ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रियंका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, शेअर केल्या सुंदर आठवणी

प्रियंका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, शेअर केल्या सुंदर आठवणी

बॉलीवूड ते हॉलीवूड असा यशस्वी अभिनय प्रवास करत पुढे अभिनेत्री प्रियांका चोप्नाने तिचा चक्क संसारच हॉलीवूडमध्ये थाटला. दोन वर्षांपूर्वी 2 डिसेंबर 2018 रोजी अमेरिकेतील प्रसिद्ध गायक निक जोनस यांच्याशी विवाह करून ती अमेरिकेत सेटलदेखील झाली. प्रियांका आणि निक जोनसचा विवाह अगदी शाही थाटामाटात भारतात पार पडला होता. ज्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा तेव्हाही खूपच रंगली होती. आता त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करताना प्रियांकाने तिच्या लग्नातील काही खास आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रियांकाने जागवल्या विवाहसोहळ्याच्या आठवणी –

लग्नाचा काळ हा प्रत्येकासाठीच सुखावह आणि आयुष्यभर लक्षात राहील असा असतो. प्रियांकानेही तिच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा आनंद साजरा करताना या आठवणींना खास उजाळा दिला आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाचे स्पेशल फोटो शेअर केले आहेत आणि त्याला कॅप्शन दिली आहे की ,” दोन वर्षे पार पडली आणखी अनेक वर्षे येणं बाकी आहे” प्रियांका लग्नानंतर अमेरिकेत सेटल झाली असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या भारतीय चाहत्यांशी सतत संपर्कात असते. या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील खाजगी गोष्टीदेखील बऱ्याचदा चाहत्यांसोबत शेअर करते. प्रियांकाने आता तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. शिवाय हे फोटो पाहून ज्यांनी प्रियांकाच्या लग्नात हजेरी लावली होती अथवा ज्यांना प्रियांकाच्या लग्नामुळे आनंद झाला होता त्यांना या आठवणी पुन्हा एकदा जागवत्या आल्या.

प्रियांकाच्या लग्नाचे काही खास क्षण –

प्रियांका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाचे विधी ते अगदी तीन वेळा केलेल्या रिसेप्शनपर्यंत आठवडाभर लग्नाचा धूमधडाका सुरू होता. सहाजिकच अशा थाटामाटात झालेल्या लग्नाच्या आठवणी कुणी सहज विसरू शकत नाही. त्यामुळे निक आणि प्रियांकाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेटस् चा पाऊस पाडला आहे. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये एकूण पाच फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती निकसोबत रोमॅन्स करताना दिसत आहे. यातील दोन फोटोजमध्ये तिने तिचा पारंपरिक वेशभूषेतील लाल रंगाचा लेंगा घातलेला आहे आणि निकने गोल्डन रंगाची पारंपरिक शेरवानी आणि पगडी घातली आहे. सर्वात शेवटच्या फोटोमध्ये त्याच्या वरमाला घालतानाचा एक सुंदर क्षण टिपलेला आहे. ज्यामुळे लग्नात त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आणि नातेवाईकांचा आनंद सहज दिसून येत आहे. निक प्रियांकापेक्षा वयाने लगान अससून त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्या नात्यातील वीण किती घट्ट आहे हे नक्कीच दिसून येतं. चाहत्यांना आता प्रियांका आणि निकच्या बाळाची उत्सुकता लागली आहे. मागे चुकीच्या पद्धतीने फोटो काढल्यामुळे प्रियांका गरोदर असल्याची अफवा पसरली होती. मात्र आता ते दोघं वैवाहिक जीवनात नक्कीच सेटल झाले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्याकडून गुडन्यूज येण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

ADVERTISEMENT

रूबिना दिलैकचा अभिनवसह नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, घटस्फोट घेण्याचा केला होता विचार

रोहमन शॉलने अशा प्रकारे व्यक्त केलं प्रेम, काढला सुश्मिताच्या नावाचा टॅटू

02 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT