ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण, फोटो झाला व्हायरल

प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण, फोटो झाला व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (Priyanka Chopra and Nick Jonas) यांनी नुकतीच लग्नाची दोन वर्ष पूर्ण केली आहेत. प्रियांका आणि निक दोघांनीही आपल्या लग्नातील फोटो पोस्ट करत जन्मभरासाठी असेच एकत्र राहू अशी इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे प्रियांकाच्या गुड न्यूजकडे (good news) नुकताच प्रियांका आणि निकचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका जाडी झाल्याचे दिसत असून कमेंट्समध्ये प्रत्येक जण प्रियांका गरोदर (rumours about priyanaka chopra pregnant) असल्याचा अंदाज वर्तवत आहे. दरम्यान प्रियांकाने सध्या कोणतेही तिचे नवे फोटो पोस्ट केले नसल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडे नाही काम, सोशल मीडियावरून केली कामाची मागणी

निक आणि प्रियांकाचा फोटो होतोय व्हायरल

निक आणि प्रियांका दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र सध्या प्रियांकाने आपले जास्त फोटो शेअर केलेले नाहीत. तर प्रियांका आणि निक फिरत असताना एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रियांका गरोदर असल्याचा अंदाज त्यांचे चाहते लावत आहेत. या फोटोवर आलेल्या प्रत्येक कमेंटमध्ये प्रियांका लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचे आम्हाला वाटत आहे अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स आहेत.  तसंच प्रियांकाच्या फोटोकडे पाहून प्रियांका खरंच गरोदर तर नाही ना असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. कारण  नेहमीपेक्षा प्रियांका खूपच वेगळी दिसत आहे. मुख्य म्हणजे प्रियांकाने  घातलेले कपडे आणि तिची शरीरयष्टी यामध्ये खूपच फरक दिसून आला आहे. नेहमीच्या तुलनेत प्रियांका जाडसर दिसून असून हा गरोदरपणाचा तर परिणाम नाही ना असाही प्रश्न नेटिझन्सना आता सतावत आहे. मात्र निक अथवा प्रियांकाने दोघांनीही याबाबत अजून कोणतीही घोषणा अथवा खुलासा केलेला नाही.  निक आणि प्रियांका दोघांनाही लहान मुलं आवडतात हे कितीतरी वेळा दोघांनी सांगितले पण आहे आणि फोटोंमधूनही दिसून येते. निकच्या पुतण्यांवर निक आणि प्रियांका दोघेही नेहमीच प्रेम करताना  दिसून येतात. त्यामुळे आता या दोघांनीही बाळाला जन्म देण्याचे मनावर घ्यायला हवे अशीच इच्छा त्यांच्या चाहत्यांचाही आहे. 

प्रियांका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, शेअर केल्या सुंदर आठवणी

ADVERTISEMENT

दोन वर्षांचा टप्पा पार

प्रियांका आणि निकने नुकताच दोन वर्षांचा लग्नाचा टप्पा पार केला आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी गरोदर आहेत आणि लॉकडाऊन  आणि या परिस्थितीत कदाचित मुलांना जास्त वेळ देता येईल याचा विचार करत त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे प्रियांकानेही असाच निर्णय तर घेतला नाही ना याची  सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय निक प्रियांकापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे आणि प्रियांकाचं  वयदेखील वाढत चाललं आहे त्यामुळे तिने वेळीच बाळाला जन्म द्यावा असंही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. आतापर्यंत अनेक वेळा प्रियांकाच्या गरोदरपणाच्या वावड्या  उठल्या आहेत. मात्र असं काहीही नसल्याचं तिने स्पष्ट केले होते. मात्र या फोटोनंतर अजून कोणतीही प्रतिक्रिया दोघांकडूनही आलेली नाही. त्यामुळे प्रियांकाकडे गुड न्यूज  असावी असाच अंदाज लावत चाहते मात्र खूष झाले आहेत. 

Bigg Boss 14 मधून राहुल वैद्य जाण्याची चर्चा, फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT