ADVERTISEMENT
home / Festival
gudhi-padwa-designs-in-marathi

गुढीपाडव्यासाठी‌ ‌खास‌ ‌रांगोळी‌ ‌डिझाईन्स‌ ‌| Rangoli‌ ‌Designs‌ ‌For‌ Gudi Padwa

हिंदू धर्मातील सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे ‘गुढीपाडवा’. चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला हा  दिवस येतो. गुढीपाडवा या शब्दाची फोड केली असता गुढी या शब्दाचा तेलुगू भाषेतील अर्थ ‘काठी’ असा होतो. तसंच तोरण असाही होतो. या दिवशी प्रत्येक घरावर या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी उभारण्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये देखील आहे. पण सर्व साधारणपणे प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. एका राक्षसाचा अंत आणि देवांचा विजय असा हा दिवस असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने गुढी उभारुन साजरा केला जातो. मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे.नवे वर्ष नवा उत्साह म्हणत सगळेच मोठ्या आनंदाने या सणाची तयारी करतात. या दिवशी दाराबाहेर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. आनंद आणि उर्जेचे प्रतीक असलेल्या रांगोळी काढण्याचा विचार असेल तर आम्ही काही खास रांगोळी डिझाईन्स निवडल्या आहेत. त्या काढून तुम्ही तुमचा दिवस अधिक प्रसन्न करु शकता. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन हा आनंदोत्सव साजरा करु शकता.

 गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 1- पळी वापरून गुढीची रांगोळी

हल्ली रांगोळी काढणे म्हणजे खूप कला असायला हवी असे काहीच राहिले नाही. अगदी लहान सहान ट्रिक्स फॉलो करुन तुम्ही मस्त गुढीपाडवा रांगोळी काढू शकता. पळीच्या मदतीने अगदी काहीच मिनिटात तुम्हाला अशी मस्त गुढीपाडवा रांगोळी काढता येते. त्यासाठी एक पळी किंवा डाव तुम्हाला लागेल. तो रांगोळी काढण्याच्या ठिकाणी उलटा ठेवून त्याच्या आकार रांगोळीने काढून घ्यायचा आहे. गुढीचा आकार त्यातून काढणे खूप सोपे जाते. ही ट्रिक फार सोपी आणि कोणालाही वापरता येईल अशी आहे. 

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 2 – फ्री हँड रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी
फ्री हँड रांगोळी – गुढीपाडवा रांगोळी

गुढीपाडव्याच्या दिवशी सुंदर अशा गुढीची रांगोळी थोडी वेगळ्या पद्धतीने काढण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशी सुंदर डिझाईन देखील रेखाटू शकता. या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा सगळा शो त्या गुढीच्या साडीवर आहे. गुढीची साडी तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. पण ही रांगोळी कठीण आहे. थोड्याशा सरावाने तुम्हाला ही रांगोळी छान काढता येईल. निवडलेला साडीचा रंग आणि त्याच्या आजुबाजूला जातील असे गडद आणि फिक्कट रंग तुमच्याकडे असायला हवे. म्हणजे साडीची छटा त्यामध्ये छान येते.ही रांगोळी तुम्हाला खडूने आधी काढता येईल मग एक एक करुन त्यामध्ये रंग भरता येतील.

टीप: ही रांगोळी काढताना रंग गडद आणि रंगसंगती चांगली निवडा.

ADVERTISEMENT

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 3 – गणपतीची रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन
गणपतीची रांगोळी – गुडीपाडवा रांगोळी

 कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होत असते. अशा लाडक्या बाप्पाची रांगोळी काढायची असेल तर तुम्हाला ही डिझाईन नक्कीच मदत करु शकेल. तुम्हाला गणपतीची रांगोळी काढण्यासाठी खडूचा उपयोग करायला लागतो. खडूने आधी तुम्हाला हवा असा बाप्पा रेखाटून घ्या. मग त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर रंग किंवा अशा पद्धतीने डाळी वापरुन रांगोळी काढा. डाळी वापरणार असाल तर तुम्ही ती पुठ्ठयावर काढू शकता. डाळी चिकटवू देखील शकता. त्यामुळे ती तुम्हाला कधीही वापरता येते.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 4 – पाना फुलांची  रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी
पाना फुलांची  रांगोळी – गुढीपाडवा रांगोळी

पाना फुलांशिवाय कोणतीही रांगोळी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सोपी आणि साधी रांगोळी काढायची असेल तर तुम्हाला पाना फुलांच्या रांगोळीचा आधार घेता येईल. यातील कोणतीही रांगोळी डिझाईन तुम्ही काढू शकता. जर तुम्हाला फ्रि हँड रांगोळी काढता येत असेल तर थेट तुम्ही रांगोळीच्या मदतीने पानाफुलांची रांगोळी देखील काढू शकता.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 5 – सोपी रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन
सोपी रांगोळी – गुडीपाडवा रांगोळी डिझाईन


हल्ली रांगोळी काढण्यासाठी अगदी सोप्या सोप्या ट्रिक्स वापरल्या जातात. म्हणजे नुसते ठिंब काढून देखील त्यापासून रांगोळी काढली जाते. तुम्हाला अजिबात रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही जाळी आणि ठिपक्यांचा उपयोग करुन अगदी अशी सोपी रांगोळी डिझाईन काढू शकता. ही रांगोळी छान दिसते.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 6 – खडूची रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी
खडूची रांगोळी

खूप जणांना रांगोळीची चरचर पायाला लागलेली आवडत नाही किंवा ज्यावेळी तुमच्याकडे रांगोळी उपलब्ध नसेल अशावेळी तुम्ही मस्त  खडूची रांगोळी देखील काढू शकता. खडूची रांगोळी काढायची असेल तर तो खडू ओला करुन घ्या आणि त्यानंतर रांगोळी काढा म्हणजे ती रांगोळी चांगली टिकते. खूप ठिकाणी अशी पांढरी रांगोळी काढताना पीठाचा वापर केला जातो. त्यावेळी बोटाने ही रांगोळी काढली जाते जी खूपच सुंदर दिसते.

ADVERTISEMENT

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 7 – गोल रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन
गोल रांगोळी – गुढीपाडवा रांगोळी

 गोल रांगोळी म्हणजे काहीही वेगळे नाही. तुम्हाला अगदी फ्रि हँड पद्धतीने गोल रांगोळी काढता येते. यासाठी तुम्हाला ताट किंवा गोलाकार कोणत्याही वस्तूचा वापर करु शकता. गोल आकार काढून झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार रांगोळीची डिझाईन काढू शकता.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 8 – ठिपक्यांची रांगोळी

गुढीपाडवा रांगोळी
ठिपक्यांची रांगोळी

 ठिपक्यांची रांगोळी ही अगदी ट्रेडिशनल अशी रांगोळी आहे.यासाठी खास ठिपक्यांचा कागद मिळतो. कमीत कमी ठिपक्यांपासून तुम्ही या रांगोळी काढू शकता. पूर्वी दिवाळीत ठिपक्यांची मोठी मोठी रांगोळी काढण्याची जणू स्पर्धा असायची. पण आता कोणी फारशी अशी रांगोळी काढताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही ठिपक्यांची रांगोळी एखाद्या पुस्तकात पाहून देखील काढू शकता.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 9 – झाकणाच्या मदतीने रांगोळी

युट्युब किंवा कोणत्याही सोशल मीडियावर गेलात की तुम्हाला वेगवेगळ्या साहित्याचा वापर करुन रांगोळी काढता येऊ शकतो. हल्ली वेगवेगळी झाकणं वापरुन म्हणजे त्याचा आकार लक्षात घेऊन मग त्यानुसार तुम्हाला डिझाईन ठरवायची असते. तुम्ही थोडे डोकं लावून अशापद्धतीने रांगोळी काढू शकता.

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन 10 – संस्कारभारती

गुढीपाडवा रांगोळी डिझाईन
संस्कारभारती रांगोळी

संस्कारभारती रांगोळी काढणे ही एक कला आहे. पण हल्ली जाळी, पेन असे काही साहित्य मिळत असल्यामुळे तुम्हाला याच्या डिझाईन्स काढणे फारच सोपे जाते. त्यामुळे अगदी सोप्या सोप्या डिझाईन्सनी तुम्ही संस्कारभारती रांगोळीची सुरुवात करु शकता. इतकेच नाही तर ही रांगोळी रंगसंगतीही खूप महत्वाची असते.

ADVERTISEMENT
06 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT