गेल्या काही वर्षांपासून नातं सांभाळण्याचा प्रयत्न करणारी बॉलीवूडची जोडी कोंकणा सेनशर्मा आणि रणवीर शौरेने अखेर घटस्फोट घेतला आहे. 13 ऑगस्टला दोघांनीही वेगवेगळे जाऊन घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. तसंच कोणतेही ताशेरे एकमेकांवर न ओढता सामंजस्याने दोघांनी घटस्फोट घेतला असून गेले कित्येक वर्ष दोघांनीही नातं जपण्याचा आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोघांच्याही प्रयत्नांना यश न मिळाल्यामुळे अखेर दोघांनीही घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडवर अनेक संकटंही आली आणि अनेक वेगवेगळ्या बातम्यादेखील येत गेल्या. त्यातलीच अजून एक वाईट बातमी.
लॉकडाऊनमध्ये केले या सेलिब्रिटींनी ‘शुभमंगल’
8 वर्षांच्या मुलाला दोघेही सांभाळणार
रणवीर शौरे आणि कोंकणा सेनशर्मा हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. आतापर्यंत नेहमीच त्यांनी केलेल्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे. 2010 मध्ये कोंकणा आणि रणवीरने लग्न केलं. तर कोंकणाने मुलाला जन्म दिल्यानंतर काही वर्षातच दोघांच्या नात्यात कुरबुरी सुरू झाल्या. गेल्या पाच वर्षांपासून दोघेही वेगळे राहात आहेत. घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केल्यानंतरही दोघांनी मुलासाठी पुन्हा एकदा नात्यात काही बदल घडतो का हे पाहण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी तारीखही पुढे ढकलली होती. मात्र दोघांच्याही नात्यात कोणताच बदल न घडल्याने अखेर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 13 ऑगस्ट रोजी दोघांचा घटस्फोट अखेर झाला आहे. यानंतर मुलाची कस्टडी मात्र दोघांकडेही राहणार असल्याचे कळले आहे. मुलगा 8 वर्षांचा असल्याने आई वडील दोघांचीही त्याला गरज आहे. त्यामुळे हे दोघेही आळीपाळीने मुलाला सांभाळणार आहेत. मुळात सामंजस्याने घटस्फोट घेतल्यामुळे एकमेकांवर दोघांनीही कोणतेही आरोप प्रत्यारोप केले नाहीत. खासगी आयुष्याबद्दल दोघेही कलाकार कधीच काहीही बोलताना आढळले नाहीत. इतकंच नाही तर अगदी या दोघांबद्दलही कुठेही काहीही वाईट अथवा गॉसिपदेखील कधीच छापून आलेले नाही. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये नाराजी असून चाहत्यांनाही खूप वाईट वाटत आहे. दोघेही अत्यंत दमदार कलाकार असल्याचे नेहमीच चित्रपटांमधून दिसून आले आहे.
खऱ्या आयुष्यातही व्हायचे आहे गुंजन सक्सेनाच्या वडिलांसारखे- पंकज त्रिपाठी
अचानक केले होते लग्न
‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘आजा नचले’ यासारख्या चित्रपटांमध्ये कोंकणा सेनशर्मा आणि रणवीर शौरे या दोघांनीही एकत्र काम केलं होतं. 2016 मध्ये ‘डेथ इन अ गंज’ हा दोघांनी एकत्र केलेला शेवटचा चित्रपट होता. याचं दिग्दर्शनही कोंकणानेच केलं होतं. या जोडीने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कोंकणा लग्नाच्या आधीच गरोदर असल्याने दोघांनीही तडकाफडकी लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. तेव्हाही चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. मात्र आता दोघे वेगळे झाल्यामुळे चाहतेही नाराज झाले आहेत. घटस्फोटाच्या आधी दोघांनीही नातं वाचविण्यासाठी समुपदेशनाचा आधार घेत प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याने शेवटी या दोघांचा घटस्फोट झाल्याचे आता समोर आले आहे. दोघांच्याही नात्यात कटूता आली असली तरीही मुलगा हरूनसाठी दोघांनीही जॉईंट कस्टडीचा पर्याय निवडला असून हरूनला दोघांचेही प्रेम मिळावे अशी दोघांचीही इच्छा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोघांचंही हरूनवर अतिशय प्रेम असल्याने दोघेही त्याची काळजी घेत आहेत.
श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी पाहा ‘हे’ मराठी चित्रपट
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा