ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Randeep Hooda

महेश मांजरेकरांच्या वीर सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डा साकारणार मुख्य भूमिका

सरबजीत’ चित्रपटासाठी भूमिकेला न्याय मिळावा आपल्या शरीर पूर्णपणे अस्थिपंजर करून घेणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मेहनती व गुणी अभिनेता रणदीप हुड्डा हा आता आणखी एका खास चित्रपटात दिसणार आहे. हा ही चित्रपट एक बायोपिकच असणार आहे. आपली प्रतिभा आणि उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान प्रस्थापित करणारा रणदीप आता एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहे. ज्यांनी त्यांच्या अमूल्य कष्ट आणि बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले, ज्यांनी देशासाठी अत्यंत खडतर अशी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली अशा  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा दिसणार आहे.

पुन्हा एकदा कठीण प्रोजेक्टची केली निवड 

2020 साली रणदीप हुड्डाचा Extraction हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. या चित्रपटात रणदीप बरोबर नेहा महाजन सुद्धा होती तसेच थॉर म्हणून ओळखला जाणारा मार्व्हल हिरो क्रिस हेमस्वर्थ देखील होता. आता रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील हा बायोपिक करण्यास होकार दिला आहे. अर्थात त्याला याची पूर्ण कल्पना आहे की त्याने पुन्हा एकदा खूप कठीण काम हाती घेतले आहे, परंतु रणदीपचे म्हणणे आहे की असेच काम केले पाहिजे ज्यामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागतो.

रणदीप हुड्डा

रणदीपची उंची वीर सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटते. हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार आहेत. ते म्हणतात की, “आतापर्यंत ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले आहे, त्या कथा नव्या पिढीला सांगण्यासाठी सध्याचे युग हीच योग्य वेळ आहे. वीर सावरकर ही एक ज्वलंत कथा असेल जी आपल्याला आपल्या इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी करण्यास भाग पाडेल. आम्ही या चित्रपटावर काम सुरू केले याचा मला आनंद आहे.”  चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच शूटिंग सुरू होईल असा अंदाज आहे. 

रणदीपने ट्विटरवरून शेअर केली माहिती 

रणदीपने त्याच्या ट्विटर व इंस्टाग्राम हॅन्डलवरून बुधवारी ही माहिती सगळ्यांशी शेअर केली. या पोस्टमध्ये रणदीपने लिहिले की,  “कुछ कहानी बताई जाती है और कुछ जी जाती हैं! (म्हणजेच काही कथा सांगितल्या जातात आणि काही जगल्या जातात). #SwatantraVeerSavarkar च्या बायोपिकचा भाग बनल्याबद्दल कृतज्ञ, उत्साहित आणि सन्मानित आहे.”

ADVERTISEMENT

अभिनेता रणदीप हुड्डा आनंदी आहे की त्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तीची भूमिका करण्यासाठी निवडण्यात आले आहे. रणदीप म्हणाला की, “असे अनेक वीर आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली पण सर्वांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत. विनायक दामोदर सावरकर या शूरवीरांपैकी एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांची कहाणी जगाला सांगायलाच हवी.  स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते संदीप सिंग यांच्याबरोबर मी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे आणि आमची जोडी नेहमीच हिट ठरली आहे.” या जोडीने यापूर्वी सरबजीत या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. 

लवकरच सुरु होणार चित्रीकरण 

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी जून महिन्यापासून सुरू होणार असा अंदाज आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरील विविध ठिकाणी त्याचे चित्रीकरण होणार आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला वेगळ्या स्पेक्ट्रममधून अधोरेखित करेल. चित्रपटाविषयी बोलताना निर्माते संदीप सिंग म्हणाले की, “भारतात असे खूप कमी कलाकार आहेत जे आपल्या प्रतिभेने जादू निर्माण करू शकतात आणि रणदीप त्यापैकी एक आहे. वीर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी मी फक्त रणदीपचाच विचार करू शकतो. वीर सावरकरांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, मला आश्चर्य वाटते की आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वीर सावरकरांचा उल्लेख का नाही?” 

स्वातंत्र्यवीर सावरकर

रणदीप मागच्या वर्षी सलमान खानच्या ‘राधे’ मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला होता. त्याच्या आगामी कॉमेडी अनफेअर अँड लव्हली या चित्रपटात तो इलियाना डिक्रूझबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
23 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT