तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) चा नागिन 6 (Naagin 6) हा शो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. टीआरपीच्या रेसमध्येही हा शो कायम टिकून आहे. दर शनिवारी आणि रविवारी या शो मध्ये वेगवेगळे ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षकांनी हा शो डोक्यावर उचलून धरला आहे. यामध्ये सतत होणारे बदल आणि तेजस्वीच्या अभिनयामुळे अनेकांनी या शो ला पसंती दर्शविली आहे. तर सतत या शो मध्ये नवनवीन कलाकारांचे प्रवेश होतानाही दिसत आहे. पण आता या शो च्या चित्रीकरणादरम्यान खऱ्या नागाचा प्रवेश झालेला पहायाला मिळत आहे. हो हे खरं आहे. नागिन 6 च्या सेटवर खऱ्या नागाने हजेरी लावल्याने एकच हाहाःकार माजला होता. या नागाचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
खऱ्या नागाची झाली एंट्री
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक खरा नाग आल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. हे पाहिल्यानंतर तेजस्वी प्रकाश आणि एकता कपूरच्या चाहत्यांमध्ये एकच चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र या नागामुळे अर्थात सापामुळे कोणालाही कोणतेही नुकसान पोहचलेले नाही आणि सापालाही कोणतीही हानी पोहचविण्यात आलेली नाही असं सांगण्यात आले आहे. सेटवरील एका क्रू मेंबरने काठीच्या सहाय्याने या सापाला दूर केल्याचे दिसून येत आहे.
चाहत्यांनी केल्या अशा कमेंट्स
हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नागिन 6 चे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेक जणांनी तेजस्वी प्रकाशला काळजी घेण्याची आणि सावधानतापूर्वक राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी सापच खरा हिरो असून त्याला मुख्य भूमिका देण्याचा मजेशीर सल्लाही दिला. तर एका युजरने मस्करीत लिहिले की, ‘आमच्या दुनियेत नक्की काय चालू आहे, जे आम्हालाही माहीत नाही पण एकता कपूरला माहीत आहे हे जाणून घेण्यासाठी साप आला होता’ तर तेजस्वीच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
प्रेक्षकांची लाडकी आहे प्रथा
नागिन 6 ही मालिका चालू झाल्यापासूनच तेजस्वी प्रकाश साकारत असणारी प्रथा ही भूमिका अनेकांना आवडत आहे. तर दर आठवड्याला या मालिकेत होणारे चढउतार आणि वेगाने घडणाऱ्या घटना यामुळे प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन होत आहे. नुकताच विशाल सोलंकी (Vishal Solanki) आणि नंदिनी तिवारी (Nandini Tiwari) या कलाकारांनीही मालिकेमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या बाळाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रथाने आपल्या शेषनागिनच्या शक्ती परत मिळविल्या असून आपल्या शत्रुंशी सामना करण्यासाठी ती तयार झाली असल्याचे दाखविण्यात येत आहे. तर एका क्षणाला काहीतरी वेगळे आणि दुसऱ्याच क्षणाला पलटणाऱ्या व्यक्ती हे या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही मालिका बघायला प्रेक्षकांना खूपच मजा येत आहे. खऱ्या आयुष्यात अशा घटना घडत नाहीत. मात्र कथाकल्पित गोष्टी पाहायला प्रेक्षक अधिक प्राधान्य देतो हे पुन्हा एकदा नागिन 6 च्या यशामुळे दिसून आले आहे. दरम्यान आता सेटवर नाग आल्याने सर्वांनाच काळजी घेण्याचा सल्ला प्रेक्षकांकडून आणि चाहत्यांकडून देण्यात येत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक