आपल्या केवळ नजरेनेच अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारीयर (Priya Prakash Varrier) आणखी एका व्हिडीओमुळे सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे आधीच तिच्या नजरेची जादू चालविणारा म्हणजेच ‘डोळा मारताना’ असलेला एक दिलखेचक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही सेंकदातच प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे प्रियाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. शिवाय तिला ‘व्हायरल गर्ल’ या नावानेही प्रसिद्धी मिळाली होती. आता या व्हायरल गर्लचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल गर्लचा नवा व्हिडीओ
या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डे आधीही प्रियाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. या व्हॅलेंटाईन डे ला प्रियाचा ‘ओरू अदार लव्ह’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ‘किसींग सीन’ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. या सीनमध्ये प्रिया सहकलाकार रोशन अब्दुल रऊफला किस करताना दिसत आहे. प्रियाच्या या लिपलॉक सीनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवाय या चित्रपटातील ‘फ्रीक पिल्ला’ हे गाणंही युट्यूबवर खूप ट्रेंड होत आहे. सर्वात आधी हे गाणं मल्याळम मध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. मात्र मल्याळमपेक्षा तेलुगू गाण्याला जास्त प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये प्रिया प्रकाश आणि रोशन शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसत असल्यामुळे या गाण्याला संमिश्र प्रतिक्रियाही मिळत आहेत. काहीजण या व्हिडीओला लाईक करत आहेत तर काहीजण निगेटीव्ह कमेंट्सही देत आहेत.
श्रीदेवी बंगलो मधून प्रिया प्रकाश बॉलीवूडमध्ये करतेय पदार्पण
सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्तेचा विषय ठरणारी प्रिया प्रकाश ‘श्रीदेवी बंगलो‘ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या टीझर वरून वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाच्या टीझरमधील एक दृश्य आणि दिवंगत अभिनेत्री यांचा अपघाती मृत्यू यांच्यात साम्य असल्याने बोनी कपूर यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. यामध्ये बाथटबमधील एक सीन दाखवण्यात आला होता जो श्रीदेवीच्या मृत्यूशी निगडीत असल्यासारखे वाटत आहे. मात्र नंतर या चित्रपटाचं केवळ नाव श्रीदेवींच्या या नावाशी मिळतंजुळतं असून त्यात केवळ प्रियाच्या भूमिकेचं नाव ‘श्रीदेवी’ आहे असं सांगण्यात आलंय. शिवाय या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनाशी निगडीत कोणतीही गोष्ट समान नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं.
अधिक वाचा
आता हा ट्रेलर नक्कीच लावेल तु्मच्या ‘डोक्याला शॉट’
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम