ADVERTISEMENT
home / Uncategorized
Propose day quotes in marathi

Propose Day Quotes In Marathi | प्रेम व्यक्त करण्यासाठी पाठवा प्रपोझ मेसेज

प्रेम करणे आणि व्यक्त करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहे. प्रेमाची भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे फार गरजेचे असते. प्रेमाची भावना व्यक्त करणे याला ‘प्रपोझ’ असे म्हटले जाते. पहिले प्रेम आणि प्रपोझ याच्याशी निगडीत अनेकांच्या आठवणी असतात. या आठवणी आठवल्या की, अंगावर प्रेमाचा काटा आल्यावाचून राहात नाही. एकूणच काय की, प्रेम व्यक्त करणे हे फार गरजेचे आहे. तुम्हीही कोणाला प्रपोझ करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनातील भावना अगदी बिनधास्त तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचवा.फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. कारण 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा या एकाच दिवशी नाही तर हल्ली व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत आहे. यामधील एक दिवस म्हणजे ‘प्रपोझ डे’ या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही कोणाला प्रपोझ करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आम्ही खास तुमच्यासाठी शोधून काढलेले प्रपोझ मेसेज पाठवू शकता आणि तुमचे प्रेम व्यक्त करु शकता.

Propose Day Quotes In Marathi | प्रपोझ डे कोट्स

Propose Day Quotes In Marathi

जर तुम्हाला काही हटके कोट्स तुमच्या प्रेमाला पाठवायचे असतील तर तुम्ही हे असे छान कोट्सही (Propose Day Quotes In Marathi ) शेअर करु शकता.

 1. असेन तुझा अपराधी
  फक्त एकच सजा कर
  मला तुझ्यात सामावून घे
  बाकी सगळं वजा कर
 2. स्पर्श तुझा व्हावा
  अन् देह माझा चुरावा
  हक्काने मिठीत तू घ्यावेस
  जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा
 3. प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास
  माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास
 4. हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
  तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे
 5. जे लाखातून एक असतात असं म्हणतात अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
  फक्त तू आहेस
 6. आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
  मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात
 7. पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता.
  पण आज कळलं प्रेमाची हीच जादू तर आहे
 8. प्रेम ही काळाची गरज आहे
  मला फक्त तुझीच साथ हवी आहे
  प्रपोझ डेच्या शुभेच्छा
 9. सोबत रोज असतो तरी का यावी तुला विचारण्याची वेळ
  आज दिवस आहे खास आता तरी देशील का आयुष्याचा तुझा सगळा वेळ
 10. तू मला मी तुला ओळखू लागलो
  प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो.
 11. तू सोबत राहावीस म्हणून मी काहीही करीन
  तुझ्यासाठी मी आतापासून कितीही वेळ काढीन
 12. मी देव माणूस नाही
  जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन
  पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे
  जो तुझी आयुष्यभर काळजी करेल
 13. प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
  आता अजून काय मागू
  तुझ्याशिवाय खास 
 14. दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
  आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
  मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे
 15. मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
  पहिली  मिठी, पहिलं किस
  पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
  शेवटच्या श्वासापर्यंत 
 16. प्रेमा तुझा रंग कोणता?
  म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसे देणार ना?
  प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
 17. हातात तुझा हात
  मला हवी फक्त तुझी साथ
  तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस 
 18. प्रेमा तुझा रंग कोणता?
  सांग पटकन मला म्हणजे
  माझ्या प्रेमाचा रंग देईन मी तिला
 19. तुझ्या माझ्या प्रेमाची व्याख्या कधीच ठरली नव्हती.
  तू सोबत होतील तो पर्यंत मला त्याची किंमत कळली नव्हती.
  पण मला आता तू माझ्यासोबत हवी आहेस
 20. तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
  तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
  पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही

व्हॅलेंटाईन डे हिंदी मध्ये कोट्स

Propose Day Messages In Marathi | प्रपोझ डेसाठी खास मेसेज

Propose Day Messages In Marathi
Propose Day Messages In Marathi

जर तुम्हाला प्रपोझ डे साठी थोडे मोठे पण वेगळे मेसेज पाठवायचे असतील तर तुम्ही हे काही मेसेज ही पाठवू शकता. एखाद्याला प्रपोझ करणे ही खरं तर खूपच भावनिकदृष्ट्या वेगळी प्रक्रिया असते. प्रेमात असणे हे एक वेगळंच फिलिंग आहे. त्यावेळी साहजिक माणूस खूपच भावनिक असतो. त्याला किंवा तिला प्रेमात पाडायचे असेल तर तुम्ही भावनिक संदेश पाठवूनही प्रेम व्यक्त करू शकता.

ADVERTISEMENT
 1. आज प्रेमाचा दिवस…
  तू माझं पहिलं प्रेम
  आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
  तुला गोड गोड शुभेच्छा!
 2. कसं सांगू तुला
  तूच समजून घेना
  तुझी खूप आठवण येते
  एकदा मिठीत घेऊन बघ ना
 3. तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
  आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे
  हॅप्पी प्रपोझ डे!
 4. प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
  प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
  प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
  आणि प्रेम म्हणजे… आनंद स्वच्छंदी!
 5. प्रेमाचं माहीत नाही
  पण तुझ्यासोबत आहे ते माात्र कोणासोबत नाही
 6. पापण्यात लपलेली तुझी नजर
  माझ्याकडे बघून लाजत आहे
  तुझ्या पायातील पैंजण जणू
  माझ्यासाठीच वाजत आहे
 7. खूप काही लपलेले होते त्या typingमध्ये
  जे तू मी आल्यावर पटकन Delete केले
  तू जे माझ्याबद्दल समजतोस/ समजतेस ते अगदी खरं आहे
 8. सांग पाहू, तुझं मन
  माझ्याकडे राहील
  कायमचं ते मन
  माझं होईल का?
 9. तुझ्यापासून सुरु होऊन
  तुझ्यातच संपलेला मी
  माझे मीपण हरवून
  तुझ्यात हरवलेला मी
 10. तू कितीही म्हणालीस नाही तरी
  जीव माझा तुझ्यासाठी
  कायमच राहणार पागल
 11. प्रेम काय आहे हे
  माहीत नाही मला पण
  ते तुझ्या इतकंच सुंदर
  असेल तर हवंय मला प्रत्येक जन्मी
 12. तुझ्या माझ्या प्रेमाला
  तुझी माझी ओढ
  थोडं तू पुढे ये
  थोडं मला मागे ओढ- प्रदीप वाघमारे
 13. एक थेंब अळवावरचा,
  मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
  एक थेंब तुझ्या ओठांवरचा
  माझं जग मोत्यांनी सजवतो
 14. आजकाल मला झोप पटकन येत नाही
  तुझ्या मिठीशिवाय ती कशाचीही ओढ लागत नाही
  द्यावीस तू साथ मला, आता मला तुझ्यावाचून करमत नाही
 15. सर्वात सुंदर वाक्य..
  माझं तुझ्यावर प्रेम आहे
  सर्वात दु:खद वाक्य माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे
  आता तरी माझ्या प्रेमाचा स्विकार कर!
 16. झोका पुन्हा घेईन
  उंच उंच भरारी तुझ्यासवे येईल
  तुझ्यामुळे प्रिया आयुष्याला नवी झळाळी येईल
 17. आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
  ज्याला मी तोडू शकत नाही
  आणि सोडूही शकत नाही
  कारण तोडले तर सुकून जाईल
  आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल
 18. खरंच सांगतो तुला तुझ्यावाचून आता मला करमत नाही
  आता तुझ्याशिवाय आयुष्य पुढे जगण्याची इच्छा नाही.
 19. साथ मला देशील का? माझी तू होशील का?
  आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का?
 20. नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो
  आता तू फक्त हा म्हण पुढचे माझे सगळे ठरले

वाचा – Happy Chocolate Day Quotes In Marathi

Propose Messages In Marathi | प्रपोझ डे मेसेज मराठी

Propose Messages In Marathi
Propose Messages In Marathi

तुम्ही प्रपोझ करायचे मनापासून ठरवले असेल तर असे काही मजेदार प्रपोझ डेचे मेसेजही तुमच्या जोडीदाराला पाठवून त्याला खुश करु शकता. 

 1. हाती हात देशील का
  जन्मभराची साथ देशील का
  सांग माझी होशील का?
  हॅपी प्रपोझ डे!
 2. आज मी शांत विचार केला
  आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
  आता विचार केला सांगून टाकावे तुला
  नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा
 3. प्रेम होईल याचा विचार केला नव्हता
  तुझ्याशी केली होती निखळ मैत्री
  मला  आता तू हवीस अजून नको कोणी
 4. चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम
  बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम
  आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ
 5. माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं,
  आता तुझी पाळी
  तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी
 6. गुलाबाच्या फुला,
  काय सांगू तुला
  आठवण येते मला
  कारण प्रेम झालयं मला
 7. मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही
  असंच असतं ग प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही
 8. मी प्रेम केलं ते एकदाचं केल
  तुझ्यावर झालं
  आणि कायम तुझ्यावरच राहील
 9. तुझ्या एका हास्यासाठी
  चंद्र सुद्धा जागतो
  रात्रभर तिष्ठत  बिचारा
  आभाळात थांबतो
 10. आकर्षण कदाचित एका दिवसाचं असेल
  पण मला ते रोज होतयं
  याचा अर्थ मला तुझ्यावर प्रेम होतयं
 11. होकार द्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे
  मरेपर्यंत साथ तुझी देईन हा शब्द माझा आहे
 12. बंध जुळले असता
  मनाचं नातंही जुळायला हवं
  अगदी स्पर्शातूनही
  सारं सारं कळायला हवं
  प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
 13. माझ्या प्रत्येक वेदनेचे कारण आहेस तू
  त्या सगळ्या वेदनांचे मलमही आहेस तू
  तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
  आता सोडून कुठेही जाऊ नकोस कारण जीवन माझे होईल व्यर्थ
 14. आयुष्यात मला हवी फक्त तुझी साथ
  तू नसशील तर लागेल माझ्या आयुष्याची पुरती वाट
  आता तरी हो म्हण आणि थाट माझ्यासोबत संसार
 15. विचार केला तुझ्यासाठी काहीतरी करावे खास
  नंतर विचार केला माझ्या मनातल्या भावना सांगून करावे तुझ्या मनासारखे खास
 16. काही माणसं आयुष्यात असतात
  ज्यांना तुमच्या भूतकाळाशी काहीच घेणंदेणं नसतं
  कारण त्यांना फक्त तुमच्या भविष्याचा भाग व्हायचं असतं
 17. नातं तुझं माझं असचं फुलत जावं.
  आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं
 18. घराचा नाही पण मला तुझ्या दिलासा भाडेकरु कर.. आनंद होईल
 19. प्रेम केलं तुझ्यावर कोणता गुन्हा नाही केला
  आज कबूल करतो काही प्लॅन नव्हता केला
 20. तुझ्या प्रेमाची ताकद मला देते अशी शक्ती
  की, मी होतो अशी एक चांगली व्यक्ती

Propose Day Status In Marathi | प्रपोझ डे स्टेटस

Propose Day Status In Marathi
Propose Day Status In Marathi

तुम्हाला प्रत्यक्ष सांगायला थोडा त्रास होतोय. थोडं स्पाईस अप करुन तुूम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर एखादे रोमँटिक स्टेटस (Propose Day Status In Marathi) ठेवा. ते तुम्ही कोणासाठी ठेवलं हे त्यानाच ओळखू द्या. 

 1. घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन मला तू स्वीकारशील का?
  आता तरी तू माझी./ माझा होशील का?
 2. जगून बघ माझ्यासाठी
  माझे प्रेम  हे नेहमी असे राहील
  फक्त तुझ्यासाठी!
 3. रोज तुला शब्दात
  शोधण्याचा प्रयत्न करतो
  पण शब्द लिहीत असताना
  मीच शब्दात हरवतो
 4. मी तुझ्यावर कधीपासून मरते
  आज या खास दिवशी मी तुझ्या प्रेमाचा स्विकार करते
 5. माझ्या ह्रदयाला कान लावून नीट ऐक
  जो एक आवाज तुझ्यासाठी सतत ओरडतोय
  त्याला फक्त तू हवी / हवा आहेस अजून कोणी नाही.
 6. तुला माहीत आहे का?
  मी या जगात सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करतो
  पहिला शब्द वाच तुला नक्की कळेल
 7. शब्दाविना कळावं
  मागितल्याशिवाय मिळावं
  धाग्याविना जुळावं
  स्पर्शावाचून ओळखावं
  तू माझं प्रेम
 8. प्रश्न पाण्याचा नाही,
  तहानाचा आहे
  प्रश्न मरणाचा नाही
  श्वासाचा आहे
  मित्र तर भरपूर आहेत
  आता प्रेमाची एक जागाच रिकामी आहे
  त्याला फक्त तुझी गरज आहे
 9. लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात रिकाम्या हाताने परतणार
  असं कसं शक्य आहे, जगात आलो आहे तर तुझं मन जिंकूनच राहणार
 10. खूप प्रेम करतो / करते तुझ्यावर एकदा हे सत्य जाणून बघ
  एकदा तरी तू मला आपले मानून बघ

Marathi Propose Charolya | प्रपोझ डे चारोळी

Marathi Propose Charolya
Marathi Propose Charolya

चारोळ्या या मनातील भावना अगदी कमीत कमी शब्दात मांडता येतात. त्यामुळे प्रेमासाठी प्रपोझ डेच्या निमित्ताने तुम्ही चारोळी पाठवायलाच हवी

ADVERTISEMENT
 1. लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
  प्रेम तुझं देशील का?
  थांबव हा आता खेळ सारा
  कायमची माझी होशील का?
  हॅपी प्रपोझ डे!
 2. एक होकार हवा
  बाकी काही नको
  बाकी काही नको
  फक्त नाही म्हणू नकोस- वैभव जोशी
 3. तुझ्या प्रेमाचा रंग तो..
  अजूनही बहरत आहे…
  शेवटच्या क्षणापर्यंत
  मी फक्त तुझी/ तुझा आहे
 4. विखुरलयं मी माझं प्रेम
  तुझ्या त्या सर्वच वाटांवरती
  लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर
  उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरती
 5. ह्रदयाच्या जवळ राहणारे
  कुणीतरी असावे
  असं तुला वाटतं नाही का
  तू मला निवडशील का?
  प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
 6. प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
  भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
  श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
  पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
 7. एक Promise माझ्याकडून,
  जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
  काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन
 8. एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही
  पण आठवतात मात्र रोज रोज
  अशांना प्रपोझ डेच्या शुभेच्छा!
 9. आज मी कसलाही विचार करणार नाही
  आज मी माझ्या भावना तुला सांगणार
  तुझ्या शिवाय माझे आयुष्य काहीच नाही
  आता तरी माझा स्विकार कर!
 10. मला तुला गमवायचे नाही
  ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचे आहे
  मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे.

तर हे काही मेसेज, कोट्स आम्ही तुमच्यासाठी इंटरनेटवरुन शोधून काढले आहेत. म्हणजे तुमचे कष्ट कमी होतील. हे कोणतेही मेसेज POPxo मराठीचे नाही. पण प्रत्येकाला क्रेडिट देण्यासाठी त्याचे लेखक माहीत नाही. त्यामुळे दिले नाहीत. पण प्रेमवीरांना त्यांचे मेसेज पटकन पाठवता यावे, इतकाच आमचा हेतू आहे. 

09 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT