ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘प्रेमवारी’त चिन्मय उदगीकर साकारणार प्रमुख भूमिका

‘प्रेमवारी’त चिन्मय उदगीकर साकारणार प्रमुख भूमिका

प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी प्रेमात पडतोच. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे असल्याने प्रेमाला अधिकच उधाण येतं. जगात दर व्हॅलेंटाईन डेला निरनिराळ्या व्यक्तींच्या प्रेमात नव्याने पडणारे महाभाग देखील आहेत. त्यामुळे फेब्रुवारी हा महिना जगभरात प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून साजरा  केला जातो. सहाजिकच या काळात सिनेसृष्टीत अनेक प्रेमपट निर्माण होत असतात. मराठी चित्रपटसृष्टीदेखील प्रेमपट तयार करण्यात मुळीच मागे नाही. फेब्रुवारीत अनेक मराठी प्रेमपट येत आहेत. त्यापैकी साईममित प्रॉडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ चित्रपट आठ फेब्रुवारीत प्रदर्शित होतोय. खरंतर प्रेम ही एक अद्भूत गोष्ट आहे. शब्दातून न मांडताही केवळ भावनेतून व्यक्त होऊ शकणारी एक अनामिक आणि व्यापक गोष्ट म्हणजे प्रेम. कधीकधी या भावनेला न दिसणारे अनेक कंगोरे असतात. त्यामुळे प्रत्येक प्रेमकथा ही वेगळी असते. प्रेमाचे असेच विविध पैलू प्रेमवारी चित्रपटातून उलगडले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधील संवाद आणि अॅक्शनवरुन हा चित्रपट नक्कीच वेगळा असेल यात शंका नाही.

प्रेमवारीमध्ये चिन्मय आणि मयुरी यांची प्रमुख भूमिका

कॉलेज जीवन आणि त्यातून फुलणारं हळूवार प्रेम ‘प्रेमवारी’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत चिन्मय उदगीकर आणि मयुरी कापडणे ही नवी जोडी दिसणार आहे. मयुरी कापडणे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने एक फ्रेश चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. चिन्मय उदगीकरला देखील आपण बऱ्याच दिवसांनी चित्रपटातून पु्न्हा पाहणार आहोत. चिन्मयने यापूर्वी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमधून काम केले आहे. सध्या ‘घाडगे अॅंड सून’ मधील चिन्मयची भूमिका प्रेक्षकांच्या पंसतीस पडत आहे. या मालिकेत चिन्मय ‘अक्षय घाडगे’ ही भूमिका साकारत आहे. तसंच काही महिन्यांपूर्वी संपलेल्या ‘स्वप्नांच्या पलीकडे’ आणि ‘नांदा सौख्यभरे’मध्ये या मालिकांमधून चिन्मयला खऱ्या अर्थांने लोकप्रियता मिळाली. प्रेमवारीमध्ये अभिनेता अभिजीत चव्हाणदेखील एका महत्वाच्या भूमिकेतून दिसणार आहे. राजेंद्र कचरू गायकवाड या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि निर्मितीदेखील त्यांचीच आहे. अमितराज यांनी प्रेमवारी चित्रपटाला संगीत दिलं आहे.

chinmay u

ADVERTISEMENT

फेब्रुवारीत वाहणार प्रेमाचे वारे

फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे या काळात प्रेमावर आधारित अनेक चित्रपट निर्माण होत असतात. तसंच कॉलेज जीवन आणि प्रेम याचांदेखील घनिष्ठ संबंध आहे. कॉलेज डायरी आणि युथट्यूब हे तरुणांच्या जीवनावर आणि प्रेमकथेवर आधारित चित्रपटदेखील फेब्रुवारीत प्रदर्शित होत आहेत. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्स फिल्मक्राफ्ट्स प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ हा मराठी चित्रपट 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित आणि मिरॅकल्स फिल्म निर्मित ‘युथट्युब’ चित्रपट 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहेत. हे तिन्ही चित्रपट तरुणाई आणि प्रेमकथा यावर आधारित आहेत. त्यामुळे येत्या फेब्रुवारीला या तीन चित्रपटातून नेमकं काय तरुणपिढीला गवसणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

premvari 1

अधिक वाचा:

ADVERTISEMENT

शिल्पा देशपांडेच्या ‘या’ प्रेमगीताने साजरा करा यंदाचा Valentine Day

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी

संवेदनशील विषयासह ‘युथट्युब’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT
17 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT