खलीबली हो गया है दिल… या गाण्याची क्रेझ अजून काही उतरलेली नाही.अनेक कॉन्ट्राव्हर्सीजनंतर प्रदर्शित झालेला ‘पद्मावत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटातील ग्रे शेड असलेली भूमिका साकारली होती रणवीर सिंहने…या चित्रपटातील हेच ते गाणे … या गाण्यातील मुव्हज शिकवतानाचा एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हारल झाला आहे. क्रिकेटर शिखर धवनला खिलजी मॅन रणवीर सिंहने त्याच्या काही सिग्नेचर स्टेप्स शिकवल्या आहेत.
पाहा व्हिडिओ
काय आहे व्हिडिओमध्ये?
शिखर धवनने हा व्हिडओ गुरुवारी त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.कुठल्याही गाण्याशिवाय यामध्ये दोघेही खिलजीची स्टेप करताना दिसत आहे. शिखऱ धवनने हा व्हिडिओ शेअर करत khoob jamega rang, jab ho gabbar aur khilji sang! Learning each others move असे त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.
अंकिता लोखंडेने केलं सगळ्यांसमोर बॉयफ्रेंडला किस
चुलबुला रणवीर
बॉलीवूडमध्ये जर कोणी चुलबुला असेल तर तो आहे रणवीर.. नेहमीच काही तरी वेगळं करायला त्याला आवडते. त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमधून ते नेहमीच दिसते. त्याच्या ‘gullyboy’ या चित्रपटाचीही क्रेझ अजूनही आहे. त्याच्या चाहत्यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तो त्याच्या वॉलवर हमखास शेअर करतो.
शिखरही नाही कमी
बॉलीवूडमध्ये चुलबुला म्हणून रणवीरचं नाव घेतल असले तरी शिखरपण कमी नाही बरं का! कारण त्याच्या इन्स्टाग्रामवर ही तुम्हाला धम्माल करतानाचे व्हिडिओ दिसतील. काही दिवसांपूर्वी त्या एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये तो मस्त डान्स करताना दिसत आहे. तो त्याच्या पत्नीसोबत भांगडा करताना दिसत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की हा व्हिडिओ पाहा.
शिवाय त्याच दिवशी त्याने त्याचा मुलगा झोरावरचाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये झोरावर शिखर धवनसोबत डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच दोघेही चुलबुल् आहेत असेच म्हणायला हवे.
83चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र
1983 च्या वर्ल्ड कपवर आधारीत 83 हा चित्रपट 2020मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरनेच एक व्हिडिओ शेअर करत या चित्रपटासाठी लागणारी मेहनत देखील त्याने या व्हिडिओमधून दाखवली आहे. त्यामुळे खिलजी, सिंबा आणि गली बॉयचा हा व्हिडिओ खास असणार आहे इतकं मात्र नक्की.
जाणून घ्या करीना आणि सैफची लव्हस्टोरी…
(सौजन्य- Instgram)