Advertisement

बॉलीवूड

नव्वदच्या काळातील ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनीचा कमबॅक

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 15, 2021
नव्वदच्या काळातील ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनीचा कमबॅक

Advertisement

बॉलीवूडमधील ऐंशी ते नव्वदीचा काळ म्हणजे चाहत्यांसाठी अप्रतिम चित्रपटांची पर्वणीच होती. याच काळात एक चित्रपट खूप गाजला होता तो म्हणजे राज कपूर यांचा राम तेरी गंगा मैली… या चित्रपटाचे कथानक, मांडणी, दिग्दर्शन यासोबतच आणखी एक गोष्ट हा चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी कारणीभूत होती. ती म्हणजे त्या काळात अभिनेत्री मंदाकिनीने दिलेले बोल्ड सीन्स. मंदाकिनीने या चित्रपटात दिलेले काही बोल्ड सीन्स हे चित्रपटाची गरज असले तरी त्या काळात ते प्रेक्षकांना पचनी पडणे सहज शक्य नक्कीच नव्हते. मात्र या सीन्समुळे हा चित्रपट तर लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला शिवाय अभिनेत्री मंदाकिनीला नकळत प्रसिद्धी देखील मिळाली. त्यानंतर मंदाकिनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र एकोणीस वर्षांपूर्वी बॉलीवूडला राम राम ठोकल्यानंतर आता मंदाकिनी पुन्हा एकदा तिच्या कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. मंदाकिनीचा चाहता वर्ग आजही  तितकाच मोठा असल्यामुळे मंदाकिनीच्या कमबॅकची अनेकजण आतूरतेने वाट पाहत आहेत.

मंदाकिनी सध्या काय करते

मंदाकिनी 19 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मात्र ती बॉलीवूडपासून चांगलीच दूरावली होती. मंदाकिनी म्हणजे राम तेरी गंगा मैली अशी तिची ओळख झाल्यामुळे आजही ती फक्त याच चित्रपटासाठी ओळखली जाते. मात्र आता ती पुन्हा बॉलीवूडमध्ये परत येण्यासाठी सज्ज होत आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यात व्यस्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीमध्ये  मंदाकिनीच्या मॅनेजरने ही माहिती मीडियाला दिली आहे. सध्या मंदाकिनी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. मॅनेजरच्या मते मंदाकिनी लवकरच दमदार कमबॅक करणार आहे. त्यामुळे सध्या ती तिच्यासाठी योग्य आणि चांगली अशी भूमिका शोधत आहे. यासाठी ती अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे. मंदाकिनी चित्रपट आणि वेबसिरिज दोन्हीमधून कमबॅक करण्यास तयार आहे. तिची अट फक्त एवढीच आहे की तिला असा एखादा प्रोजेक्ट हवा आहे ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत असेल. सगळं काही ठरल्यावरच मंदाकिनी यासाठी मीडियासमोर येणार आहे. त्यामुळे सध्या तरी ती तिचे प्रोजक्ट बारकाईने निवडण्यात गुंतलेली आहे. 

या कारणासाठी मंदाकिनी करतेय कमबॅक

मंदाकिनी बराच काळ बॉलीवूडपासून दूर आहे मग आताच ती पुन्हा पदार्पणाची  तयारी का करतेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यामागचं कारण मंदाकिनीचा भाऊ हे. मंदाकिनीचा भाऊ भानू तिला पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्याच्या मते एकदा मंदाकिनी दुर्गा पूजेच्या पंडालमध्ये गेली होती. तिथे तिच्या भोवती चाहत्यांचा अक्षरशः गराडा पडला होता. तिचा चाहता वर्ग आजही जबरदस्त आहे. बॉलीवूडपासून इतके वर्ष दूर राहूनही जर तुमचा चाहता वर्ग मोठा असेल तर तुम्ही पुन्हा या क्षेत्रात तुमचे नशीब आजमावायला हवे असे तिच्या भावाला वाटत आहे. यापूर्वी तिला अनिता राज साकारात असलेली छोटी सरदारनी मधील भूमिका ऑफर झाली होती. मात्र मंदाकिनीने या भूमिकेला नकार दिला होता. मंदाकिनीने 2002 मध्ये शेवटचं काम केलं होतं. ती से अमर प्रेम या बंगाली चित्रपटात झळकली होती. राम तेरी गंगा मैली या चित्रपटाप्रमाणेच तिने याआधी डांस डांस, कहां है कानून, प्यार करके देखो अशा अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ऐंशी नव्वदचा  काळ गाजवणाऱ्या मंदाकिनीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा

बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं

राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल