ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Ranbir Kapoor is planning to go on a week long honeymoon with Alia after Shamshera release in marathi

शमशेरा प्रदर्शित होताच रणबीर कपूर घेणार मोठा ब्रेक

अभिनेता रणबीर कपूर चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर शमशेरामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र शमशेरा प्रदर्शित होताच तो पुन्हा एकदा मोठ्या ब्रेकवर जाणार अशी चर्चा आहे. मात्र यासाठी चाहत्यांना चिंता वाटण्याचं कारण नाही. कारण यावेळी तो आलियासह वेकेशनवर जाण्यासाठी सुट्टी घेत आहे. आलियासोबत हनिमूनवर जाण्यासाठी तो आठवडाभर ब्रेक घेणार आहे.आलिया आणि रणबीरने एप्रिल महिन्यात लग्न केलं होतं. लवकरच त्यांच्या घरी नवीन पाहुणादेखील येणार आहे. मात्र असं असलं तरी अजूनही ती दोघं हनिमूनला गेलेले नाहीत. म्हणूनच रणबीरने आलियासाठी हे वेकेशन प्लॅन केलं आहे.

रणबीर आणि आलियाचा हनिमून ब्रेक

रणबीरने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार लवकरच तो आलियासह हनिमून ब्रेकवर जाणार आहे. शमशेरा प्रदर्शित होताच रणबीर आलियाला एकांतात वेळ घालवण्यासाठी वेकेशनवर घेऊन जाणार आहे. आलिया आणि रणबीरने अचानक लग्नाचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे त्यांना लग्न घाईघाईत करावं लागलं. लग्न झालं तेव्हा दोघांच्याही वर्क कमिटमेंट होत्या. ज्या पूर्ण करणं गरजेचं असल्याने त्यांनी लग्नानंतर हनिमूनला जाणं टाळलं होतं. मात्र त्यानंतर काहीच दिवसांमध्ये आलिया प्रेगनंट असल्याचं जाहीर करण्यात आलं. आता बाळाच्या जन्माआधी तरी रणबीरला आलियासोबत हनिमूनला न्यायचं आहे. आलियाने लग्नानंतर लगेच गूडन्युज शेअर करत कपूर आणि भट कुटुंबाला आनंदाचा धक्का दिला आहे. त्यामुळे रणबीरने आलियासोबत हा आनंद शेअर करण्यासाठी काहीतरी खास नक्कीच प्लॅन केलं आहे. रणबीर आलियासह कुठे हनिमूनला जाणार हे जाहीर झालेलं नसलं. तरी तो आता आलियासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी लॉंग वेकेशनवर जाण्याची शक्यता नक्कीच आहे. कारण आता आलियाही थोड्या आरामाची आणि आनंदी राहण्याची गरज आहे. लवकरच ज्यु. कपूरचा जन्म होणार असून दोघांच्याही आयुष्यात ही एक मोठी गोष्ट असणार आहे.

कधी होणार शमशेरा प्रदर्शित

रणबीर कपूरचा शमशेरा 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर सध्या खूप मेहनत घेत आहे. शमशेरामध्ये रणबीरसोबत संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील आहे. या पूर्वी रणबीर 2018 मध्ये संजू चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यानंतर जवळजवळ चार वर्षे रणबीरने चित्रपटात काम करणं टाळलं होतं. आता खूप मोठ्या ब्रेकनंतर तो पुन्हा एकदा शमशेरा आणि ब्रम्हास्त्र या दोन चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ब्रम्हास्त्र चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर आणि आलियाची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT