ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रणबीरसोबतच्या लग्नाच्या गॉसिप म्हणजे केवळ बातम्या- आलिया

रणबीरसोबतच्या लग्नाच्या गॉसिप म्हणजे केवळ बातम्या- आलिया

बी टाऊनमधील अपकमिंग लग्न करणारी जोडी म्हणून आलिया- रणबीरचे नाव सतत पुढे येत असते. कधी रणबीर-आलियाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होते काय? कधी आलियाचा लेहंगा रेडी होतो काय? आणि आलिया -रणबीरच्या हनिमून डेस्टीनेशनविषयी चर्चा होतात काय… या सगळ्या चर्चा ऐकून अनेकांना कंटाळा ही आला असेल पण तुमच्यासोबतच ज्यांच्यावर ही चर्चा रंगत आहे अशा आलिया- रणबीरलाही या चर्चांचा कंटाळा आला आहे. स्वत: आलियाने या सगळ्या गोष्टी इंटरटेन्मेंटसाठी केलेल्या गॉसिप असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता त्यांच्यामध्ये काही आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे

विनोदी वेबसीरिजमधून ही अभिनेत्री करतेय कमबॅक

काय म्हणाली आलिया

वाचा काय म्हणाली आलिया

Instagram

ADVERTISEMENT

एका प्रसिद्ध इंटरटेन्मेंट चॅनेलला आलियाने मुलाखत दिली. त्यावेळी तिला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आले. यावर आधीही आलियाने बरीच उत्तर दिली आहेत. तिने रणबीरसोबतच्या नात्याला उघड उघड होकार दिलेला नाही. पण त्यांच्यात नक्कीच काही तरी सुरु आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तिला ज्यावेळी लग्नाविषयी विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, मला माझ्या लग्नाच्या गोष्टी कायम बातम्यांमधून कळतात. आता ज्या गोष्टी मला माहीत नाहीत.  माझ्या लग्नाच्या गोष्टी ज्या बाहेर पसरत आहेत त्या इंटरटेन्मेंटशिवाय काही नाहीत. आता आलियाच या सगळ्या चर्चांना गॉसिप म्हणत असल्यामुळे आता आलिया- रणबीरचे लग्न होणार की नाही हा प्रश्न पडला आहे. 

आलिया नेहमीच करते या गोष्टींना विरोध

रणबीर कपूर

Instagram

रणबीर आणि आलिया यांचे प्रेम जगजाहीर असले तरी त्यांनी स्वत:हून त्यांचे नाते कन्फर्म केलेले नाही. आलियाला या संदर्भात विचारणा केल्यावर ती कायमच या सगळ्या गोष्टींना विरोध करते. ती असे काही नाही असेच कायम दाखवते. रणबीरच्या कुटुंबासोबत ती अनेकदा दिसते. पण तरीसुद्धा ती या गॉसिपना खतपाणी घालण्याचे काम अजिबात करत नाही. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

ADVERTISEMENT

 

आलिया दुर्लक्ष करते अशा गॉसिप

आलियाला ज्यावेळी या गॉसिपबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, मी जसं मी आधी सांगितलं की, माझ्या लग्नाच्या गोष्टी मला बाहेरुन अधिक कळतात. आता सध्या काय गॉसिप बाहेर सुरु असेल हे मला खात्रीने सांगता येणार नाही. पण हनिमून डेस्टिनेशन शोधणं, लग्न 15 दिवसांवर आलं आहे असं म्हणणं या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतात. पण मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. 

मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार ‘बोनस’

या मोठ्या व्यक्तीने वर्तवले लग्नाचे भाकीत

आलियाने कितीही विरोध केला असला तरी आलियाच्या लग्नाचे भाकीत ज्या व्यक्तीने वर्तवले आहे ही व्यक्ती आहे राजीव मसंद, त्यांनी एका शो दरम्यान आलिया- रणबीर डिसेंबरमध्ये लग्न करणार असे सांगितले. त्यामुळे आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे पाहावे लागेल. दरम्यान, आलिया आणि रणबीर धर्मा प्रोडक्शनच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. 

ADVERTISEMENT

आलिया-रणबीरसोबत लग्न करते की नाही? हे कळेलच. पण सध्या तरी या केवळ चर्चाच आहेत असे म्हणावे लागेल. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

18 Feb 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT