सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची. #ralia चं लग्न नक्की कधी आहे याबाबत सध्या सगळीकडेच चर्चा आहे. काही जणांचा अंदाज आहे 15 एप्रिल तर काही जण सांगत आहेत 17 एप्रिल, पण अजूनही या जोडप्याने मात्र कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जाहीर केले नाही. त्यामुळे सध्या केवळ अंदाज लावला जात आहे. पण चार वर्ष डेट केल्यानंतर ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकणार आहे असं सगळीकडेच म्हटलं जातंय. इतकंच नाही तर सध्या आरके स्टुडिओ (R K Studio) आणि वास्तु अपार्टमेंट (Vastu Apartment) याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण आलिया आणि रणबीर एकमेकांमध्ये कधी गुंतले, कुठे भेटले, कशी फुलली त्यांची प्रेमकहाणी तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या तुमच्या लाडक्या रालियाच्या प्रेमाबाबत.
वयाच्या 11 व्या वर्षीपासून रणबीर होता आलियाचा क्रश
असं म्हणतात की, एखाद्यावर खूप मनापासून प्रेम केलं तर ती व्यक्ती आपली होतेच. आलियाला जेव्हा तिच्या क्रशबाबत विचारलं होतं, तेव्हा आलियाने एका क्षणात सांगितले की, वयाच्या 11 व्या वर्षापासून रणबीर कपूर तिचा क्रश आहे. तिने ब्लॅक चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती आणि तेव्हा तिने रणबीरला पाहिले होते. त्याच्या दशकानंतर रणबीर आणि आलिया अखेर एकत्र आले. फेब्रुवारी 2018 मध्ये अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) साठी दोघे एकत्र आले आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली.
मे 2018 मध्ये मान्य केले नाते
रणबीर आणि आलिया भेटल्यापासूनच त्यांच्याामध्ये प्रेम खुलू लागले आहे याची चर्चा सुरू झाली होती आणि साधारण तीन महिन्यातच या दोघांनी सोनम कपूरच्या रिसेप्शनला आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आणि एकत्र मीडियासमोर आले. दोघांचीही जोडी नजर लागण्यासारखी आहे असंच त्यांच्या चाहत्यांना यावेळी वाटले आणि तेव्हापासूनच दरवर्षी ही जोडी नक्की लग्नबंधनात कधी अडकणार याबाबत चर्चा सुरू झाली. सुरूवातील एकत्र आले असले तरीही आपले नाते हे नवे असून त्यासाठी काही काळ जायला हवा असे एका मुलाखतीमध्ये रणबीरने सांगितले होते आणि त्यानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहिले गेले.
संकटातही आलिया होती एकत्र
रणबीरच्या वडिलांना अर्थात ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना झालेल्या कॅन्सरच्या आजारानंतरही आलिया कपूर कुटुंबीयांबरोबर ठामपणाने उभी राहिली. नीतू कपूर, रिद्धीमा कपूर साहनी यांना तिने अत्यंत ठामपणाने पाठिंबा दिला. तसंच रणबीरला खंबीरपणाने साथ देत उभी राहिली. त्यामुळेच या दोघांमधील केमिस्ट्री अधिक फुलत गेली. रणबीर आणि आलिया अनेक वेळा एकत्र दिसून आले. त्याशिवाय अनेक पुरस्कार सोहळ्यातही आलियाने बिनधास्तपणे रणबीरविषयी आपले प्रेम व्यक्त केले असल्याचे दिसून आले आहे.
कपूर घराण्याच्या कार्यक्रमांनाही हजेरी
आलियाने त्यानंतर रणबीरबरोबर कपूर घराण्याच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे लवकरात लवकर आता हे दोघे लग्न करणार अशा चर्चांना ऊत यायला लागला. तर आता प्रत्येकी दिवशी आलिया – रणबीरच्या लग्नाच्या तयारीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अजूनही नक्की लग्नाची तारीख कोणती हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे ही जोडी कधी लग्न करणार आणि यांच्या लग्नाचे फोटो कसे असतील या सर्वाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक