मराठीमध्ये अशाच कमीच मालिका असतील ज्यांनी आपला दबदबा कायम ठेवला असेल. अण्णा नाईक असं जबरदस्त कॅरेक्टर घेऊन आलेली मराठी मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ प्रेक्षकांच्या मनात जाऊन बसली. मराठीमध्ये भूत आणि पिशाच्छ अशा विषयाची मालिका आली तरी देखील कोकणचा रम्य परीसर तेथे दडलेले गुढ असे कधीच यापूर्वी पाहिले नव्हते ते प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या मालिकेचे दोन सीझन झाल्यानंतर आता तिसरा सीझन येण्यासाठी सज्ज झाला आहे. याचे प्रमोशनही फार हटके पद्धतीने करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सगळ्या बॅनरवर ‘अण्णा नाईक परत येणार’असे मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन, ट्रेन आणि गर्दीच्या ठिकाणी या जाहिराती अशा काही पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत की, या जाहिरातीने अक्षरश:धूम माजवली आहे.
बोल्ड आणि ग्लॅमरस असूनही या अभिनेत्रींनी मालिकांमध्ये साकारली ‘आई’
अण्णा नाईक परत येणार..
साधारण फेब्रुवारी महिन्यापासून ही जाहिरात ठिकठिकाणी दिसू लागली. एखाद्या दुसऱ्या मालिकेच्या जाहिरातीवर पेटिंगने अण्णा नाईक परत येणार असे लिहावे तसे या सगळ्या पोस्टरवर लिहिण्यात आले. काही छोट्या पोस्टर असे लिहिलेले पाहता ही मस्करी असेल असे वाटत होते. कारण प्रत्येक गल्ली बोळात हे वाक्य अगदी भूताने लिहावे असे लिहिण्यात आले होते. पण ज्यावेळी हे वाक्य मोठ्या होर्डिंगवर दिसून आले त्यावेळी ही जाहिरात असावी यावर अगदी शिक्कामोर्तब झाले. मग ही जाहिरात आहे हे अनेकांच्या लक्षात येऊ लागली. रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका काही गुन्ह्यांची कबुली देऊन संपली होती. पण मालिका खऱ्या अर्थाने संपली नाही. कारण अजून या मालिकेने बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
सीझन 2च्या प्रोमोमध्ये घर दाखवले होते शापित
सीझन 2 चा प्रोमो ज्यावेळी आला. त्यावेळी अण्णा नाईकांचा वाडा शापित आहे असे दाखवण्यात आले होते. यामध्ये त्याचा वाडा पूर्ण बंद आहे असे दाखवले होते आणि आत अडकलेली लोकं आम्हाला बाहेर काढून टाका म्हणून आवाज देताना एकमेंकासोबत कुजबूजताना दिसत होती. पण दुसरा सीझन हा पूर्णपणे शेवंतावर आधारीत होता. पहिल्या भागात उल्लेखण्यात आलेली शेवंता ही दुसऱ्या भागात दाखवण्यात आली. दुसऱ्या भागात अण्णा नाईक आणि शेवंता याची लव्हस्टोरी ते किलस्टोरी असे सगळे दाखवण्यात आले होते. आता सीझन 3 मध्ये नेमके काय बदल होतील. अण्णा नाईक कोणत्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतील याचा अंदाज नाही.
नव्या चित्रपटासाठी आर्ची सज्ज,नव्या प्रेमकहाणीत दिसणार नव्या रुपात
रेल्वेतही अण्णांचा आवाज
मालिकेच्या प्रोमोशन टीमने मालिकेला घराघरात पोहोचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत असे दिसत आहेत. त्यांनी केलेली एक जाहिरात सध्या खूपच गाजतेय. ट्रेनमध्ये अण्णा नाईक येणार? हे वाचून एक गट त्याची खूप खिल्ली उडवतो. पण अचानक चालत्या ट्रेनच्या शेजारी अण्णा नाईक येतात आणि म्हणतात की, ‘आता बोलावलं आहे तर यावचं लागेल ना?’ असे म्हणत ते निघून जातात. याचाच अर्थ असा की आता अण्णा नाईकांचे भूत झाले असावे असा होतो.आता अण्णा नाईक नेमकं काय करणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये जागी करण्यासाठीच हा प्रयत्न केला असावा असे साधारणपणे दिसत आहे.
दरम्यान 22 मार्चपासून रात्री 11 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत या जाहिरातीचा आनंद सगळ्यांनी घ्यावा.
लवकरच होणार ‘बंटी और बबली 2 ‘चं ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान देणार सरप्राईझ