नव्वदचं दशक गाजवणारी आणि फक्त ‘अखियोंसे गोली’ मारणारी रविना टंडन सध्या बॉलीवूडपासून दूरावलेली आहे. मात्र असं असलं तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत नेहमीच अॅक्टिव्ह असते. कोरोनाच्या वातावरणातून बाहेर पडत सर्वांनाच एक वेकेशन ब्रेक हवाहवासा वाटत आहे. अशा वातावरणात रविना टंडन तिच्या मुलांसोबत हिमाचलमध्ये थंडीत सुट्टीचा आनंद घेत आहे. रविनाने तिची मुलं राशा आणि रणविरसोबत बर्फाळ डोंगरामध्ये आनंद लुटतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रविना आणि तिच्या मुलांनी असा लुटला सुट्टीचा आनंद –
रविनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आणि तिची दोन्ही मुलं राशा आणि रणविर बर्फाळ डोंगऱ्यांच्या जवळ सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. रविनाने या फोटोंसोबत कॅप्शन दिली आहे की, “थंडी का मौसम! गेटवेच्या मी प्रेमात पडले आहे” हिमाचल म्हणजे बर्फांनी आच्छादलेले डोंगर आणि खोल खोल दऱ्या. या वातावरणात कोणाला जावसं नाही वाटणार. अशा मस्त वातावरणात आणि हिमाचलमधील डोंगरदऱ्यांमध्ये मुलांसोबत मस्ती करत असलेले रविना टंडनचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शिवाय सेलिब्रेटीनां असं एन्जॉय करताना पाहुन चाहत्यांनाही वेकेशनवर जाण्याचे वेध लागले आहेत.
रविना टंडन हिमाचल मध्ये करत आहे शूटिंग –
रविना टंडन हिमाचलमध्ये फक्त सुट्टीसाठी गेलेली नाही तर ती हिमाचलमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेली आहे. मात्र तिच्या मुलांना सध्या दिवाळीची सुट्टी लागलेली होती. म्हणून मग मुलांना घरी एकटं ठेवण्यापेक्षा ती त्यांना तिच्यासोबत फिरायला घेऊन गेली. कारण रविना हिमाचलमध्ये दिवाळी आधी गेली होती. त्यामुळे यानिमित्ताने मुलांसोबत तिला दिवाळीचा आनंद देखील घेता आला. करवा चौथ मात्र तिने तिचे पती आणि उद्योगपती अनिल थडानी यांच्या शिवायच साजरी केली. त्यादिवशी तिने फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या पतीशी संवाद साधला आणि पूजा केली होती. रविनाच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग हिमाचलमध्ये सुरू झालं असलं तरी त्याची अधिकृत घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
रविना आहे चार मुलांची आई आणि एका नातवाची आजी –
नव्वदच्या दशकात रविना अनेकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवत होती. मात्र नंतर तिने 2004 मध्ये तिने फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि सुखाचा संसार मांडला. लग्नाआधी तिने दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. ज्यांची नावं पूजा आणि छाया अशी आहेत. लग्नानंतर अनिल आणि रविना यांना राशा आणि रणविर ही दोन मुलं झाली आहेत. अशा प्रकारे वयाच्या पंच्चेचाळीसाव्या वयातच रविना चार मुलांची आई आहे. एवढंच नाही तर रविना चक्क आजीदेखील झालेली आहे. तिची दत्तक मुलगी छायाला रूद्र नावाचा गोंडस मुलगा झाला आहे. रविनाचं तिच्या या नातवावरही खूप प्रेम आहे. रविनाने लग्नाआधी म्हणजेच 1995 मध्ये अकरा वर्षांची पूजा आणि 8 वर्षांची छायाला दत्तक घेतलं होतं.
फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या
चाहत्यांना घायाळ करेल श्वेता शिंदेचा साडीमधला हा दिलखेचक अंदाज
‘रश्मि रॉकेट’साठी जोरदार मेहनत घेत आहे तापसी पन्नू, असा मेंटेन केला फिटनेस