ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रात्रीस खेळ चाले मालिकेत येणार ट्विस्ट

रात्रीस खेळ चालेमध्ये येणार वच्छी.. येणार ट्विस्ट

मालिकांमध्ये एखादा ट्विस्ट आला की अशा मालिका पाहाव्याशा वाटतात. सध्या रात्रीस खेळ चाले ही मालिका रंजक वळणावर येणार आहे. कारण या मालिकेमध्ये वच्छी पुन्हा एकदा येणार आहे. मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता वच्छीचे वेगळे रुप पाहायला मिळणार आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेतील पात्रे वेगवेगळ्या रुपाने आपल्यासमोर आली. पण यात काही जुनी पात्रे दिसली नव्हती. मालिकेत त्यांचा ट्रॅक संपला की काय अशी चिंता अनेकांना सतावत असताना आता या नव्या सीझनसाठी वच्छीचा नवा लुक सगळीकडे शेअर होताना दिसत आहे. इतकेच नाही तर सगळीकडे वच्छीचे मीम्सही व्हायरल होत आहेत. जाणून घेऊया अधिक

Bigg Boss Marathi: एका पराजयामुळे टीममध्ये धुसफूस

वच्छी परत येतेय

रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेची सुरुवात ही एकदम दणक्यात झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा आणि शेवंता यांचे भूत दाखवण्यात आले आहे. शेवंताला या घरात आपला अधिकार मिळवायचा आहे. हे दाखवण्यात आले आहे. पण हा प्रयत्न माई हाणून पाडताना दिसत आहे. पण माईसोबत आता वच्छी या घरावर अंकुश ठेवण्यासाठी वच्छी मदत करायला येणार आहे असे सगळीकडे सांगितले जात आहे. पण वच्छी आता घरात येणार ती काशीचा आणि शोभाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी की माईला मदत करण्यासाठी हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. पण आता वच्छी येणार म्हटल्यावर आता मीम्सचा पाऊस पडू लागला आहे.

या कारणासाठी हनिमूनला नाही जाणार राजकुमार राव आणि पत्रलेखा

ADVERTISEMENT

वच्छीची भूमिका चांगलीच गाजली

वच्छी म्हटली की रात्रीस खेळ चाले ही मालिका आठवल्यावाचून राहणार नाही. वच्छीने घातलेला गोंधळ आणि अण्णा नाईकला चॅलेंज देणारी वच्छी सगळ्यांना आवडली होती. त्यामुळे ती भूमिका चांगलीच गाजली होती. वच्छी दुसऱ्या भागात ही अण्णा नाईकला पाहून नदीत उडी मारताना दाखवली होती. त्यामुळे वच्छीचे पात्र तिथेच संपले असे अनेकांना वाटले होते. वच्छीचा तो डान्स खूप जणांना आवडला होता. त्यामुळे सगळ्या सोशल मीडियावर ती चांगली हिट झाली होती. वच्छी पुन्हा एकदा येणार म्हटल्यावर आता अनेकांना आनंद झाला आहे.

अनेकांना आवडली मालिका

एखादी मालिका एखादा सीझन चालते. कारण खूप जणांना मालिका आवडली नाही की ती दुर्लक्ष होऊ लागते. पण या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि या तिन्ही सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तिसरा भाग हा खूप जास्त आवडीचा आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा करणारा आहे.मालिकेच्या पहिल्या भागात दाखवलेली लहान मुले मोठी झाली आहे आणि त्यांच्याभोवती हे कथानक फिरताना दिसत आहे.आता यामध्ये इतके ट्विस्ट आले आहेत की, त्यामुळे ही मालिका आताही तितक्याच आवडीने पाहिली जात आहे.

मराठी मालिकांमध्ये होतोय बदल

मराठी मालिकांमध्ये हल्ली अनेक बदल दिसून आले आहेत. मराठी मालिका या आता अधिक प्रगत आणि चांगल्या आहेत. यामध्ये चांगले आणि उत्तम संदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मराठी मालिका या हल्ली जास्त पाहिल्या जात आहेत. झी मराठी, स्टारप्रवाह आणि कलर्स मराठी या वेगवेगळ्या चॅनल्सवर सुरु असलेल्या मालिका या अधिक आवडीच्या आणि वेगळ्या धाटणीच्या आहेत. ज्या लोकांना अधिक आवडत आहेत. 

आता वच्छी आल्यानंतर या मालिकेमध्ये आणखी काय मजा सुरु होईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

शिल्पा ठाकरेचा नवा चित्रपट ‘A फक्त तूच’

18 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT