‘रात्रीस खेळ चाले 3’ या मालिकेची दणक्यात सुरुवात झाली आहे. नव्या सीझनचे प्रमोशन एवढे जोरदार झाले म्हटल्यावर नक्कीच ही मालिका काहीतरी खास घेऊन पुन्हा एकदा येणार हे पक्के झाले होते. या तिसऱ्या भागात नेमका कशाचा उलगडा होणार होणाची कथा दाखवणार असा प्रश्न पडलेला असताना माई- माधवचा असा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मिरवणारी माई आणि सुशिक्षित माधव अगदी दीन होऊन गेले आहेत. त्यांचा हा अवतार आणि वाड्याची झालेली अवस्था पाहता या नव्या सीझनमध्ये वाड्याची दुर्दशा का झाली? नाईकांवर अशी वेळ का आली? हे सगळे या भागात दाखवले जाणार आहे.
स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर
वाड्याचे रुपडे पालटले
अण्णा नाईक असताना श्रीमंतीची साज चढलेला वाडा आता पुरता कोसळून गेला आहे. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सीझनच्या पहिल्या भागात अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या पापाचा पाठा वाचण्यात आला. आता इतकी पाप केल्यामुळे अण्णांना अतृप्त आत्मा असेच थोडी सोडणार? त्यांनी ज्यांना ज्यांना मारले त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांनी अण्णाला आणि संपूर्ण कुटुंबाला शाप दिला आहे. त्याचा परिणाम वाड्यावर झाला आहे. वाड्याची सगळी रैना निघून गेली आहे. हे पहिल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर सगळ्यांचेच लक्ष घरातील इतर कुटुंबियांवर होते. मालिकेत माई आणि माधव दिसल्यानंतर त्याची अवस्था पाहून दयाभावना जागणार नाही असे मुळीच होणार नाही. माईवर धुणीभांडी करायची वेळ आली आहे तर पत्नीच्या कृत्यामुळे माधवला वेड लागले आहे. दोन वेळच्या जेवणासाठी माई- माधव भटकत आहे.
माईला आहे अपेक्षा
एवढे सगळे होऊनही माई मुळीच खचलेली नाही. नाईकांचा डोलारा ती पुन्हा एकदा सांभाळेल आणि पुन्हा जुन्या सारखे वैभव ती परत घेऊन येईल अशी तिला अपेक्षा आहे. या घरातील सगळ्यात छोटा मुलगा अभिराम या मालिकेत परत आलेला आहे. अभिराम घरापासून लांब राहिल्यामुळे त्याला याचा त्रास झालेला नाही. पण अद्याप दत्ता आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल फार काही समजू शकलेले नाही. कारण ते या मालिकेत अद्याप दाखवण्यात आलेले नाही. पण माईची एकंदर जिद्द पाहता ती या घराला शाप मुक्त करण्यासाठी झटताना दिसत आहे. पुन्हा एकदा वाडा उभारताना ती यामध्ये दिसणार आहे.
पतीला घटस्फोटीत आणि जाड म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावले खडेबोल
अण्णांचे दर्शन
अण्णा हे गेले असले तरी त्यांच्या आत्म्याला मुक्तता मिळाली आहे असे काही दिसत नाही. कारण अण्णा आजही या घरात भटकताना दिसत आहे. त्यांचा आत्मा या घरात अनेकांना घेऊन येताना दिसत आहे. घरात आत्म्याचे स्थान असून वेगवेगळ्या रुपात घरातील नकारात्मक उर्जा पाहायला मिळत आहे. अण्णांसोबत शेवंताचे फोटोमध्ये दर्शन झाले असून आता शेवंताला कशापद्धतीने दाखवण्यात येणार आहे याचा अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही. त्यामुळेच मालिका अधिक रहस्यमयी होत चालली आहे. जसजशी मालिका पुढे जात आहे तसतशी जुनी पात्र नव्या रुपात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या पुढील कथा पाहण्यासारखी असणार आहे.
माई वाड्याला शाप मुक्त करेल का? वाडा पुन्हा चांगला होईल का? आणि घरातील भूतांना मुक्ती मिळेल का? असे सगळे काही पाहावे लागणार आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा अंदाज, प्रोमो झाले व्हायरल