विचित्र विधान आणि चर्चेत राहण्यासाठी काहीही करणारी राखी आता आणखी एका नव्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. आता राखी सावंतने एक नवीच मागणी केली आहे. तिने चक्क तिच्या चाहत्यांकडून मला एका किडनीची गरज आहे. मला किडनी देण्यात यावी असे व्हिडिओ करुन सांगितले आहे. थांबा थोडं थांबा… कारण राखीने किडनीची मागणी कशासाठी केली आहे हे ऐकून तु्म्हाला धक्का वाचल्यावाचून राहणार नाही. आता राखीने नेमकी कशासाठी किडनीची मागणी केली आहे हे जाणूनच घ्यायला हवे नाही का? चला बघूया यंदा राखीने नेमकी कशाची मागणी केली आहे ते
राखीला या कारणासाठी हवी आहे किडनी
आता राखीला किडनी कशाला हवी? म्हणजे राखी आजारी आहे की, राखीने कोणासाठी तरी किडनीची मागणी केली आहे असे काही असते तरी एखाद्यावेळी समजले असते. पण राखीने आयफोन घेण्यासाठी किडनी द्या असे सांगितले आहे. राखीला नवा आयफोन घ्यायचा आहे. त्यामुळे तिने तिच्या चाहत्यांना हार्ट किंवा असे काही पाठवण्यापेक्षा तुमची किडनी पाठवा म्हणजे मला बाजारात आलेला नवा आयफोन घेता येईल असे तिला यातून सांगायचे आहे. आता तुम्हालाही धक्का बसलाच ना? राखी कधी काय मागेल आणि काय करेल हे नेमकं सांगता येत नाही. आता तिचा हा किडनी व्हिडिओ पाहूनही खूप जणांनी डोक्यावर हात मारला आहे अजून काही नाही.
राखी सावंत आणि तिचे व्हिडिओ
राखी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत ॲक्टिव्ह असते. ती काही काही नवे व्हिडिओ बनवत असते. तिचे व्हिडिओ हे अनेकदा ग्लॅमरस असतात.तर कधी कधी डोक्याला मुंग्या आणणारे असतात. पण कितीही कमेंट आल्या तरी ती काही तिचे व्हिडिओ बनवणे थांबत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या नव्या अवताराता पाहायला मिळतात. सतत चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करणारी राखी आता अनेकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. राखी सावंतने बिग बॉस 14 मध्ये येऊन पुन्हा एकदा चांगली प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर आता तिची गाडी चांगलीच सुस्साट सुटली आहे.
रितेशपासून झाली वेगळी
राखी सावंत तिचा स्वयंवर कधीपासून करायला बघत आहे. तिचे व्हिडिओ जितके कॉन्ट्राव्हर्शिअल असतात. तसेच तिचे रिलेशनशीप ही वादग्रस्त राहिले आहेत. तिचा पहिला बॉयफ्रेंड अभिषेक आणि तिच्यामध्ये झालेले घमासान भांडण, त्यानंतर मिकाने घेतलेली किस आणि आता रितेशसोबत केलेले लग्न हे सगळेच वादग्रस्त राहिले आहे. तिने रितेश सिंह नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. तिने लग्न केल्यानंतर तिचे काही फोटो पोस्ट केले पण त्यावर नवऱ्याचा चेहरा लपवला होता. त्यामुळे तिचा नवरा कोण? हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. अखेर तिने बिग बॉस 15 च्या सीझनमध्ये तिच्या पतीचा चेहरा रिवेल केला. पण त्यानंतर रितेशवरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आणि आता ती त्याच्यापासून वेगळी झाली आहे. त्यामुळे एकूणच तिने यातही केवळ पब्लिसिटी मिळवली यात काहीही शंका नाही
दरम्यान आता राखीला तिच्या आयफोनसाठी किडनी कोण देईल हे पाहावे लागेल.