऋतिक रोशनच्या घरबाहेर स्पॉट केले होते. त्यावेळी ती काळ्या रंगाच्या पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली होती. पोल्का डॉट ड्रेस आणि प्रेग्नंसी न्यूज यांंचं एक सेलिब्रिटी कनेक्शन नक्कीच आहे. अशाच प्रकारचा काळा ड्रेस हा अनुष्का शर्माने देखील घातला होता. हा ड्रेस घालूनच तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली होती. आता प्रीती झिंटा हा ड्रेस घालून स्पॉट झाल्यामुळे अनेकांनी हा तर प्रेग्नंसी ड्रेस असल्याचे सांगितले.या फोटोखालीच खूप जणांनी कमेंट देत प्रीती झिंटाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल होत आहे की, प्रीतीच्या प्रेग्नंसीची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे.
या आधीही प्रेग्नंसीची चर्चा
प्रीती झिंटाचा खूप आधीही एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती थोडी जाड दिसली होती.त्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा होत होती. पण नंतर या फोटोचा अँगल हा चुकिचा असल्यामुळेच ती यामध्ये जाड असल्याची दिसली. त्यामुळे तिच्या फॅन्सची निराशा झाली. आताही हा फोटो आणि केवळ ड्रेसमुळे हा अंदाज केला जात असल्याचे देखील काही जण म्हणत आहे. याआधी नताशा स्टेनकोविक आणि अनुष्का शर्माने अशाच पद्धतीने पोल्का ड्रेस घातला होता. त्यामुळे हा पोल्का डॉट असल्यामुळेच प्रेग्नंसीची चर्चा होऊ लागली आहे.
सप्तरंगी स्विमसूटमधल्या जान्हवीच्या अदा, मालदिव्ज वेकेशनचे फोटो व्हायरल
अमेरिकनशी केले लग्न
प्रीती झिंटाने अमेरिकन मुलाशी लग्न केले असून 2016 साली ती विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर ती देशात फार कमी वेळासाठी असते. पण सध्या ती भारतात परतली असून तिचे काही फोटो व्हायरल झाले आहे. लग्नानंतर प्रीती झिंटा फार काही चित्रपटा दिसली नाही. तिने बॉलीवूडला जणू रामरामच ठोकला आहे. तिच्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहे. बॉलीवूडच्या सगळ्या कलाकारांसोबत तिने काम केले असून वीर- जारा हा तिचा खूप गाजलेला चित्रपट… पण या सोबतच तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
तुमच्यामुळे कोरोना वाढतोय, राखीने दिला सज्जड दम
आता प्रीती खरंच आई होणार की उगाचच तिच्या या नव्या फोटोमुळे तिच्या प्रेग्नंसीची चर्चा होत आहे का? आणि जर प्रीती खरंच आई होणार असेल तर ती लवकरच आई होणार असल्याचे तिच्या सोशल मीडियावरुन सांगेल अशी अपेक्षा आहे.