ADVERTISEMENT
home / Recipes
Rajma Recipe in Marathi

चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi)

राजमा हे एक परिपूर्ण कडधान्य आहे. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आहेत जे  शरीरासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या नाश्ता साठी तुम्ही राजमा नक्कीच बनवू शकता. राजमा ला किडनी बीन्स असंही म्हणतात. राजमा मध्ये फायबर्स, प्रथिने, कार्बोहायड्रेट भरपूर असतात.  राजमा एक प्रोबायोटिक म्हणूनही काम करते. मात्र लक्षात ठेवा राजमा पचायला जड असल्यामुळे कधीच रात्रीच्या जेवणात राजमा बनवू नका. त्याऐवजी दुपाच्या जेवणात हलका राजमा चावल किंवा संध्याकाळच्या स्नॅक्साठी राजमा टिक्की, राजमा रॅप तुम्ही नक्कीच बनवू शकता. राजमाचे पोषक फायदे शरीराला मिळावे यासाठी निरनिराळ्या प्रकारे तुम्ही राजमा सेवन करू शकता. यासाठीच जाणून घ्या राजमाच्या या स्वादिष्ट आणि चमचमीत रेसिपीज (Rajma Recipe In Maarthi).

राजमा चावल (Rajma Chawal Recipe In Marathi)

Rajma Chawal Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

राजमा चावल खाण्याची मजा एखाद्या पंजाबी हॉटेलमध्येच आहे असं तुमच्या घरच्यांना वाटत असेल. तर घरच्या घरी राजमा चावल बनवून तुम्ही त्यांना सरप्राईझ करू शकता. तुम्ही घरच्या घरी राजमा राईस (Rajma Rice Recipe In Marathi) आणि राजमा चावल (Rajma Chawal Recipe In Marathi) बनवू शकता.. पारंपरिक राजमा चावल तयार करण्यासाठी आम्ही शेअर केलेली रेसिपी नक्की ट्राय करा.

राजमा चावलचे साहित्य –

 • एक कप राजमा 
 • एक कप तांदूळ
 • एक कांदा
 • एक सोललेला लसूण
 • एक टोमॅटो
 • एक आल्याचा तुकडा
 • दोन हिरव्या मिरच्या
 • एक वाटी कोथिंबीर
 • एक चमचा जिरे पावडर
 • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
 • चवीनुसार मीठ
 • एक दालचिनीचा तुकडा
 • दोन लवंगा
 • एक वेलची
 • तेल
 • तूप

राजमा चावल करण्याची कृती –

 • रात्रभर राजमा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो स्वच्छ धुवून घ्याय आणि दोन कप पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून कुकरला लावा. राजमा शिजल्यावर बोटाने दाबता येईल इतपत मऊ व्हायला हवा.
 • कांदा, बारीक चिरून घ्या आणि टोमॅटोची प्युरी करा.
 • आलं, लसूण  आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करा.
 • एका जाड बुडाच्या पॅनमध्ये तेल गरम करा आणि काळी मिरी, लवंग  आणि दालचिनी टाकून परतून घ्या. कांदा  टाकून चांगला गुलाबी होई पर्यंत परता.
 • आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट मिसळा
 • टोमॅटोची प्युरी त्यात टाका आणि सर्व मसाले मिसळून राजमा परतून घ्या.
 • एक कप गरम पाणी टाका आणि दहा ते पंधरा मिनिटे राजमा शिजू द्या.
 • राजमा शिजल्यावर वरून तूप टाका आणि कोथिंबीरीने सजवा.
 • एक कप तांदूळ स्वच्छ धुवून एका भांड्यात एक ग्लास पाणी टाकून प्रेशर कुकरशिवाय शिजवून घ्या.  भात फडफडीत शिजायला हवा.
 • गरमागरम भात प्लेटवर पसरवा आणि मध्यभागी  खड्या करून त्यात राजमा ठेवा
 • गार्निश करून गरम गरम सर्व्ह करा.

मालवणी मसाला रेसिपी

ADVERTISEMENT

राजमा मसाला रेसिपी (Masala Rajma Recipe In Marathi)

Masala Rajma Recipe In Marathi

Instagram

राजमा जसा भातासोबत सर्व्ह करून तुम्ही राजमा चावल तयार करू शकता. त्याचप्रमाणे रोटी, नान, कुलचा अथवा पोळी, पुरीसोबत सर्व्ह करण्यासाठी चटपटीत राजमा मसालाही घरीच तयार करू शकता.

ADVERTISEMENT

राजमा मसाला साहित्य –

 • एक कप राजमा
 • एक कप कांद्याची पेस्ट
 • आले लसणाची पेस्ट
 • एक कप टोमॅटोची पेस्ट
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • एक चमचा जिरे
 • एक चमचा लाल तिखट
 • हळद
 • हिंग
 • चवीपुरते मीठ
 • तेल
 • तूप
 • गरम मसाला  अथवा राजमा मसाला

राजमा मसाला बनवण्याची कृती –

 • राजमा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
 • दुसऱ्या दिवशी राजमा पुन्हा धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरच्या कमीत कमी  पाच ते सहा शिट्टा होऊ द्या.
 • राजमा शिजवताना त्यामध्ये मीठ आणि हळद टाका.
 • हिंग, आले लसणाची पेस्ट, कांद्याची पेस्ट टाकून फोडणी तयार करा. त्यात टॉमेटोची पेस्ट टाका आणि चांगलं परतून घ्या.
 • फोडणीत हळद, मीठ, लाल तिखट,जिरे अथवा जिऱ्याची पावडर टाका. 
 • मसाल्यातून तेल सुटू लागलं की वरून राजमा टाकून परतून घ्या.
 • राजमा मसाला करण्यासाठी गरजेपुरतं पाणी टाका आणि चांगलं शिजू द्या.
 • राजमा मसाला एका बाऊलमध्ये काढा आणि वरून लसूण, तूप, हिंग, जिऱ्याची चुरचुरीत फोडणी द्या.
 • कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम पोळी सोबत वाढा.

यासोबतच वाचा खुशखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठीतून

राजमा पुलाव (Rajma Pulao Recipe In Marathi)

Rajma Pulao Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

राजमा राईसचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे असतील तर तुम्ही राजमा चावल प्रमाणेच राजमा पुलावही घरच्या घरी तयार करू शकता. राजमा पुलावला एक प्रकारचा छान स्वाद असतो. यासाठीच जाणून घ्या कसा तयार करावा राजमा पुलाव 

राजमा पुलावचे साहित्य –

 • एक कप राजमा
 • एक कप बासमती तांदूळ
 • एक चमचा तूप 
 • चार ते पाच काळीमिरी
 • एक चक्रफुल
 • एक दालचिनीचा तुकडा
 • दोन लवंग
 • एक चमचा जिरे
 • एक कांदा
 • आले लसूण पेस्ट
 • टॉमॅटो प्युरी
 • हळद
 • एक काश्मिरी मिरची
 • तेजपत्ता
 • कोथिंबीर
 • धणे पावडर
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा गरम मसाला

राजमा पुलाव करण्याची कृती –

ADVERTISEMENT
 • राजमा धुवून आदल्या दिवशी भिजत ठेवा आणि शिजवून घ्या
 • कुकरमध्ये  तूप गरम करा
 • त्यात तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, लवंग, जिरे टाका
 • लसूण पेस्ट परतून घ्या
 • कांदा लालसर होई पर्यंत परता
 • टोमॅटो प्युरी टाकून मसाला एकजीव करा.
 • शिजवलेला राजमा त्यात टाका
 • धणे पावडर, गरम मसाला. हळद, काश्मिरी मसाला, मीठ आणि धुतलेले तांदूळ टाकून परतून घ्या.
 • एक ग्लास पाणी टाका आणि शिटी लावून शिजू द्या
 • दोन शिट्टी झाल्यावर गॅस बंद करा 
 • थंड झाल्यावर वरून कोशिंबीर टाकून सजवा

राजमा उसळ (Rajma Usal Recipe In Marathi)

Rajma Usal Recipe In Marathi

Instagram

पोळी आणि भाकरीसोबत रोजच्या जेवणात जर तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या उसळ आणि पातळ भाज्या खाण्याची आवड असेल तर राजमा उसळ तुम्ही नक्कीच करायला हवी. यासाठीच ट्राय करा राजमा उसळ

राजमा उसळचे साहित्य –

ADVERTISEMENT
 • एक कप राजमा
 • तीन ते चार टॉमेटोची प्युरी
 • एक चिरलेला कांदा
 • आलं लसूण पेस्ट
 • चिमूटभर हिंग
 • पाव चमचा हळद
 • एक चमचा धणे पावडर
 • अर्धा चमचा बडिसोप
 • चमीपुरतं मीठ
 • तेल

राजमा उसळ करण्याची कृती –

 • रात्री राजमा भिजत घाला आणि सकाळी कुकरला पाच ते सहा शिट्या करून शिजवा.
 • तेलात कांदा परतून घ्या
 • त्यात आलं लसणाची पेस्ट टाका
 • वरून टोमॅटो प्युरी टाकून पुन्हा एकजीव करा आणि परतून घ्या.
 • हळद, मीठ, हिंग, तिखट, धणे जिरे पावडर टाकून मसाला परता.
 • वरून राजमा टाका आणि एक कप पाणी टाकून शिजू द्या
 • वाफ आल्यावर पोळी भाकरीसोबत गरम गरम वाढा

राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Rajma Curry Recipe In Marathi

ADVERTISEMENT

राजमा उसळ आणि राजमा करी थोड्या फार फरकाने एक सारखाच पदार्थ आहे. मात्र करी तुम्ही पुलाव, भात, रोटी, नान यासोबत सर्व्ह करू शकता. खास पाहुण्यांचा बेत असेल तेव्हा राजमा करी अवश्य करा.

राजमा करी साहित्य –

 • एक कप राजमा
 • एक कांदा
 • एका टोमॅटोची प्युरी
 • आले लसूण पेस्ट
 • एक चमचा जिरे
 • तेजपत्ता
 • एक चमचा लाल तिखट
 • हळद
 • एक चमचा धणे पावडर
 • एक चमचा गरम मसाला
 • एक चमचा जिरे पावडर
 • तेल

राजमा करी करण्याची पद्धत –

 • राजमा स्वच्छ धुवा आणि आदल्या रात्री भिजत ठेवा
 • दुसऱ्या  दिवशी स्वच्छ धुवून कुकरमध्ये सात ते आठ शिटी काढून शिजवा
 • तेलात जिरे आणि तमालपत्र भाजून घ्या आणि वरून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या
 • कांदा लालसर झाल्यावर आलेलसूण पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी टाका
 • हळद, लाल मसाला, गरम मसाला, जिरे पावडर, धणे पावडर परतून घ्या
 • राजमा फोडणीत टाका आणि शिजू द्या
 • राजमा मध्ये फार पाणी टाकू नका
 • घट्ट मसाल्याप्रमाणे करी तयार करा आणि सर्व्ह करा.

पौष्टिक लाडू रेसिपी

ADVERTISEMENT

पंजाबी राजमा (Punjabi Rajma Recipe In Marathi)

Punjabi Rajma Recipe In Marathi

Instagram

राजमा मसाला ही एक पंजाबी डिश असल्यामुळे ती खास पारंपरिक पद्धतीने बनवल्यास जास्त चविष्ट लागेल. हॉटेलप्रमाणे पंजाबी राजमा बनवण्यासाठी ही रेसिपी करून बघा.

पंजाबी राजमा साहित्य –

ADVERTISEMENT
 • एक कप राजमा
 • एक चमचा बटर
 • एक चमचा तेल
 • एक तेजपत्ता
 • एक दालचिनी
 • एक ते  दोन लवंग
 • एक चक्रीफुल
 • एक वेलची
 • एक चिरलेला कांदा
 • एक चमचा आलं लसूण पेस्ट
 • एक हिरवी मिरची
 • दोन टोमॅटो
 • हळद
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा धणे पावडर
 • एक चमचा जिरे पावडर
 • एक चमचा गरम  मसाला
 • अर्धा चमचा आमचूर पावडर
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा कसूरी मेथी 
 • कोथिंबीर

पंजाबी राजमा तयार करण्याची कृती –

 • राजमा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा
 • कुकरमध्ये पाच ते सहा शिटी काढून राजमा शिजवून घ्या
 • तेलात तेजपत्ता, हिंग, दालचिनी, लवंग, वेलची परतून घ्या
 • लसूण आल्याची पेस्ट परतून घ्या
 • बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून परतून घ्या
 • कांदा लालसर झाल्यावर हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, सर्व मसाले टाकून परतून घ्या
 • मसाल्यातून तेल निघू लागले की त्यात राजमा टाका आणि परतून एक कप पाणी टाका
 • ग्रेव्ही घट्ट होई पर्यंत शिजवा आणि वरून बटर 
 • टाका
 • वरून कसूरी मेथी आणि कोथिंबीर टाकून सजवा.

राजमा सलाड (Rajma Salad Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Instagram

ADVERTISEMENT

राजमापासून रोजची भाजी, उसळ, मसाला भाजी, करी करण्याचा  कंटाळा आला असेल तर राजमाचे हेल्दी सलाड करणं चांगला पर्याय ठरू शकेल. जेवताना  अथवा मधल्या काळातील भुकेसाठी तुम्ही हे सलाड खाऊ शकता.

राजमा सलाड साहित्य –

 • दोन कप उकडलेला राजमा
 • अर्धा कप उभा पातळ चिरलेला कांदा
 • अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो
 • एक बारीक चिरलेली कांद्याची पात
 • एक ते दोन कप लेट्यूसची पाने
 • दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
 • एक चमचा लिंबाचा रस 
 • चवीनुसार मीठ

राजमा सलाड करण्याची कृती –

 • राजमा सलाड करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करा आणि एका भांड्यात मिक्स करा.
 • व्यवस्थित टॉस करून सर्व साहित्य फ्रीजमध्ये ठेवून द्या.
 • खाण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल, मीठ, लिंबाचा रस एकत्र करून सलाडमध्ये मिक्स करा आणि लेट्यूसच्या थंडगार पानामध्ये सर्व्ह करा

ADVERTISEMENT

राजमा पराठा (Rajma Paratha Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Instagram

राजमा पराठा हा एक नाविण्यपूर्ण आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही तुमच्या कुटुंबाला नक्कीच खाऊ घालू शकता. ज्यामुळे त्यांना नेहमीच्या पद्धतीने राजमा खाण्याचा कंटाळा येणार नाही.

राजमा पराठाचे साहित्य –

ADVERTISEMENT
 • एक कप राजमा
 • दोन कप गव्हाचे पीठ
 • तेल
 • चवीपुरते मीठ

राजमा पराठा करण्याची कृती   –

 • रात्रभर राजमा भिजवून सकाळी शिजवून ठेवा
 • राजमामधील पाणी काढून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या
 • एका भांड्यात राजमा आणि गव्हाचे पीठ मिसळा
 • मीठ टाकून पीठ घट्ट मळून घ्या
 • तेलावर अथवा पिठावर पराठा लाटून घ्या आणि बटर लावून शेका
 • गरम गरम पराठा आणि दही सर्व्ह करा.

राजमा ढोकळा (Rajma Dhokla Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Instagram

ADVERTISEMENT

राजम्यापासून ढोकळा तयार करणं ही खूपच उत्साहीत करणारी गोष्ट आहे. राजमा टाकून तुम्ही तुमच्या पारंपरिक ढोकळ्याच्या रेसिपी ला एक स्वादिष्ट टच देऊ शकता.

राजमा ढोकळ्याचे साहित्य –

 • एक कप राजमा 
 • एक चमचा आल्याची पेस्ट
 • एक चमचा हिरव्या मिरचीची  पेस्ट
 • एक चमचा साखर
 • चवीपुरतं मीठ
 • एक चमचा फ्रूट सॉल्ट अथवा खाण्याचा सोडा
 • एक चमचा तेल
 • हिंग
 • कढीपत्ता

राजमा ढोकळा करण्याची कृती –

 • राजमा रात्री भिजत घाला आणि सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या आणि पाणी काढून वाटून घ्या
 • या मिश्रणात आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, साखर मिसळा
 • ढोकळा तयार करण्यापूर्वी त्यात फ्रूट सॉल्ट मिसळा आणि बुडेबुडे आल्यावर व्यवस्थित मिक्स करा आणि ढोकळा पात्रात मिश्रण टाका
 • ढोकळा पात्रामध्ये बॅटर टाकण्यापूर्वी भांड्याला तेलाचा हात लावून घ्या
 • दहा ते पंधरा मिनीटे वाफेवर शिजू द्या.
 • थंड झाल्यावर ढोकळाचा तुकडे करा आणि वरून हिंग, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या

राजमा शेवपुरी (Sev Puri Rajma Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

ADVERTISEMENT

Instagram

शेवपुरी आणि पाणी पुरी असं नाव ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे शेवपुरी चे निरनिराळे प्रकार ट्राय करायला हवेत. तुम्ही राजमापासून शेवपुरी करू शकता. ज्यामुळे शेवपुरी खाणं स्वादिष्ट  आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

राजमा शेवपुरीचे साहित्य –

 • एक टोमॅटो बारीक चिरलेला
 • एक कांदा बारीक चिरलेला
 • चिमूटभर हिंग
 • आले लसूणाची पेस्ट एक चमचा
 • एक चमचा लाल तिखट
 • साखर
 • एक चमचा जिरे पावडर
 • एक चमचा चाट मसाला
 • एक चमचा लिंबाचा रस
 • चवीपुरतं मीठ
 • शेवपुरी च्या पापडी
 • शेव

राजमा शेवपुरी करण्याची कृती  –

ADVERTISEMENT
 • राजमा रात्री भिजवून सकाळी शिजवून ठेवा
 • राजम्यातील पाणी काढून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या
 • त्यात जिरे पावडर, लाल तिखट, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि मीठ टाकून मिक्स करा.
 • सर्व्ह करताना शेवपुरी घ्या त्यावर राजमाचे टॉपिंग, चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव, चटणी टाका
 • प्रत्येकाच्या आवडी नुसार टॉपिंग करून शेवपुरी सर्व्ह करा

राजमा रॅप (Rajma Wrap Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Instagram

राजमा मसाला आणि रोटी असे  पारंपरिक पदार्थ जर तुमची मुलं खात नसतील तर राजमा रॅप बनवून त्यांना पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लावा. रॅप सारखे पदार्थ मुलांना आकर्षित करतात ज्यामुळे ते खायला त्यांना खूप आवडतं.

ADVERTISEMENT

राजमा रॅपचे साहित्य –

 • एक कप गव्हाचे पीठ
 • तेल
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा शिजवलेला राजमा
 • एक चमचा आलं लसणाची पेस्ट
 • पाव चमचा हळद
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चिरलेला कांदा
 • एक वाटी चिरलेली कोथिंबीर
 • एक वाटी टोमॅटो
 • एक वाटी दही
 • एक वाटी चिरलेली काकडी
 • एक वाटी चिरलेले गाजर
 • हिरवी चचणी
 • टोमॅटो सॉस

राजमा रॅपचे साहित्य –

 • गव्हाच्या पिठात तेल, मीठ टाकून कणीक मळुन घ्या.
 • पीठ ओल्या फडक्यात बांधून ठेवा
 • तेलात आलं लसणाची पेस्ट परतून घ्या, त्यात कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाले परतून घ्या
 • शिजलेला राजमा टाका आणि चांगले स्मॅश करा
 • गव्हाच्या पिठाची पोळी अर्धवट शेकवून घ्या.
 • सर्व्ह करताना त्याला बटर, चटणी, सॉस लावा  आणि वरती भाजी ठेवा. वरून कच्चा कांदा टाका आणि रोल शेकवून घ्या.
 • काकडी आणि गाजर मिक्स करून दह्याचे रायते अथवा ड्रेसिंग तयार करा
 • गरमागरम रोल सर्व्ह करा.

राजमा टिक्की (Rajma Tikki Recipe In Marathi)

Rajma Recipe in Marathi

Instagram

ADVERTISEMENT

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम चहा आणि राजमा टिक्की एक मस्त बेत ठरू शकतो. यासाठी राजमापासून टिक्की कशी करायची हे पाहा.

राजमा टिक्कीचे साहित्य –

 • एक कप शिजवलेला राजमा
 • आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट
 • एक उकडलेला बटाटा
 • अर्धी वाटी उकडलेले मटार
 • एक चमचा जिरे पावडर
 • एक चमचा धणे पावडर
 • एक चमचा चाट मसाला
 • मीठ
 • ब्रेड क्रम्स

राजमा टिक्की तयार करण्याची कृती – 

 • बटाटे उकडून कुस्करून घ्या. त्यात शिजवलेला राजमा आणि मटार स्मॅश करून टाका. 
 • चिरलेला कांदा, आल्या मिरचीची पेस्ट मिसळा
 • सर्व मसाले आणि चवीपुरतं मीठ मिसळून एकत्र गोळा तयार करा
 • गोळ्यातील सारणाचे टिक्की प्रमाण आकार करून घ्या
 • ब्रेडक्रम्स वर घोळवून शॅलो फ्राय करा
 • चहा सोबत गरम गरम टिक्की खायला द्या.

You Might Also Like

ADVERTISEMENT

Bread Pizza Recipe in English

08 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT