नाही हो म्हणता म्हणता… सावंतांच्या राखीचे शुभमंगल झाले. आता ही सावंतांची राखी म्हणजे आपली ड्रामाक्वीन राखी सावंत हो.. तिनेच तिच्या लग्नाची ही गोड बातमी दिली असून अनेक प्रसारमाध्यमांना तिने गुपचूप लग्न केल्याची कबुली दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी तिने तिचा ब्रायडल लुकमधील काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी राखीने लग्न केले की काय? अशी शंकेची पाल मनात चुकचुकली होती. पण त्यावेळी तिने हे केवळ फोटोशूट असल्याचे सांगितले आणि विषय फिरवला. पण आता एका NRI मुलाशी लग्न केल्याचे राखी सावंतने स्वत:च Confirmed केले आहे.
#BBM2 मधून रूपाली भोसलेची अनपेक्षित एक्झिट
लग्नाची बातमी सांगायला घाबरली राखी
राखी सावंतच्या ब्रायडल लुकच्या फोटोवरच अनेकांनी तिला लग्न झाले की, नाही हे विचारले होते. पण तिने त्यावेळी अगदी सगळ्यांनाच मी एका ब्रँडसाठी ब्रायडल फोटोशूट करत असल्याचे म्हटले. पण ज्यावेळी तिच्या काही दुसऱ्या फोटोवरुन तिच्याकडे लग्नाच्या बातमीची विचारणा केली असता तिने लग्न झाल्याचे मान्य केले. तिने लग्नाबाबत कोणाला सांगितले का नाही? असा प्रश्न केल्यावर मी घाबरले होते. मला लोकांना कसं सांगू हे कळत नव्हतं. पण ही गोष्ट खरी आहे की, मी लग्न केले आहे.
कोणासोबत केले राखीने लग्न
आता अर्थात लग्न केले आहे म्हटल्यावर राखीने नेमकं कुणासोबत लग्न केलं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण ‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमातूनही तिने एका मुलाला पसंद केले त्याच्याशी साखरपुडा केला. पण तिने त्यानंतर त्यांचे नाते तोडून टाकले. तिचे त्यावेळचे वागणे हा सगळा दिखावा होता हे सिद्ध झाले होते. पण आता ज्या मुलाशी तिने लग्न केले आहे. तो मुलगा NRI असल्याचे कळत आहे. त्याचे नाव रितेश असल्याचे स्वत: राखीने अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. तो एक बिझनेसमन असून तिने येशू ख्रिस्ताचे रितेश सारखा समजूतदार नवरा मिळवून दिल्याबद्दल आभारही मानले आहे.
म्हणून लोकांना आवडतेय ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका
राखी चालली UKला
आता राखीनेच दिलेल्या माहितीनुसार राखीचा नवरा हा UKला असतो. तो लग्न करुन UKला निघून गेला. राखीचा व्हिसा आल्यानंतर राखीही लवकरच जाणार आहे. या शिवाय राखीने काम असल्यास देशात येईल असेही सांगितले आहे. त्यामुळे इतके नक्की की राखी देश सोडून UK ला स्थायिक होण्याचा विचार करत आहे.
मुंबईत केले लग्न
आता राखी लग्न झाल्याचे अगदी ठामपणे सांगत असताना तिने तिच्याशिवाय कोणाचेही फोटो शेअर केलेले नाही. तिनेच दिलेल्या माहितीनुसार ती मुंबईच्या JW Marriot मध्ये विवाहबद्ध झाली आहे. तिने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. त्या आधी तिने कोर्ट मॅरेज केल्याचे तिने सांगितले आहे.
राखीला हवी आहेत तिळी
आता राखी सावंत लग्न करुन एवढ्यावरच थोडी थांबणार तिने लग्नानंतरचे पुढील प्लॅनही सांगितले आहे. सध्या ती 33 वर्षांची असून तिला लगेचच भविष्याचा निर्णय घ्यायचा आहे. तिला फराह खानप्रमाणे तिळी मुलं हवी आहेत. 2020मध्ये तिने बेबी प्लॅनिंग केले असून त्यानंतरच तिचा नवरा रितेश प्रसारमाध्यमांसमोर येणार असेही ती म्हणाली आहे.
आता राखीचे हे फोटो पाहून आणि तिच्या आधीच्या लग्नाच्या अफवा पाहता आता तरी राखीने हे लग्न खरेच केले आहे का? हे काही दिवसांनी कळेलच म्हणजे खरे कळेल अशी अपेक्षा आहे.
Indian Idolमधील हे विजेते सध्या काय करत आहेत, जाणून घ्या