Advertisement

बॉलीवूड

दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकूल व्हाल थक्क

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Sep 15, 2021
दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकूल व्हाल थक्क

बॉलीवूडचे सेलिब्रेटी कपल दीपवीरने सध्या आलिबागच्या एका प्रॉपर्टीमध्ये करोडोंची गुंतवणूक केली आहे. सध्या दोघांनाही रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्यात रस निर्माण झाला आहे. नुकताच या दोघांनी अलिबागमध्ये एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. जिथे नेहमी विकेन्ड अथवा हॉलिडे सेलिब्रेट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे.  या बंगल्याच्या खरेदीतील कायदेशीर गोष्टी पूर्ण करण्यासाठी दोघंही अलिबागमध्ये गेले होते. अलिबागच्या रजिस्टर ऑफिसबाहेर या सेलिब्रेटी कपलने फोटोसेशनही केलं. त्यामुळे आता चाहत्यांना दीपवीर अलिबागला शिफ्ट होणार का असा प्रश्न पडला आहे.

दीपवीरचे घराच्या खरेदीचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघं रजिस्टर ऑफिसमधून बाहेर पडताना आणि मुंबईहून अलिबागला जाताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये दीपवीर एकमेकांचा हात हातात घट्ट पकडताना दिसत आहेत. रणवीरने हुडी परिधान केली आहे तर दीपिकाने सफेद रंगाचा टॉप आणि जीन्स घातलेली आहे. कोरोना काळामुळे दोघांनीही प्रवासात मास्क परिधान केले होते. एका फोटोत रणवीर गाडीत झोपलेला दिसत आहे. ज्या फोटोवर दीपिकाने कॅप्शन दिली आहे ‘मॉर्निंग व्हयू’ यावर रणवीरने जाग आल्यावर ‘बेबी काय हे’ अशा शब्दात प्रतिक्रिया देखील दिली आहे.

दीपिका आणि रणवीर सध्या प्रॉपर्टीमध्ये करत आहेत गुंतवणूक

दीपिका आणि रणवीर सध्या मुंबईत फोर बी एच केच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहतात. जिथे ते त्यांच्या लग्नानंतर शिफ्ट झाले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बंगला दीपवीरने फक्त गुंतवणूक आणि हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी खरेदी केला आहे. मागील काही महिन्यापासून दोघंही रिअल इस्टेटमध्ये भरपूर गुंतवणूक करत आहेत. त्यांनी काही महिन्यापूर्वीच बॅंगलोरला एक महागडी सर्व्हिस अपार्टमेंट खरेदी केली होती. ही प्रॉपर्टी दीपिकाच्या होम टाऊनमध्ये असून तिची किंमत देखील करोडोंच्या घरात आहे. 2014 मध्ये दीपिकाने मुंबईत तिसाव्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत चेव्हा पंचवीस करोड आहे. याच बिल्डिंगच्या तेहतिसाव्या फ्लोअरवर दीपिका सध्या राहत आहे. म्हणजे या ठिकाणी तिच्या दोन प्रॉपर्टी आहेत. दीपिकाचे लंडनमध्येही एक घर आहे. दीपिका आणि रणवीरने मिळून गोव्यातही एक बंगला खरेदी केला आहे. यावरून दीपिका आणि रणवीर सध्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्यात व्यस्त असल्याचं दिसून येतं.