बिग बॉस 14 नंतर राखी सावंत नावाचे वादळ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले आहे. राखी सावंत सध्या पाहावे तिकडे चर्चेचा विषय असते. तिला हजारो कॅमेरे फॉलो करत असतात. कोरोनाच्या या काळात भाजी घेताना काहीतरी खरेदी करताना ती नेहमीच दिसते. आता राखी सावंत हिला देशाच्या पंतप्रधानपदी सोनू सूद आणि सलमान खान यांना बसवण्याची इच्छा झाली आहे. हो, राखीने एका मुलाखती दरम्यान असे विधान केले आहे. देशासाठी काम करणाऱ्या या दोन अभिनेत्यांनाच पंतप्रधान बनवा असे ती म्हणाली आहे. आता अर्थात राखी सावंत अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी काही नवी नाही. पण आता तिच्या या वक्त्व्यामुळे सोशल मीडियावर तिचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. जाणून घेऊया राखी नेमकं म्हणाली काय?
तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी, जाणून घ्या कारण
काय म्हणाली राखी
राखी सावंतला पापाराझींनी असेच ती बाहेर असताना रोखले. त्यावेळी देशावर खरे प्रेम करणारे हिरो म्हणून तिने सोनू सूद आणि सलमान खान यांचे नाव घेतले. देशाप्रती असणारे प्रेम आणि करणारी मदत पाहता त्यांनाच देशाचे पंंतप्रधान करा अशी मागणी तिने केली आहे. इतकेच नाही तर राखी या वेळी अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे नाव घ्यायला मुळीच विसरलेली नाही. तिने त्यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांची स्तुती केली आहे. या कोरोना काळात अनेक सेलिब्रिटी हे मदतीसाठी पुढे आले. सोनू सुद यांने अनेक इतर राज्यातील लोकांची मदत केली. इतर वेळी चित्रपटातून व्हिलनची भूमिका साकारणारा हा अभिनेता आज लोकांसाठी रिअल लाईफ हिरो झाला आहे. त्यामुळेच कदाचित त्याला पंतप्रधान बनवण्याची मागणी राखीने केली आहे. राखी हे बोलताना इतकी विश्वासाने बोलत आहे की, तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.
राखी करते नियमांचे पालन
राखीने या आधीही बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कोरोनाविषयी अनेक विधान केली होती. लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ती सतत असे काही करते की, इंटरव्हयू देताना इतरांना मास्क लावण्याची विनंती ती करताना दिसते. तर कधीकधी भाजी घ्यायला जाताना ती पीपीई किट घालून जाते. राखी कधी काय करेल याचा अंदाज कोणालाही येत नाही. राखीच्या या काही वक्त्व्यांचे कधी कोणते मीम तयार होईल याचाही अंदाज कोणाला नाही. दरम्यान राखीचे या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या पूर्वी तिने कोरोना काळात घरी राहून कसे काम करते याचा एक व्हिडिओ केला होता. आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशन दरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळीही तिच्या मदतीला सलमान खान धावून आला होता. तिच्या आईच्या तब्येतीची काळजी घेत ती सामाजिक भान सध्या राखताना दिसत आहे.
कोरोनामुळे अजय देवगनचा ‘थॅंक गॉड’ धोक्यात, होणार कोटींचे नुकसान
राखी सध्या काय करते?
राखी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला बरीच प्रसिद्धी पुन्हा एकदा मिळाली. ती खऱ्या आयुष्यात कशी आहे हे कळल्यामुळेच तिचे अनेक चाहते झाले आहेत. तिचा फॅनबेस्ड वाढल्यामुळेच तिचे चाहते आता देशभरातच नाही तर परदेशात देखील झाले आहे. त्यामुळे सध्या राखी काही करत नसली तरी देखील ती ट्रेंडमध्ये आहे.
दरम्यान, राखीचे हे म्हणणे तुम्हाला कितपत पटले आम्हालाही नक्की सांगा.
ट्विटरनंतर आता कंगनाच्या इन्स्टाग्रामवर डोळा, पोस्ट झाली डिलीट