ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
rani-lakshmibai-information-in-marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | Zashichi Rani Information In Marathi

‘मेरी झाशी नही दूँगी’ हे वाक्य आजही ऐकलं की अंगात एक वीज संचारते. झाशीची राणी लक्ष्मीबाई (Jhansi Chi Rani Lakshmibai) यांनी आपल्या झाशीबाबत काढलेले हे उद्गार आजही तितकेच जागृत आहेत. झाशीच्या राणीचा इतिहास हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आहे. इतिहासाच्या पुस्तकात झाशीच्या राणीबाबत माहिती असतेच. पण झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती (Zashichi Rani Information In Marathi) तुम्हाला पूर्णतः माहीत आहे का? झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती या लेखातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर अर्थातच झाशीची राणी लक्ष्मीबाई तांबे. 1857 साली हिंदुस्थानात झालेल्या स्वातंत्र्य उठावातील लक्ष्मीबाई हा एक अग्रणी सेनानी होत्या. क्रांतीकारकांची स्फूर्तीदेवता असे अढळ स्थान लक्ष्मीबाईंना प्राप्त झाले. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती थोडक्यात | Overview Of Zashichi Rani In Marathi

नाव (Name)मणिकर्णिका तांबे 
जन्मगाव (Birth Place)काशी, उत्तर प्रदेश 
लग्नानंतरचे नाव (After Marriage Name)राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
पतीचे नाव (Husband’s Name)महाराज गंगाधरराव नेवाळकर
टोपण नाव (Pet Name)मनू
वाढदिवस (Birthday)19 नोव्हेंबर, 1835 
वडिलांचे नाव (Father’s Name)मोरोपंत तांबे
आईचे नाव (Mother’s Name)भागीरथी तांबे
मुले (Children)दत्तक पुत्र – दामोदरराव, आनंदराव
कौशल्य (Skills)घोडस्वारी, धनुर्विद्या, मल्लखांब
मृत्यू दिन (Death Date)18 जून, 1858
मृत्यूचे ठिकाण (Death Place)कोटाजवळ, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश 
झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती

झाशीच्या राणीचा जन्म आणि लहानपण | Birth & Childhood Of Jhashichi Rani In Marathi

झाशीच्या राणीचा जन्म आणि लहानपण
झाशीच्या राणीचा जन्म आणि लहानपण

पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांची मुलगी मनिकर्णिका अर्थात राणी लक्ष्मीबाई. मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील कोट गावातील होते. झाशीच्या राणीचा जन्म हा उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. महाराष्ट्रीयन ब्राम्हण कुटुंबातील मणिकर्णिकेचे लाडाचे नाव मनू होते. तर तिच्या आईचे नाव भागीरथी होते. मात्र मनू चार वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मनू आपल्या वडिलांसोबत अधिक काळ पेशव्यांच्या दरबारात घालवत होत्या असं इतिहासात सांगण्यात येते. 19 नोव्हेंबर रोजी मणिकर्णिकेचा जन्म झाला मात्र 1828 ते 1835 या काळातील त्यांचा जन्म आहे असं सांगण्यात येते. वडिलांबरोबर पेशव्यांच्या दरबारात जात असल्यामुळे लक्ष्मीबाईंना अनेक कला प्राप्त झाल्या होत्या असंही सांगण्यात येतं. याशिवाय अत्यंत हुशार असल्यामुळे आपल्या हुशारीने मणिकर्णिकाने त्यावेळी सगळ्यांचे मन जिंकून घेतले होते. याशिवाय अभ्यासात आणि अनेक कलांमध्ये पारंगत असल्याने त्यांचे सगळ्याच ठिकाणी कौतुक व्हायचे असंही इतिहासात मांडण्यात आलं आहे. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती देताना ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि धोरणी, तसंच अंगी नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. मात्र राजघराण्यात लहानपणापासून वावरल्यामुळे त्यांना राजघराण्यातील सर्व रितीरिवाज माहीत होते आणि राजघराण्यात शिकविण्यात येणाऱ्या कलाही अवगत होत्या. तर त्या काळी महाराणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, सयाजी शिंदे आणि श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे यांच्याव्यतिरिक्त उत्तम अश्वपरीक्षा करणारे व्यक्तिमत्व नव्हते असे सांगण्यात येते. राणी लक्ष्मीबाई यांचे शासकीय नावे खूपच मोठे होते. हे नाव सामान्य माणसाला वाचतानाही नक्कीच दम लागेल. ज्याप्रमाणे कर्तृत्व त्याचप्रमाणे राणीचे नाव 

राणीचे शासकीय नाव – स्वातंत्र्यलक्ष्मी बुंदेलखंड धराधरीश्वरी राजराजेश्वरी सिंहासनाधिश्वरी झाशीची राज्ञी श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न कांक्षीणी वज्रचुडेमंडित राजश्रीयाविराजीत सकलगुणमंडित सकललक्ष्मीअलंकृत पुण्यश्लोक राजमाता वीरांगना महाराज्ञी श्री राज्ञी लक्ष्मीबाई साहेब नेवाळकर महाराज

ADVERTISEMENT

राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह | Wedding Of Rani Lakshmi Bai In Marathi

राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह | Wedding Of Rani Lakshmi Bai In Marathi
राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी माहिती – राणी लक्ष्मीबाईंच्या काळात बालविवाह करण्याची प्रथा होती. त्यामुळे 1842 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी मनूचे लग्न झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करण्यात आले. लग्नानंतर मनूचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी विशेष आत्मीयता आणि प्रेम निर्माण झाले. दरबारात त्याकाळी राणी लक्ष्मीबाई काम पाहात असत, पण दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधरराव यांना अजिबात आवडत नव्हते. तर लग्नानंतरही राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत व्यायाम, कसरत, घोडस्वारी, तलवारबाजी या शिक्षणात घालवला. 

साधारण 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधर यांना एक मुलगा झाला. मात्र चारच महिन्यात या बालकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या विरहाने गंगाधार आजारी पडले. त्यानंतर त्यांनी आपला भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले. लक्ष्मीबाईच्या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर त्वरीतच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. 

झाशीच्या राणीच्या घोड्याची माहिती (घोड्याचे नाव)

झाशीच्या राणीच्या घोड्याची माहिती (घोड्याचे नाव)
झाशीच्या राणीच्या घोड्याची माहिती (घोड्याचे नाव)

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती जाणून घेताना त्यांचा सर्वात आवडता असणाऱ्या घोड्याची माहिती विसरून कसे चालेल. झाशीची राणी ची माहिती जाणून घेताना त्यांच्याविषयी ही माहीत असायलाच हवी. अत्यंत लहानपणापासून झाशीची राणी या स्वतंत्र विचाराच्या होत्या. स्त्री आणि पुरूष समांतर असून दोघांनाही समान कामं करता येतात असं राणीचं मत होतं. यामुळेच राणी लक्ष्मीबाईने लहानपणीपासूनच घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं. झाशीच्या राणीचा आवडता घोडा होता. ज्याचे नाव बादल असे होते. अनेक वर्षांपासून राणीकडे हा घोडा होता आणि राणीने त्याच्यावर जीवापाड प्रेम केले असंही सांगण्यात येते.

झाशीच्या राणीकडे असणारे कौशल्य | Skills Of Jhashichi Rani Lakshmi Bai In Marathi

पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये अत्यंत धोरणीपणाने वागणारी राणी होती राणी लक्ष्मीबाई. घोडेस्वारी करण्यात लक्ष्मीबाई अत्यंत वाकबगार होत्या. याशिवाय राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रांमध्येही प्राविण्य मिळविले होते. बाजीरावांकडे काम करणारे बाळंभट देवधर हे त्याकाळी उत्तम कुस्तीगीर आणि कसरतपटू वाखाणण्यात आले होते. त्यांनीच मल्लखांब हा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. तर आपल्या मनाची एकाग्रता, अत्यंत चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे उत्तम कौशल्य, काटकपणा अशा कौशल्यामुळे मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या होत्या. त्यामुळेच लग्न झाल्यानंतरही दरबारातील कामामध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी नेहमीच लक्ष घातले आणि आपल्या प्रजेचे मनही जिंकून घेतले. झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती जेव्हा आपण देतो तेव्हा त्यांच्या कौशल्याबाबत प्रत्येकाला माहिती असायला हवी. 

ADVERTISEMENT

राणी लक्ष्मीबाईंचा इंग्रजांशी झालेला संघर्ष | Struggle Of Jhashichi Rani Lakshmi Bai In Marathi

राणी लक्ष्मीबाईंचा इंग्रजांशी झालेला संघर्ष | Struggle Of Jhashichi Rani Lakshmi Bai in Marathi
राणी लक्ष्मीबाईंचा इंग्रजांशी झालेला संघर्ष

आपले पती गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी कार्याचा पदभार स्वीकारला. 18 व्या वयातच झाशीच्या उत्तराधिकारी झाल्यानंतर त्यांना जनतेची अत्यंत काळजी घ्यावी लागली. राज्यकारभार हातात आला तेव्हा राज्याची आणि प्रजेचीही अवस्था चांगली नव्हती. पण आपल्या दयाळू स्वभावामुळे राणी प्रजेची अत्यंत आवडती झाली. त्यावेळी भारताचा गव्हर्नर असणारा लॉर्ड डलहौसीने नियम केला की, कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी हा राजाचा मुलगाच राहील. जर तसे नसेल तर राज्य खालसा करण्यात येईल आणि राजाच्या कुटुंबाला आर्थिक खर्चासाठी पेन्शन देण्यात येईल. त्यामुळे डलहौसीने गंगाधररावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. 

पूर्वीपासून झाशीचे ब्रिटिशांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. तर यासाठी स्वतः लक्ष्मीबाई ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारांमधून लक्ष्मीबाई यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा उघड केला. तर त्यांनी दिलेल्या एका पत्रामध्ये झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल आणि परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल विश्वास वाटेल का? अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हानच दिले होते. कंपनी सरकारच्या बेजबाबदार आणि अनैतिक कृत्यांना न घाबरणाऱ्या आणि कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या स्वाभिमानी राणीने “मी माझी झाशी देणार नाही” असं म्हणून ब्रिटीशांना आव्हानच दिले होते आणि इंग्रजांशी संघर्ष करण्यासाठी ही कर्तृत्वावान राणी तयार झाली. 

तर राणीने लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश शासनाविरुद्ध लंडनमध्ये खटला दाखल केला. पण इंग्रजांनी हा खटला खारीज केला आणि आदेश दिला की, महाराणी लक्ष्मीबाईने झाशी सोडून राणी महालात जाऊन राहावे. त्याबदल्यात त्यांना दरमहा 60,000/- रुपये पेन्शन देण्याचा निर्णयही यामध्ये आला. या निर्णयानंतरदेखील लक्ष्मीबाई झाशी न देण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या. या संघर्षानंतरही झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना काही काळ किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले राणी लक्ष्मीबाई यांना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले.

1857 चा उठाव

इ.स. 1857 चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्तानात झाला आणि हा उठाव इतिहासात अजरामर झाला. या विद्रोहाची सुरुवात मेरठमध्ये झाली. बंदुकांच्या नव्या गोळ्यांवर डुक्कर आणि गाईचे मांस लावण्यात आले होते ज्यामुळे या विद्रोहाला सुरूवात झाली. हिंदूच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचल्यामुळे विद्रोह देशभरात पसरला. .तर झाशीमधील केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावल्याचा उल्लेख इतिहासात आहे. या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी तात्पुरते झाशीचे राज्य राणी लक्ष्मीबाईच्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला होता. 22 जुलै 1857 रोजी लक्ष्मीबाई यांनी झाशीचे राज्य चालवायला घेतले. पण त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती होती आणि त्यावेळी त्यांच्या खजिन्यात ना पैसा होता, ना मनुष्यबळ. तर झाशीच्या प्रजेमध्ये असंतोष आणि असुरक्षितता पसरली होती. 1857 मध्ये झाशीच्या शेजारच्या राज्यांनी झाशीवर आक्रमण केले. दरम्यान राणी लक्ष्मीबाईंना शेजारचे राज्य ओरछा आणि दतिया यांच्या राजाशी युद्ध करावे लागले होते. 

ADVERTISEMENT

काल्पीचे युद्ध

झाशी येथील युद्धात हरल्यानंतर लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपे आणि आपल्या दलासोबत जवळ पास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार केले.  त्यानंतर लक्ष्मीबाई काल्पी येथे येऊन पोहचल्या. तेथील पेशव्यांनी सदर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आपल्याकडे शरण दिले आणि आपल्याकडील सैन्यबलही उपलब्ध करून दिले. 22 मे 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने काल्पीवर आक्रमण केले. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने अदभुत वीरता दाखवत त्यांना हरवले होते. हा इतिहास आजपर्यंत आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. मात्र काही वर्षानंतर सर ह्यु रोजने पुन्हा एकदा आक्रमण केले आणि त्यावेळी मात्र राणी लक्ष्मीबाईंना अपयशाचा सामना करावा लागला होता. युद्धात हरल्यानंतर राणीने आपल्या प्रमुख सैनिकांना ग्वाल्हेरवर अधिकार प्राप्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर तात्या टोपे आणि इतर प्रमुख सैनिकांना एकत्र आणून लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेरवर आक्रमण केले आणि त्यावेळी तेथील राजाला लढाईत पराभूत करून हे राज्य काल्पीच्या पेशव्याच्या स्वाधीन केले होते. 

राणीचा लढा

राणी लक्ष्मीबाईने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटीशांशी लढा दिला. वयाच्या तेविसाव्या वर्षी वीर मरण राणीने स्वीकारले. युद्धात लढता लढता राणीने प्राण गमावला. मात्र तिने शेवटपर्यंत आपल्या साम्राज्यासाठी लढा दिला. त्यामुळेच इतिहासात अगदी अभिमानाने राणी लक्ष्मीबाईंचे नाव घेतले जाते. राणीने दिलेला लढा हा इतिहासात अजरामर ठरला आणि अगदी शत्रूलादेखील तिच्या वीरमरणाची दखल घ्यावी लागली आणि कौतुक करावे लागले असाच राणीचा लढा होता असे इतिहासातही नमूद आहे. 

झाशीच्या राणीच्या मृत्यूचा इतिहास | Jhashichi Rani Lakshmi Bai Death In Marathi

झाशीच्या राणीच्या मृत्यूचा इतिहास | Jhashichi Rani Lakshmi Bai Death In Marathi
झाशीच्या राणीच्या मृत्यूचा इतिहास

ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने आपल्या सैन्यासह 18 जून, 1858 साली सकाळीच ग्वाल्हेरवर हल्ला केला जिथे राणी लक्ष्मीबाई राहात होत्या. मात्र अशावेळी घाबरून न जाता, लक्ष्मीबाईंनी रणांगणामध्ये धाव घेतली आणि आपल्यासमोर येणाऱ्या इंग्रजांच्या सैन्याला तलवारीने सपासप कापत निघाली. लक्ष्मीबाईंकडे नवी सैन्याची तुकडी नव्हती. तर राणीचा जुना घोडा राजरतन युद्धात मारला गेला होता आणि त्यांचा नवा घोडा पुढे सरकायला तयरा नव्हता. त्यामुळे हे आपले अखेरचे युद्ध आहे याची जाणीव लक्ष्मीबाईंना त्याचवेळी झाली होती. मात्र हार न मानता राणी लढत राहिली. घोड्यावरून खाली कोसळून राणी युद्धात संपूर्णतः जखमी झाली होती. तर त्यांच्या डाव्या कुशीमध्येही तलवार घुसली होती. मात्र पुरूषी वेशात असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज ओळखू शकले नाहीत आणि अशा घायाळ अवस्थेत असणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यांच्या सैनिकाने मठात आणले. पण आपल्यावर उपचार व्हावेत अशी राणीची इच्छा नव्हती. तर आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये ही त्यांची शेवटची इच्छा असल्याने त्यांच्या सेवकानेच त्यांना मुखाग्नी दिला असे सांगण्यात येते. ग्वाल्हेरमधील फुलबागमध्ये लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. झुंजार अशा या राणीमुळे नेहमीच प्रत्येक स्त्री ची नाही तर अगदी प्रत्येक भारतीयाचा मान आजही ताठ उभी राहाते आणि गर्वाने छाती फुलून येते. 

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला आहे. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य आणि पोवाडेही रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठीही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला.

ADVERTISEMENT

झाशीच्या राणीवर लिहिण्यात आलेली पुस्तके | Books On Jhashichi Rani In Marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती अधिक जाणून घ्यायची असेल तर आपल्याला मराठी साहित्यात अनेक पुस्तकांचा आधार घेता येतो. त्यापैकी काही पुस्तकांची यादी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हालाही झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी माहिती अधिक जाणून घ्यायची असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये ही पुस्तके असायलाच हवीत. 

  1. The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका महाश्वेता देवी) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता
  2. झाशी : 1857 – लेखक अविनाश वासुदेव पुराणिक
  3. झाशीची रणचंडी : कादंबरी : लेखक पोपटराव भसे
  4. झाशीची राणी, ताराबाई मोडक, माधव जुलियन – चरित्रे तीन पुस्तके एकत्रित (ललितकला शुक्ल, 1996)
  5. झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक दा.वि. कुलकर्णी
  6. झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वि.श्री. जोशी
  7. झाशीची राणी लक्ष्मीबाई’ : लेखक म.स. भावे
  8. झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखिका प्रतिभा रानडे
  9. झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वृंदावनलाल वर्मा
  10. झाशीची वाघीण : लेखक भास्कर महाजन
  11. झाशी राणी लक्ष्मीबाई : हिंदी पु्स्तक. लेखक : रामप्रसाद एन.एस.
  12. झाशीची राणी : झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र : लेखक दत्तात्रेय बळवंत पारसनीस
  13. मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : विद्याधर गोखले
  14. मर्दानी रणरागिणी … : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे
  15. वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक वि.वा. शिरवाडकर)
  16. वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता
  17. समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक भा.द. खेर

प्रश्नोत्तरे (FAQs) – झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | Zashichi Rani Information In Marathi

प्रश्नः लक्ष्मीबाईंच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय किती होते?
उत्तरः लक्ष्मीबाईंचा बालविवाह गंगाधरराव नेवाळकर यांच्यासह झाला होता. जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा राणी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षांच्या होत्या. 

प्रश्नः लक्ष्मीबाईंचे सर्वाधिक कौशल्य कशात होते?
उत्तरः राणी लक्ष्मीबाईंना लहानपणापासूनच घोडेस्वारीचे वेड होते आणि त्यांचे घोडेस्वारीमध्ये कौशल्यदेखील होते. त्यांना घोड्यांची खूपच चांगली पारख होती असे म्हटले जात होते. 

प्रश्नः शिक्षणाशिवाय लक्ष्मीबाई कोणत्या विद्येत निपुण होत्या?
उत्तरः शिक्षणासोबत लक्ष्मीबाईंनी आत्मरक्षा, घोडेस्वारी, धनुर्विद्या याचंदेखील प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे त्या शस्त्रविद्येतदेखील प्रवीण झाल्या होत्या. 

ADVERTISEMENT

निष्कर्ष – झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती (Zashichi Rani Information In Marathi) जाणून घेण्यासाठी तुम्ही या लेखाचा आधार नक्की घेऊ शकता. वीरांगना असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. अशी वीरांगना पुन्हा होणे नाही. झाशीच्या राणीला मानाचा मुजरा!

08 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT