ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते माहीत आहे का?

कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते माहीत आहे का?

नवरात्रीचे नऊ दिवस छान सेलिब्रेट केल्यानंतर पाच दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते. मस्त मसाला दूध आणि रात्र जागवून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. मी लहान असताना कोजागिरीबद्दल बाकी काही माहीत नसायचे पण एक गोष्ट माहीत असायची की, सोसायटीत मस्त काहीतरी बेत असायचा आणि रात्री उशिरापर्यंत जागायला मिळायचे. त्याचाच काही तो आनंद असायचा. शिवाय नऊ दिवस गरबा खेळून झाल्यानंतर पुन्हा एकदा गरबा खेळण्याची संधी मिळायची. पण तुम्हाला माहीत आहे का कोजागिरी का साजरी केली जाते? मग तुम्हाला कोजागिरी पोर्णिमेबदद्ल काही गोष्टी माहीत हव्यात.

कोजागिरीला ‘मसाला दूध’ पिण्याचे आरोग्यदायी फायदे  

कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे हे आहे कारण

Instagram

ADVERTISEMENT

शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतात.इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हा दिवस येतो. शरद ऋतूतील अश्विन महिन्यात ही पौर्णिमा येते याला काही ठिकाणी ‘माडी पौर्णिमा’ देखील म्हणतांत. असे म्हणतात की, या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन खाली उतरते आणि मध्यरात्री ती सगळ्यांना विचारत फिरते.. को जागर्ति…. (संस्कृत शब्द.. याचा अर्थ कोण जागे आहे?) ती मनुष्याची मेहनत पाहायला ती येत असते असे म्हणतात. लक्ष्मीच्या स्वागतासाठीच ही सगळी तयारी केली जाते. दारी दिवे लावले जातात.

बौद्धपौर्णिमेसाठी खास शुभेच्छा

अशी साजरी करायला हवी कोजागिरी पौर्णिमा

Instagram

ADVERTISEMENT

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नुसते सेलिब्रेशन नाही. तर या दिवशी खास व्रत केले जाते. लक्ष्मीची आणि हत्तीवर विराजमान झालेल्या इंद्राची, बळीराजाची पूजा केला जाते. या पूजेनंतर पोहे आणि नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. शिवाय चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. ब्रम्हपुराणात मात्र थोडे वेगळे सांगितले आहे. त्यानुसार घर आवार स्वच्छ करुन चंद्राची पूजा करावी. ही पूजा करताना त्याला दूध आणि खीर हा नैवैद्य दाखवावा असे सांगितले जाते. याशिवाय अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

टॉमेटो ठरतो केसांसाठी फायदेशीर, कसा ते माहीत आहे का

कोजागिरीला म्हणून पितात मसाला दूध

Instagram

ADVERTISEMENT

हल्ली प्रत्येक सोसायटीमध्ये मसाला दूध तयार करण्याचा एक मोठा कार्यक्रमच असतो.  मस्त दूध गरम करुन त्यात दूधाचा मसाला घातला जातो. भरपूर ड्रायफ्रुट असलेले हे मसाला दूध पिण्यामागे एक शास्त्रीय कारण असे की, रात्री पांढरे दूध पिऊ नये असे म्हणतात.त्यामुळेच यात मसाला घातला जातो. केशर आणि हळदीमुळे मसाला दूध पिवळसर दिसते. या आधी मसाला दूध जरी तयार केले जात नसले तर त्या आधी दूध आटवले जायचे. दूध आटवल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होतो आणि ते अधिक गोड होते. आता या दूधासोबत अन्य काही खाऊही केला जातो. पण लक्ष्मीची वाट पाहण्यासाठी म्हणूनच कोजागिरीची ही रात्र जागवली जाते. 

मग यंदा कोजागिरी साजरा करताना ती का साजरी केली जाते हे आवर्जून सांगा आणि कोजागिरी मस्त एन्जॉय करा. 

 

 

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

10 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT