मसाज हा आपल्या सगळ्यांच्या स्किन केअर रूटीनचा एक भाग नेहमीच असतो. जेव्हा आपण अधिक थकलेले असतो तेव्हा मसाज करून घेणे हा उत्तम उपाय समजतो. यामुळे शरीर आणि मनाचा थकवा निघून जाण्यास मदत मिळते आणि तुम्हालाही अधिक चांगले वाटते. बऱ्याचदा पायांपासून ते अगदी मानेपर्यंत, कमरेचा मसाज करणे लोकांना आवडते. पण चेहऱ्याचा मसाज करून घेणे याचाही फायदा असतो याची जाण अनेकांना कामाच्या घाईगडबडीत राहात नाही. चेहऱ्याचा मसाज जरी केला तरी फेशियलच्या स्वरूपात केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का नेहमी चेहऱ्याला मसाज देणे चांगले असते. याचा तुमच्या त्वचेसाठी अफलातून फायदा होतो. तुमच्या चेहऱ्याच्या नसांनाही मसाजची गरज असते. रोज चेहऱ्याला क्विक मसाज केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकता. याचा नक्की काय फायदा होतो ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
रक्तप्रवाह चांगला होणे
जेव्हा आपण चेहऱ्याला मसाज करतो तेव्हा चेहऱ्याला रक्त आणि ऑक्सिजनचा चांगला पुरवठा होतो. जेव्हा चेहऱ्यावर ऑक्सिजन आणि रक्ताचा चांगला पुरवठा होतो तेव्हा केवळ डोळ्यांजवळी सूजच कमी होत नाही तर तुमचा स्किनटोन अधिक चांगला होतो. इतकंच नाही तर तुमच्या त्वचेवर एक छान चमक येते आणि तुमची त्वचा डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते. तसंच चांगला ऑक्सिजन पुरवठा हा कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्यामुळे तुमची त्वचा अधिक तरूण दिसण्यास मदत मिळते.
अधिक तरूण त्वचा मिळते
Freepik
तुमच्या त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या असतील तर तुम्ही तुमची त्वचा अधिक निरोगी आणि तरूण ठेवण्यासाठी अँटिएजिंग उत्पादनांचा वापर करता. पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये क्विक फेस मसाजला जागा द्या. वास्तविक नियमित स्वरूपात फेस मसाज केल्यास, तुमच्या चेहऱ्याच्या मांसपेशी या टोन होतात आणि त्यांना नैसर्गिक लिफ्ट मिळते. अर्थात नैसर्गिकरित्या तुम्ही तरूण दिसता. तुम्ही तुमच्या हातांनी रोज मसाज करा. पण याशिवाय तुम्ही फेस टूल्स अर्थात जेड रोलरचाही वापर करू शकता. यामुळे तुम्हाला अधिक चांगला परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो.
स्किनकेअर उत्पादने होतात व्यवस्थित अब्जॉर्ब
बऱ्याचदा आपण महागडे आणि चांगले स्किन केअर उत्पादनांचा वापर करतो. पण आपल्याला हवा तास परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आपली निराशा होते. पण तुम्हाला माहीत आहे का? स्किन केअर उत्पादने हे चेहऱ्यावर नीट अब्जॉर्ब न झाल्यामुळे तुम्हाला हवा तसा परिणाम दिसून येत नाही. त्यासाठी तुम्हाला चेहऱ्याला मसाज केल्यानंतर चांगला परिणाम मिळू शकतो. चेहऱ्यावर मालिश केल्यामुळे स्किनकेअर उत्पादन चेहऱ्यावर चांगल्या तऱ्हेने शोषून घेतली जातात. त्यामुळे तुम्हाला त्वरीत परिणाम मिळतो. तुम्ही स्किनकेअर उत्पादने वापरण्यापूर्वी रात्री अथवा सकाळी चेहऱ्याला मालिश करू शकता.
तणावापासून मुक्तता
तणाव आणि थकव्याचा परिणाम केवळ मनावर नाही तर तुमच्या त्वचेवरही होत असतो. ताणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मसल्स अधिक ताणल्या जातात. त्यामुळे कपाळावर आणि डोळ्याच्या आजूबाजूच्या परिसरावर लवकर सुरकुत्या येतात. पण तुम्ही जेव्हा रोज चेहऱ्याला मसाज करता तेव्हा तणाव दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे चेहऱ्यावर फाईन्स लाईन्स दिसून येत नाहीत.
टॉक्झिन्सपासून देते सुटका
प्रदूषण, तेल आणि पर्यावरणीय कारणामुळे त्वचेच्या पोर्समध्ये अनेक वेळा टॉक्झिन्स अर्थात विषारी पदार्थ तसेच राहतात. यामुळे फाईन लाईन्सची समस्या अथवा सुरकुत्यांची समस्या अधिक होते. पण जेव्हा तुम्ही नियमित स्वरूपात चेहऱ्यावर मालिश करता तेव्हा आतील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि तजेलदार दिसण्यास फायदा होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक