राखी जिथे चर्चा तिथे हे आपण सगळेच जाणतो. काहीच दिवसांपूर्वी रितेश नावाच्या माणसासोबत तिने गुपचूप लग्न केले. त्याच्या नावाने भांगेत सिंदूर भरले. तो कोण असे विचारल्यावर त्याला सगळ्यांसमोर देखील आणले. त्यानंतर ते नाते बिनसले आणि बरेच काही घडले. पण आता राखीच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीचे आगमन झाले आहे. राखी पुन्हा एकदा प्रेमात असल्याचे सांगितले जात आहे. आताचे तिचे रिलेशनशीप तिने लपवून न ठेवता तिने ते जगजाहीर केले आहे. आदिल नावाच्या या बिझनेसमेनसोबत ती रिलेशनशीपमध्ये असून त्याने तिच्यासाठी खास तिच्या नावाची BMW गाडी देखील गिफ्ट केली आहे.
राखी खरंच आहे का नात्यात
राखी काय खरं आणि काय खोटं बोलते याचा अंदाज कधीच येत नाही. तिने रितेशसोबत लग्न केले ही देखील अनेकांना अफवा वाटली होती. पण बिग बॉसच्या घरात ती रितेशला घेऊन आली. रितेशसोबत अनेक कॉन्ट्राव्हर्सीजसुद्धा आल्या. घरातून बाहेर पडल्यानंतर तिने लगेचच त्याच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यातून बाहेर पडत नाही तोच तिने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिने आदिलसोबत नात्यात असल्याचे सांगितले आहे. त्याच्यासोबत ती एअरपोर्टवर आणि अनेक ठिकाणी स्पॉट झाली आहे. आदिलबद्दल विचारल्यानंतर तिने ती गेल्या 4 वर्षांपासून नात्यात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रितेशसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती की आदिलसोबत हे जरा शंकाच निर्माण करणारे आहे.
कोण आहे हा आदिल
आतापर्यंत तुम्ही आदिल कोण? हे शोधून काढले नसेल तर खास तुमच्यासाठी. आदिलचे पूर्ण नाव आदिल खान दुर्रानी असे आहे. आदिल मैसूरचा असून तेथे त्याचा गाड्यांचा बिझनेस आहे. त्यानेच राखीला गाडी गिफ्ट केली आहे. राखीकडे लक्झरी गाडी पाहिल्यानंतर खूप जणांना धक्का बसला होता. पण ती आदिलने गिफ्ट केली त्यावेळी तिने त्याच्यासोबतचे नाते सांगितले नव्हते.पण आता तिने तिच्या नात्याचा खुलासा केला आहे.
राखी करणार आहे लग्न
राखीने रितेशसोबतही लग्न केले होते. त्यावेळी तिने अगदी सिक्रेट लग्न केले होते. पण आता तिने आदिलला अगदी उघड उघड दाखवले आहे. पापाराझीनेही त्यांचे फोटो काढले आहेत. राखीपेक्षा आदिल 10 वर्षांनी लहान असल्याचे सांगितले जात आहे. पण तरीही ते दोघे एकमेकांसोबत खूश असून त्यांना लग्न करायचे आहे. काही जणांनी आताच त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता तिने लग्न केले आहे की, लवकर लग्न करणार आहे हे काही कळत नाही.
राखी दिसते खूश
राखी आणि तिचे रिलेशनशीप कायमच कॉन्ट्राव्हर्शीअल राहिले आहे. काऱण तिचे आतापर्यंत अनेक रिलेशनशीप झाले पण ते कोणतेही नाते टिकू शकले नाही. राखी सगळ्यात आधी अभिषेक अवस्थीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण हे नाते खूपच वाईट परिस्थितीत तुटले. त्यानंतर राखीने स्वयंवर केले ज्यामध्ये तिने इलेश परुजनवाला याला निवडले. पण तेही नाते केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले जात होते. दिपक कलालसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. पण ते फार काळ टिकले नाही. आता लेटेस्टमध्ये तिने रितेशसोबत लग्न केले. रितेश हा आधीच लग्न झालेला होता. इतकेच नाही तर त्याने बिग बॉसमध्ये येऊन अधिक तमाशा केला. आता आदिलसोबत नात्यात असताना ती खूश दिसत आहे. यावेळी ती खरंच लग्न करणार असे दिसत आहे.
असो, राखीला आनंदी पाहून आणि तिच्या लग्नाची गोष्ट ऐकून खूप जणांना आनंद झाला हे नक्की!