राधे माँ आता तिच्या कॉन्ट्रॉव्हर्सीजमुळे सगळ्या घराघरात पोहोचली आहे. गेल्या काही वर्षापासून ती फारशी दिसलेली नाही. पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या मुलामुळे. हो! राधे माँ ला एक मुलगा आहे जो हिरोपेक्षाही कमी नाही. त्याला पाहिल्यानंतर तुम्ही हा मुलगा हिरोच दिसतो असे म्हणाल. राधे माँच्या मुलाने मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. त्याने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर इतके फॉलोवर्स आहेत की, आतापर्यंत हा राधे माँचा मुलगा आहे हे कोणाला माहीत देखील नव्हते. पण आता हे कळल्यानंतर अनेकांची बोटं तोंडात गेली आहे.
कोण आहे राधे माँचा मुलगा
राधे माँच्या या मुलाचे नाव हरजिंदर सिंह असे आहे. तो वेगवेगळ्या भूमिकांमधून आतापर्यंत सगळ्या समोर आला आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘आय ॲम बॅनी’ अशा काही चित्रपटात काम केले आहे. त्याने त्याच्या प्रोफाईलवर राधे माँचा तसा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण राधे माँ सोबतचे त्याचे काही जुने फोटोज सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले आहेत. पण आता हा राधे माँचा मुलगा असल्याचा खुलासा झाला आहे. हरजिंदर सिंह हा आधीच सोशल मीडियावर इतका प्रसिद्ध आहे की, त्याला राधे माँच्या नावाची काहीही गरज नाही. त्याचे आधीच बरेच फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे.
फिटनेसची आहे आवड
हरजिंदरला फिटनेसची प्रचंड आवड आहे. त्याच्या अनेक व्हिडिओज आणि फोटोमध्ये त्याचा फिटनेस पाहायला मिळत आहे. त्याने स्वत:ला इतके चांगले मेंटेंन केले आहे की, तो या सगळ्या फोटोमध्ये परफेक्ट दिसत आहे. हरजिंदरच्या फोटोशूटमधील फोटो पाहता त्याला अभिनयाची खूप जास्त आवड होती असेच दिसते. एका मुलाखतीदरम्यान त्याला अनेकांनी त्याच्या करिअरबद्दल प्रश्न केल्यावर त्याने त्याला लहानपणापासून क्रिकेटर किंवा अभिनेता व्हायचे होते हे सांगितले होते. त्याने या विषयी सांगितले की, क्रिकेट खेळण्यासाठी एक ठराविक वय असते. ते वय गेल्यानंतर तुम्हाला ते करता येत नाही. पण अभिनयाला आता वय राहिलेले नाही. तुम्ही अगदी कोणत्याही वयात अभिनय करु शकता. ही संधी मला मिळाली. एमआयटीमध्ये असताना त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याने करिअर अभिनय करायचे ठरवले.
लवकरच दिसणार सीरिजमध्ये
हरजिंदरने या आधी चित्रपटात काम केले आहे. पण आता तो रणदीप हुड्डासोबत एका नव्या कोऱ्या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज ॲक्शन सीरिज असणार आहे. यामध्ये तो पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. त्यासाठीच त्याने त्याचा फिटनेस चांगला राखलेला दिसत आहे. या सीरिजबद्दल त्याला विचारल्यानंतर त्याने सांगितले की, मला खूप आधीपासूनच रणदीपसोबत काम करायचे होेते. हे माझे स्वप्नच होते. ते आता साकारणार आहे. त्याचा मला आनंद आहे.
आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे त्याला रणदीपसोबत पाहण्याची