ADVERTISEMENT
home / मनोरंजन
chandramukhi

प्रियांका चोप्रावरही चालली चंद्रमुखीची जादू, कौतुक करून दिल्या शुभेच्छा

अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या, अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकच्या आगामी ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच, आकर्षक कथानकासाठी व आदिनाथ कोठारे व अमृता खानविलकर यांच्या विलक्षण अभिनयासाठी इंटरनेटवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मराठमोळ्या चंद्रमुखीची ख्याती पार अमेरिकेपर्यंत जाऊन पोचली आहे. चक्क बॉलिवूड दिवा प्रियांका चोप्राला देखील चंद्रमुखीची भुरळ पडली आहे. चंद्रमुखीने तिच्यावरही जादू केली आहे. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘चंद्रमुखी’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील स्टोरीवर चक्क चंद्रमुखीचे पोस्टरही शेअर केले आणि लिहिले की, “ अभिनंदन..#आदिनाथ कोठारे ..29 एप्रिल, 2022 रोजी #चंद्रमुखी पहा.”

बॉलिवूडच्या इतर दिग्गजांनीही दिल्या अमृताला शुभेच्छा 

अलीकडेच बॉलिवूडची धक धक गर्ल, उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित नेने हिनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांना शुभेच्छा संदेश शेअर केला. माधुरीने चंद्रमुखीसाठी अमृताला खास शुभेच्छा दिल्या होत्या. माधुरीनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘चंद्रमुखी’चा ट्रेलर शेअर केला होता आणि लिहिले होते की, “किती मनोरंजक ट्रेलर!! ‘चंद्रमुखी’ नक्कीच माझ्या वॉचलिस्टमध्ये आहे.” माधुरीने तिच्या ट्विटर हँडलवर देखील चंद्रमुखीचा उल्लेख करत चंद्रमुखीच्या टीमला प्रोत्साहन दिले. माधुरीने तिच्या ट्विटरवर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विट केले की, “प्रिय @adinathkothare @AmrutaOfficialK #चंद्रमुखीला खूप प्रेम आणि शुभेच्छा. चंद्रमुखी बघण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. @PlanetMarathi #ChandramukhiTrailer.”

रितेश देशमुखनेही केले ट्विट 

‘चंद्रमुखी’ या आगामी चित्रपटावर सध्या सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंस्टाग्रामवर चंद्रमुखीच्या गाण्यांची चर्चा आहे, त्यावर लोक रील्स बनवून शेअर करत आहेत. चंद्रा या गाण्यावर अनेक लोक अमृताच्या स्टेप्स करून रील्स बनवत आहेत. चंद्रमुखीच्या ट्रेलरवर बॉलिवूडमधील ताऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. माधुरी दीक्षित नेने, प्रियांका चोप्रा जोनास यांच्याप्रमाणे रितेश देशमुखनेही प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. रितेशने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘चंद्रमुखी’चा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “महान मराठी म्युझिकल विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या प्रशंसनीय पुस्तकावर आधारित आहे. उत्कृष्ट संगीतकार @AjayAtulOnline अद्भूत प्रतिभावान टीम @prasadoak17 ‘चंद्रमुखी’ द्वारे तुमची मने जिंकण्यासाठी लवकरच येत आहेत.”

चंद्रमुखी – एक आगळीवेगळी करुण प्रेमकहाणी 

‘चंद्रमुखीचे कथानक हे लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित आहे.  राजकारण आणि तमाशा या दोन अतिशय भिन्न जगात वावरणाऱ्या दोन प्रेमी जीवांची ही एक करुण प्रेमकथा आहे. चंद्रमुखी मध्ये अमृता खानविलकर आणि अदिनाथ कोठारे हे मुख्य भूमिकेत आहेत आणि अनेक अजरामर गीते देणारी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यातील कर्णमधुर गाणी चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. प्रसाद ओक यांनी यापूर्वी ‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

ADVERTISEMENT

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशिओ फिल्म्स आणि क्रिएटिव्ह वायब प्रॉडक्शन निर्मित आणि फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट आणि लाइटवाइडन एंटरटेन्मेंट यांची सहनिर्मिती असलेला ‘चंद्रमुखी’ 29 एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होत आहे. यात मृण्मयी देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, समीर चौगुले आणि राजेंद्र शिसातकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT