ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
ratan_tata_tips

श्रीमंत होण्यासाठी रतन टाटांच्या या टिप्स येतील कामी

 या जगात श्रीमंत व्हायचे नाही, अशी इच्छा नसलेल्या व्यक्ती हातावर मोजण्याइतक्याच असतील. पण श्रीमंत व्हायचे म्हणजे लॉटरी काढायची, कोणाला लुबाडायचे असे नाही. श्रीमंत होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. एकाएकी आलेला पैसा आणि कष्टाने कमावलेला पैसा यामध्ये बरेच अंतर आहे. जर मेहनतीने पैसा कमावला तर त्याचे समाधान अधिक असते. श्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे केवळ वडिलोपार्जित संपत्ती हवे, चांगले नशीब हवे असे नाही. कारण आपले नशीब हे आपण स्वत:च घडवत असतो. रतन टाटा ही श्रीमंताच्या यादीतील एक व्यक्ती. रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या खडतर प्रयत्नांनी त्यांचे नाव केले आहे. 84 वर्षांचे रतन टाटा वयस्क असले तरी देखील ते आजही काहीना काही करत असतात.त्यांनीच काही अशा सोप्या आणि साध्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत करतील यात काही शंका नाही. 

 रोज 50 रुपये जमवा

आजच्या काळात 50 रुपये जमवणे आपल्यासाठी काही जास्त नाही. अगदी 100 ची एक नोट  बाहेर गेलो तरीदेखील अगदी सहज खर्च होते. आता तुम्ही विचार करा. तुमचा पगार कमी आहे, पण तरीही तुम्हाला पैसा साठवायचा असेल तर घरात एक छान गुल्लक आणा. त्यामध्ये रोज रात्री 50 रुपये टाका. हा प्रयोग तुम्ही पूर्ण वर्षभर करा. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 18500 रुपये असतील. आता तुम्ही म्हणाल हा आकडा मोठा नाही. पण विचार करा इतर कोणत्याही बचतीसोबत तुम्ही घरातल्या घऱात ही बचत करु शकता. यामध्ये तुम्हाला वाढही करता येईल. पण या इतक्या रक्कमेने सुरु करा. 

मी रोज 50 पाने वाचीन

आता तुम्ही म्हणाल पुस्तक आणि श्रीमंत होण्याचा काहीही संबंध नाही तर तुम्ही चुकीचा विचार करताय. ज्ञान असेल तर तुम्हाला काय करायचे हे कळते. पुस्तकं ही ज्ञान देणारी असतात. ती तुमच्या ज्ञानात भर घालून तुमची स्मरणशक्ती, एकाग्रबुद्धी वाढवण्यास मदत करतात. 24 तासात कधीही तुम्ही ही पाने वाचलीत. तर तुम्ही वर्षभरात कितीतरी पुस्तकं वाचून होतील. त्यामुळे जर चांगले काम करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या ज्ञानातही भर घालायला हवी. 

श्रीमंतीच्या मागे लागू नका

श्रीमंत झालो तर सगळ्या इच्छा- अपेक्षा पूर्ण होतात असे अजिबात नाही. कधीतरी रस्त्यावर राहणारे गरिब देखील मेहनत करुन खाऊन पिऊन सुखात असतात.  पण खूप पैसा असलेली व्यक्ती समाधानीच असते असे अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे आनंदी आणि त्याहून अधिक समाधानी राहणे हे फारच जास्त गरजेचे असते. त्यामुळे रतन टाटांच्या म्हणण्यानुसार मुलांना केवळ चांगले भविष्य मिळेल म्हणून शिकवू नका. तर त्यांना आहे त्यात आनंदी कसे राहायचे ते शिकवा. 

ADVERTISEMENT

आता या गोष्टींचे काही पालन करा तुम्हाला नक्कीच तुमच्या खिशाला चांगले दिवस येण्यासाठी मदत करतील. टाटांनी सांगितलेल्या गोष्टी ही एक सुरुवात आहे. चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT