‘आई माझी काळुबाई’ या मराठी मालिकेमध्ये आतापर्यंत बरेच बदल झाले आहेत. प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडची या मालिकेतून हाकालपट्टी केल्यानंतर ही भूमिका वीणा जगतापने साकारली. पण आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा बदल होणार आहे. वीणा जगतापने ही मालिका सोडली असून आता तिच्या जागी अभिनेत्री रश्मी अनपट ही भूमिका साकारताना दिसणार आहे. पण अनेकांना वीणाने ही मालिका का सोडली असा प्रश्न पडला आहे. ही मालिका सोडण्याचे कारण वीणा जगतापने सांगितले आहे. तिचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दरम्यान, या मालिकेतील अत्यंत महत्वाच्या टप्प्यात रश्मी अनपट आर्या बनून येणार आहे.
वीणाने या कारणाने सोडली मालिका
वीणा जगताप आर्या या भूमिकेसाठी एकदम फिट होती. प्राजक्ता गायकवाडनंतर तिने साकारलेली आर्या अनेकांना आवडली होती. पण आता वीणाने ही मालिका सोडली का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वीणाने ही मालिका काही खासगी कारणामुळे सोडली असे कळत आहे. सतत शूटींग आणि बॅक टू बॅक शेड्युल यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तिने सांगितले आहे. या कारणामुळेच तिने ही मालिका सोडली आहे असे कळत आहे. वीणाने एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले आहे. त्यामुळे आता मालिका सोडण्यामागे मालिका किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा संबंध नाही हे स्पष्ट झाले आहे.
शिव- वीणाच्या ब्रेकअपच्या बातमीवर या व्हिडिओने फिरवले पाणी
रश्मी अनपटची मालिकेसाठी झाली निवड
आर्याच्या भूमिकेत आता रश्मी अनपट दिसणार आहे. मालिकेकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली असून रश्मीचा गोड चेहरा या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा विश्वास मालिकाकर्त्यांना आहे. सध्या या मालिकेमध्ये विराटच्या असुरी प्रभावाखाली आलेले पाटील विरुद्ध भक्तीचे पाठबळ असलेले पुरोहित कुटुंबिय यांच्यामधील संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना रश्मी अनपट आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
“रावरंभा” तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी
मालिका, नाटकांमधून केले काम
भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही रश्मीच्या अभिनयाची खासियत.आहे.पुण्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना झालेले नाट्यसंस्कार आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ या नाटकांतल्या लक्षवेधी भूमिकांमुळे तिच्या अभिनयाचा पाया भक्कम झाला आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिकेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असते.
मालिका आली प्रकाशझोतात
प्राजक्ता गायकवाड ही अभिनेत्री या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती. पण अचानक या मालिकेतील सहकलाकारावर आरोप करत ही मालिका तिने सोडण्याचा निर्णय घेतला.ही मालिका सोडताना इतका गोंधळ झाला की, सगळ्या मीडियामध्ये ही बातमी काही काळासाठी सुरु होती. मालिकेच्या शूटिंगला जाताना प्राजक्ता गायकवाडला काही वाईट अनुभव आला. सहकलाकाराने शिवीगाळ केली शिवाय या मालिकेच्या सर्वेसर्वा अलका कुबल यांनी देखील तिला बोल लावले असे आरोप तिने केले होते. या आरोपाचे खंडन करत त्यांनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आर्याचा रोल हा वीणा जगतापला देण्यात आला.
आता वीणाच्या जागी नवी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संजय लीला भन्साली आणि दीपिका पादुकोणमध्ये खरंच सुरू आहे का कोल्ड वॉर