नव्वदीच्या काळात रवीना टंडन आणि संजय दत्त ही जोडी सुपरहिट ठरली होती. या दोघांनी अनेक हिट चित्रपटांमधून काम केलं आहे. या दोघांचे आतिश, जीना मरना तेरे संग, जमाने से क्या डरना, विजेता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता बऱ्याच वर्षांनी चाहत्यांसमोर ही जोडी पुन्हा एकदा येणार आहे. चर्चा आहे की KGF2 या साऊथ चित्रपटात रवीना आणि संजय एकत्र झळकणार आहेत. मात्र एवढंच नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बॉलीवूडच्या कॉमेडी चित्रपटातही ही जोडी पुन्हा झळकण्याची शक्यता आहे.
नागार्जुनच्या ‘दी घोस्ट’ मधून जॅकलिन फर्नांडिसचा पत्ता कट
रवीनाने दिली हिंट
रवीना टंडन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत तिच्या जीवनातील अपडेट या माध्यमातून चाहत्यांना देत असते. नुकतंच रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक थ्रोबॅक पिक्चर शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती संजय दत्तसोबत दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कंमेट करण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त आणि रवीना टंडन लवकरच एका कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मात्र याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा दोघांकडून करण्यात आलेली नाही. सध्या या चित्रपटाची स्क्रिप्ट, लोकेशन आणि प्री प्रॉडक्शनबाबत चर्चा सुरू आहे. रवीनाने शेअर केलेल्या फोटोजमुळे दोन्ही कलाकारांची या चित्रपटात काम करण्यासाठी संमती असल्याचा संकेत मिळाला आहे.
‘देवमाणूस’ फेम आणि नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये
‘पठाण’मध्ये स्वतः स्टंट्स करणार दीपिका पादुकोण
KGF2 मध्येही असणार महत्त्वाची भूमिका
संजय दत्त आणि रवीना टंडन खूप वर्षांनी एकत्र पाहायला मिळणार यातच अनेक चाहत्यांना समाधान वाटत आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा फेब्रुवारी महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. साऊथ चित्रपट KGF2 मध्येही ही जोडी झळकणार आहे. KGF नंतर या सीक्वलची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत अभिनेता नवीन कुमार गौडाप्रमाणेच संजय दत्त आणि रवीनाच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात संजय दत्त नकारात्मक भूमिका साकारत असून रवीना टंडन मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणार आहे.