अकाली डिम्बग्रंथि अपुरेपणा (POI) किंवा अकाली डिम्बग्रंथि (Ovaries) अपयश (POF) तेव्हा घडते जेव्हा स्त्री 40 वर्षांची होण्यापूर्वीच अंडाशय योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अशा समस्येने ग्रासलेल्या स्त्रिया इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स तयार करू शकत नाहीत किंवा अंडी सोडू शकत नाहीत आणि यामुळे वंध्यत्व येऊ शकते त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे मासिक पाळीची अनुपस्थिती, गर्भवती होण्यास असमर्थता, योनिमार्गातील कोरडेपणा, सतत चिडचिड होणे आणि रात्री घाम येणे अशी आहेत. दर आठवड्याला ४० पैकी ७ ते ८ रुग्ण अकाली डिम्बग्रंथि निकामी झालेले आढळत असल्याची प्रतिक्रिया डॉ. निशा पानसरे, प्रजनन सल्लागार, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी व्यक्त केली.
स्त्रीचे अंडाशय चाळीशीच्या आधी काम करणे थांबवतात
जेव्हा स्त्रीचे अंडाशय चाळीशीच्या आधी काम करणे थांबवतात, तेव्हा तिला अकाली डिम्बग्रंथि अपुरेपणा यासाखी समस्या भेडसावू शकते. प्रजाईल एक्स सिंड्रोम सारखे अनुवांशिक विकार, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीसारखे कर्करोगाचे उपचार घेणे, संसर्ग आणि ऑटोइम्यून रोग ही या स्थितीमागील काही कारणे आहेत. वय, कौटुंबिक इतिहास आणि मागील डिम्बग्रंथि शस्त्रक्रिया या स्थितीशी संबंधित काही जोखीम घटक आहेत. आम्ही सुमारे 3-4 प्रकरणे अशी पाहिली आहेत ज्यांचा वयोगट सुमारे 25 ते 30 वर्षे असून चुकीच्या जीवनशैलीमुळे या स्त्रियांमध्ये अशा समस्या आढळून आल्या आहेत असे डॉ. प्रितिका शेट्टी, सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल खराडी यांनी स्पष्ट केले.
अशा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढवते
डॉ. प्रितिका पुढे सांगतात की या स्थितीचे निदान करण्यासाठी स्त्रीचा इतिहास आणि विशिष्ट रक्त संप्रेरक चाचण्या (फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन [एफएसएच], इस्ट्रोजेन आणि अँटीम्युलेरियन पातळी) विचारात घेतल्या जातात. या स्थितीची अनुवांशिक कारणे तपासण्यासाठी क्रोमोसोमल विश्लेषण आणि फ्रजाईल एक्स सिंड्रोम उत्परिवर्तन (FMR1) तपासण्यात येते. अशा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढवते. हार्मोन इस्ट्रोजेनच्या कमी पातळीमुळे नैराश्य, तणाव, हृदयासंबंधीत समस्या आणि चिंता निर्माण होतात. तुमची मासिक पाळी चुकली असेल, थायरॉईडची समस्या असेल, कौटुंबिक इतिहास असेल किंवा तुम्ही कर्करोगाचे उपचार घेत असाल तर तज्ञांना भेटा. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असलेली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. ज्या स्त्रिया गरोदर होऊ इच्छितात आणि वंध्यत्वामुळे गर्भधारणा करू शकत नाहीत त्या दात्याची अंडी किंवा आयव्हीएफ उपचार घेऊ शकतात. दीर्घकाळात, डिम्बग्रंथि संप्रेरकांचे नुकसान, प्रामुख्याने इस्ट्रोजेन ऑस्टियोपोरोसिसला आमंत्रण देतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या आणि रोज व्यायाम करा असा सल्ला डॉ. निशा यांनी दिला.
यासाठी तुम्ही साधारणतः तिशीनंतर नित्यनियमाने तुमचे फुल बॉडी चेकअप करणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच तुम्ही नियमित तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून आपल्या शरीराची तपासणी करायला हवी. आजकाल वाढते प्रदूषण आणि योग्य आहार नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच यामध्ये लक्ष घालायला हवे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक