ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
प्रियंका चोप्राने सोशल मीडिया अकाउंटवरून का काढलं जोनस आडनाव

प्रियंका चोप्राने सोशल मीडिया अकाउंटवरून का काढलं जोनस आडनाव

अभिनेत्री प्रियंका चो्प्रा आणि निक जोनस लग्नानंतर नेहमीच चर्चेत असतात. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियंका आणि निकचे धुमधडाक्यात लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांना एकत्र पाहणं चाहत्यांना खूप आवडू लागलं. लग्नानंतर प्रियंका निकच्या घरी अमेरिकेत सेटल झाली. त्यामुळे बॉलीवूड चाहत्यांपासून काहिशी दुरावली असली तरी प्रियंका तिच्याआणि निकच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. लग्नानंतर प्रियंकाने चक्क तिच्या नावापुढे चोप्राजोनस असं आडनाव लावण्यास सुरूवात केली होती. पण आता प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जोनस आडनाव काढून टाकलं आहे. ज्यामुळे प्रियंका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आलिया भट झाली ट्रोल, कारण ऐकून व्हाल हैराण

खरंच प्रियंका आणि निकच्या नात्यात आलाय का दुरावा

प्रियंकाने जेव्हा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जोनस आडनाव काढून टाकले तेव्हाच तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहिंनी कंमेट शेअर केली आहे की, प्रियंका चोप्रा निकसोबत घटस्फोट घेत आहे का? तर काहिंनी शेअर केलं आहे की, प्रियंकाची हा घटस्फोटबाबत सांगण्याची नवीन स्टाईल असेल. अशा सर्व प्रतिक्रियांमुळे प्रियंका आणि निकचे नाते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

देवमाणूस पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ADVERTISEMENT

काय आहे सत्य 

प्रियंकाने तिच्या नावामधून जोनस आडनाव काढून टाकल्यामुळे काहींना अनेक प्रश्न पडले आहेत तर काहींना चिंता वाटू लागली आहे. कारण प्रियंकाने लग्नानंतर लगेच एवढ्या प्रेमाने निकचे आडनाव स्वतःच्या नावापुढे जोडले होते. पण आता तिने कोणतेही कारण न देता अचानक जोनस आडनाव नावापुढून काढून टाकले आहे. असं तेव्हाच केलं जाऊ शकतं जेव्हा पतीपत्नीच्या नात्यात काही कारणांनी दुरावा आला असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत प्रियंकाची आई मधु चोप्राने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. कारण सध्या प्रियंका आणि निक त्यांच्या नव्या घरात सुखाने संसार करत आहेत. पण असं असलं तरी प्रियंकाने तिच्या नावासमोर असलेलं निकचं जोनस आडनाव का काढून टाकलं याचा खुलासा मात्र अजूनही झालेला नाही. 

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ झाली एलिमिनेट

23 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT