home / बॉलीवूड
रणवीर सिंहला बनवता येतं स्वादिष्ट बटर चिकन, शेअर केली रेसिपी 

रणवीर सिंहला बनवता येतं स्वादिष्ट बटर चिकन, शेअर केली रेसिपी 

अभिनेता रणवीर सिंह एक चांगला अभिनेता तर आहेच पण उत्साहाचा झराही आहे. रणवीरने त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेळोवेळी अनेक चित्रपट हिट केले आहेत. आता हा अष्टपैलू अभिनेता लवकरच त्याच्या आगामी कॉमेडी ड्रामा ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटातून सर्वांना खदखदून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो त्याची सहकलाकार शालिनी पांडेसोबत कपिल शर्मा शोमध्ये दाखल झाला. या शोमध्ये रणवीरने त्याच्या वैयक्तिक जीवनातील अनेक खुलासे केले. ज्यामध्ये तो छान बटर चिकन बनवू शकतो असं त्याने सांगितलं, मात्र त्याच्या स्वयंपाक कौशल्याची स्टोरीदेखील मजेशीर आहे.

रणवीर यासाठी बनवायचा स्वादिष्ट बटर चिकन

रणवीर सिंह शिक्षणासाठी काही वर्ष परदेशात होता. सहाजिकच त्याला तिथे स्वतःची सर्व कामे स्वतःच करावी लागत होती. पण त्याला चांगला स्वयंपाक करता यायचा. याचा फायदा त्याने त्याच्या इतर कामांसाठी करून घेतला. त्याच्यासोबत शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोहत त्याने स्वयंपाकासाठी बार्टर एक्सेंज व्यवहार केला होता. म्हणजे जे विद्यार्थी दिल्ली, लाहोरमधून आले होते. त्यांना त्यांच्या घरच्या जेवणाची सतत आठवण तिथे येत असे. कारण तिकडचं जेवण मसालेदार आणि चमचमीत नसायचं. रणवीरच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे त्याने त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला सुरूवात केली. पण त्याच्या बदल्यात या मुलांना रणवीरचा होमवर्क अथवा इतर कामे करावी लागत असे.

हे आहे रणवीरच्या बटर चिकन रेसिपीचं सिक्रेट

रणवीरच्या स्वयंपाकाची सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्धी झाली होती. त्याच्या हातचं स्वादिष्ट जेवण खाण्यासाठी त्याच्या रूमबाहेर अक्षरशः लाईन लागत असे.  विशेष म्हणजे त्याच्या हातचं बटर चिकन सर्वांना खूप आवडत असे. रणवीर इतका प्रामाणिक आहे की त्याने कपिल शर्मा शोमध्ये या बटर चिकनची रेसिपीपण सांगितली. त्याने हसत हसत सांगितलं की तो यासाठी चक्क रेडिमेड पॅकेट वापरत असे. त्यामुळे त्या रेडिमेड मसाल्यासोबत त्याला फक्त चिकन आणि बटर वापरावं लागत असे. रणवीरची शक्कल आणि रेसिपी ऐकून शोमध्ये सहभागी झालेले प्रेक्षकच नाही तर स्वतः कपिलदेखील हसू आवरू शकला नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

06 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text