राखी सावंतच्या (Rakhi Sawant) मागे कायमच कॅमेरामनचा गराडा असतो. हल्ली तिच्यामागे सतत कॅमेरामन असण्याचे कारण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी.. त्याच्यासोबत अनेक ठिकाणी ती हल्ली स्पॉट होते. तिला तिच्या नव्या बॉयफ्रेंडसोबत पाहून अनेकांना आनंद झाला आहे. तिचे वागणेही हल्ली बदलले आहे. ती हल्ली काह वेगळा वेडेपणा करत नाही. ती मीडियासमोर कोणतेही विचित्र आणि वेडेवाकडे चाळे करत नव्हती. पण आता पुन्हा एकदा राखीचा तो वेडेपणा पाहायला मिळत आहे. हल्ली राखी डोक्यावर एक केसांचा टोप लावून फिरत आहे आणि ती जे काही बोलत आहे तो विषय चर्चेचा ठरत आहे.ती मध्येमध्ये जे काही करते ते देखील सध्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुस्टरनंतर केला व्हिडिओ
सध्या अनेक ठिकाणी कोरोना किंवा अन्य आजार वाढताना दिसत आहे. या आजाराशी दोन हात करण्यासाठी बुस्टर डोस हा देखील दिला जात आहे. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत .अशांना हा बुस्टर डोस घेता येत आहे. राखीनेही नुकताच जाऊन हा डोस घेतला त्यावेळी तिने असा विनोदी व्हिडिओ केला आहे तुम्हालाही पोट धरुन हसल्यावाचून राहता येणार नाही. तिने बुस्टर घेताना या आजारांनी डोकं खराब करुन टाकलं आहे असे म्हणत डोक्यावर एक केसांचा टोप लावून व्हिडिओ केला आहे.
सुश्मिता सेन- ललित मोदीवर दिली प्रतिक्रिया
सध्या सगळीकडे ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या रिलेशनशीपवर मोठी चर्चा केली जात आहे. या संदर्भात जेव्हा तिला विचारण्यात आले त्यावेळी तिने आपले मत अगदी बिनधास्त मांडले. तिने ललित मोदी कोण? असा प्रश्न केला. पुढच्या एका व्हिडिओमध्ये तिने चुकून ललित मोदी यांना नरेंद्र मोदी असेही म्हटले आणि चूक लक्षात आल्यानंतर माफीही मागितली. पण तिने अच्छा हात मारा है… असे म्हणत खिल्ली उडवली खरी… पण तिच्या बोलण्यात कोणताही राग किंवा द्वेष नव्हता. तिने हसून या प्रश्नाचे उत्तर दिले.
राजीव खिंचीसोबत खूप दिवसांनी दिसली राखी
राखी सावंत मध्यंतरीच्या काळात जिममध्ये अनेक व्हिडिओ करताना दिसत होती.ती जीममध्ये असे काही व्हिडिओ करत होती की. ते व्हिडिओ पाहून तिचा खूप जणांना राग येत होता. कारण तिचे व्हिडिओ अश्लील होते. असे अनेकांना वाटत होते. राजीवसोबत ती असे काही व्हिडिओ करते की, त्यामुळे त्याची चर्चा अगदी होतेच. हल्लीच तिने पोटात फुगे लावून एक व्हडिओ केला होता. त्यावेळी राजीव खिंची तिच्यासोबत होता. या व्हिडिओमुळे ती अनेकांना आवडेनाशी झाली असावी. पण तिचा बबलीपणा हिच तिची ओळख आहे. जर त्या गोष्टी कमी झाल्या तर ती राखी सावंत वाटणार नाही.
हल्ली राखी आदिलमुळे बदलली असली तरी देखील तिला असे पाहायलाही अनेक जणांना आवडते. आता राखीचा हा नवा लुक आणि तिचा नवा दृष्टिकोन कसा वाटला हे सांगायला विसरु नका.