प्रियांका आणि निकचे काल ख्रिश्चन पध्दतीने लग्न लागले. आज म्हणजेच 2 डिसेंबरला त्यांचं हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न लागणार आहे अशा बातम्या येत होत्या मात्र त्याबाबत काही अधिकृत माहिती आजून हाती लागली नाही.
पण हो तिच्या मेंदी आणि संगीत फंक्शनचे फोटोज् पाहून प्रियांकाच्या चाहत्यांचा जीव काहीसा भांड्यात पडला आहे.प्रियांका आणि नीकसह सगळ्या कुटुंबाने संगीत फंक्शन एंजॉय केलं. सगळेचजण उत्साहानं सहभागी झाले होते. यावेळी प्रियांका आणि तिच्या आईचा डान्स परफॉरमन्स स्पेशल होता, असं सुत्रांकडून कळलं आहे.
आता आपली प्रियांका चोप्रा काही साधीसुधी सेलिब्रिटी थोडीच राहिलीए. तिची किर्ती अगदी सातासमुद्रांपलिकडे पोहचलीए. जगभर तिचे चाहते आहेत. त्यात ती आता अमेरिकेची सूनही झाली, त्यामुळे काही विचारायलाच नको बाबा.. अवघ्या जगाच्या नजरा प्रिनीकच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहात असतानाच, अमेरिकेतील प्रसिध्द मासिक VOGUE ने त्यांचा अजून एक व्हीडिओ Instagramवर पोस्ट केलाय. त्यात दोघांना त्यांच्या आवडी-निवडींबाबत काही प्रश्न विचारले आहेत. त्यातला एक भाग काल आम्ही तुम्हाला दाखवलाच होता. आता पुढे काय प्रश्न विचारले आणि त्या दोघांनी काय उत्तर दिलं ते तुम्हीच पहा…
व्हीडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा.
VOGUE INSTAGRAM VIDEO TELLING ABOUT CHEMISTRY BETWEEN PRINIC
आहे की नाही गंमत… प्रिनीकच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर Vogue मासिकाच्या अधिकृत पेजवर त्यांच्या चाहत्यांसाठी काही न काही एक्सक्लुझिव्ह पोस्ट होताना दिसतंय. POPxo ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवण्याचा प्रयत्नात आहेच.