टापटीपणा तुम्हाला आवडत असेल तर घर तुमच्याप्रमाणे राहावे असे नक्कीच तुम्हालाही वाटत असणार. ज्यांना स्वच्छता आवडते अशांना घर कायम सुगंधित असावे असे वाटते. मग घरी कोणी यायचे असो वा नसो घर कायम सुंगधी हवे असेल तर हल्ली बाजारात छान सुगंधित असे डिफ्युजर (Diffuser Sets)मिळतात. ज्यामुळे तुमच्या घरात कायम सुगंध दरवळत राहतो. पण घरासाठी योग्य असे कोणते डिफ्युजर वापरायला हवे असा विचार करत असाल तर आम्ही खास तुमच्यासाठी निवडक असे डिफ्युजर शोधून काढले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील. तुमचा प्रत्येक क्षण त्यामुळे सुगंधी जाईल.
डिफ्युजर कसे करते काम
पूर्वीच्या काळी कापूर, धूप जाळणे असे व्हायचे. त्यामुळे घरात तो सुगंध छान भरुन राहायचा. घरात एकदम पवित्र, शुद्ध असे वातावरण असायचे. पण आताच्या घरांमध्ये फायर अलार्म (Fire Alarm) असतात. ज्यामुळे खूप जण धूप लावणे किंवा कापूर पेटवणे टाळतता. त्यामुळे स्प्रे शिवाय काहीही पर्याय नसतो. खूप जणांकडे घरात वापरण्यासाठी स्प्रे असतात. पण ते फारच क्षणिक असतात. एका फवाऱ्यात जितके शक्य असेल तितकाच त्याचा सुगंध काही काळासाठी पसरतो. पण खिडकी उघडी असेल किंवा दरवाजा तर अशावेळी तो सुगंध पटकन निघून जातो. त्याला पर्यायच असतात ते म्हणजे डिफ्युजर. तुमच्या घरात चोवीस तास सुगंध टिकून राहण्यासाठी ते मदत करतात. यामध्ये इसेन्शिअल ऑईल्स असते त्यामुळे ते शरीरासाठीही हानिकारक नसतात. त्यामुळे छान प्रसन्न वाटते.
तुमच्यासाठी निवडा उत्तम असे डिफ्युजर
आता तुम्ही डिफ्युजर शोधत असाल तर तुमच्यासाठी काही ऑर्गेनिक अशा डिफ्युजरची निवड केली आहे. ते तुमचे घर सुगंधी करु शकतील.
LAVENDER & ROSE ESSENTIAL OILS WITH SMART MIN-E-DIFFUSER – COMBO
लव्हेंडर आणि गुलाबाच्या इसेन्सनी युक्त असे हे डिफ्युजर तुमच्या घरात दिवसभर फुलाचा सुंगध दरवळण्यास मदत करेल. लव्हेंडर आणि गुलाबाचा सुगंध हा गोड वाटतो. त्यामुळे घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवल्यावर त्याचा मस्त सुगंध दरवळतो. हे डिफ्युजर आकाराने लहान असल्यामुळे ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येते.
LEMON & ROSEMARY ESSENTIAL OILS WITH CERAMIC DIFFUSER – COMBO
लिंबाचा सुगंध हा कधीही रिफ्रेशिंग असतो. रिफ्रेशिंग असण्याबरोबरच यामुळे घरात स्वच्छ स्वच्छ असल्यासारखे वाटते. हा देखील ई- कॉम्बो सेट असून तो कॅरी करणे सोपे असते. लिंबू आणि रोझमेरी असे कॉम्बो खूपच चांगला आणि रिफ्रेशिंग सुंगध देते. त्यामुळे तुमच्या घरात अगदी हमखास हे डिफ्युजर असायला हवे.
LAVENDER, ROSE & JASMINE ESSENTIAL OILS WITH SMART MIN-E-DIFFUSER – COMBO
एकावेळी वेगवेगळ्या सुगंधांनी घर सुंगधी ठेवायचे असेल तर तुम्हाला हा सेट देखील घेता येईल . यामध्ये तुम्हाला लव्हेंडर, रोझ आणि जास्मिन असे तीन इसेन्शिअल ऑईल मिळतात. घरात असा एखादा डिफ्युजर असायला काहीच हरकत नाही.
आता घर ठेवा सुंगधी नक्की आणा तुमच्याघरीही असे मस्त घरी ई- डिफ्युजर