रविना टंडन बॉलीवूडमध्ये आली आणि सर्व जण म्हणू लागले “तू चीज बडी है मस्त मस्त! नव्वदीचा काळ रविनाने अक्षरशः गाजवला होता. आजही रविना टंडनचा चाहता वर्ग तितकाच मोठा आहे. नुकतीच ती केजीएफ 2 मध्ये झकळली होती. सोशल मीडियावरही रविना खूप अॅक्टिव्ह आहे. तिच्यासोबत आजकाल तिची मुलगी राशा थडानीपण सतत दिसत असते. राशादेखील तिच्या आईप्रमाणेच सुंदर आहे. तिची स्टाइल आणि अदा पाहून ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल असं वाटत आहे. सध्या जिकडे तिकडे राशाच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत रविनाचं मत काय ?
रविना राशाच्या बॉलीवूड डेब्यूबाबत काय म्हणाली…
रविनाला नुकतंच तिची लेक राशा बॉलीवूडमध्ये कधी येणार याबाबत एका मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर रविना म्हणाली की, ” सध्या तरी तिचा असा कोणताच प्लॅन नाही. राशाला असं काही वाटतंय असं आम्हाला वाटत नाही. म्हणूनच आम्ही याबाबत काही ठरवलेलं नाही.” रविनाला राशाने बॉलीवूडमध्ये यावं असं वाटतं का असं विचारण्यात आल्यावर तिने खुलासा केला की, ” मला असं अजिबात वाटत नाही. एक आई म्हणून मी तिच्याबद्दल हा विचार केलेला नाही. शिवाय आजकालची मुलं स्वतःचे निर्णय स्वतःल घेतात. हे तिचं आयुष्य आहे त्यामुळे तिने तिची स्वप्न पूर्ण करावी. तिला जे करायचं आहे ते ती तिच्या आयुष्यात करू शकते. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही आमच्या आयुष्यात केलं. आता आम्ही फक्त त्यांना चांगलं काय आणि वाईट काय याचं फक्त मार्गदर्शन करू शकतो”
राशाच्या बॉलीवूड आगमनाची चाहत्यांना आतुरता
राशाबद्दल रविनाने तिचं मत सांगितलं असलं तरी राशाने बॉलीवूडमध्ये यावं आणि आईप्रमाणे लोकप्रिय व्हावं असं चाहत्यांना नक्कीच वाटतं. राशा सध्या आईप्रमाणेच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे स्टायलिश लुक्स चाहत्यांना खूप आवडतात. तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो पाहून तिला बॉलीवूडची क्रेझ नसेल असं मुळीच वाटत नाही. त्यामुळे आता राशा बॉलीवूडमध्ये येणार की नाही हे येणारा काळच सांगू शकेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक