बॉलीवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी मुंबई रिसेप्शनमध्ये ही पुन्हा एकदा शाही अंदाजाला प्राधान्य दिले. एकीकडे हे दोघंही राजा आणि राणीसारखे दिसत होते. तर दुसरीकडे रिसेप्शनला आलेले पाहुणे ही दिसले खास ब्लॅक आणि व्हाइट थीममध्ये. ज्यामुळे अगदी बुद्धीबळाच्या पटासारखा भास होत होता.
सोशल मीडियावर दुसऱ्या रिसेप्शनचे फोटो येताच दोघांच्या लुकची खूप वाहवा झाली. आपल्या रॉयल आणि हटके अंदाजाने #DeepVeerने पुन्हा एकदा सगळ्यांचे मन जिंकले. दीपिका आणि रणवीर सिंग यांचं दुसरं ग्रॅंड रिसेप्शन काल मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये झालं. हे खास फंक्शन रणवीरच्या कुटुंबियांनी आपल्या नव्या सूनेच्या स्वागतासाठी ठेवलं होतं. या आधी दीपिकाच्या घरच्यांनी 21 नोव्हेंबरला बंगळूरूमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. ज्यामध्ये कुटुंबियांसकट खेळ जगतातील काही सेलिब्रिटी आले होते.
पाहा दीपिका-रणवीरचा मुंबई रिसेप्शनचा रॉयल लुक
सासूबाई जोरात…
ह्या रिसेप्शन पार्टीमध्ये दीपिका आणि रणवीरसोबतच अगदी उठून दिसत होत्या त्या दीपिकाच्या सासूबाई. रणवीरच्या आईने गोल्डन ब्लॅक ड्रेस घातला होता आणि आपल्या नव्या सूनबाईला अगदी तोडीस तोड दिसत होत्या. पाहा दीपिकाच्या सासूबाईंचा हा लूक –
फोटो सौजन्य – Instagram
पाहुण्यांसाठी होती खास ब्लॅक अॅंड व्हाइट थीम
एकीकडे दीपवीर रॉयल लुकमध्ये शानदार दिसत होते तर दुसरीकडे रिसेप्शनला आलेले पाहूणेही खास ब्लॅक अॅंड व्हाइट थीम ड्रेसमध्ये दिसले. ज्यामुळे अगदी बुद्धीपळाच्या पटाचा भास होत होता. पाहा हा व्हीडीओ –
तुम्हाला माहीत असेलच की, #DeepVeer चं लग्न इटलीतील लेक कोमो येथे 14 आणि 15 नोव्हेंबरला कोकणी आणि सिंधी पद्धतीने पार पडलं होतं. हे रॉयल लग्न अगदी खाजगी रितीने पार पडलं होतं. या लग्नाला दोन्हीकडून फक्त 60 पाहुण्यांना बोलावण्यात आलं होतं. या ठिकाणी मोबाईल न्यायला बंदी घालण्यात आली होती तसंच मीडीयाला ही तब्बल 100 मीटरच्या अंतरावरून फोटो काढण्यास परवानगी देण्यात आली होती.
बॉलीवूड सेलेब्ससाठी दीपवीरने 1 डिसेंबरला रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.
फोटो आणि व्हीडीओ सौजन्य – Instagram