ADVERTISEMENT
home / मनोरंजन
reason-behind-bhoolbhulaiyaa-2-100-cr-success-in-theatres-in-marathi

कार्तिकच्या भुलभुलैय्या 2 ने का केली 100 कोटींची कमाई, प्रेक्षकांचा कल

भुलभुलैय्या 1 हा अत्यंत आयकॉनिक असा चित्रपट आहे. मग असं असतानाही भुलभुलैय्या 2 प्रेक्षकांना आवडेल की नाही अशी शंका मनात घेऊनच हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) या चित्रपटाने कमालीचे यश प्राप्त करत केवळ 10 दिवसात 100 कोटींचा गल्ला आपल्या खिशात घातला आहे. प्रेक्षक चित्रपट बघून आल्यानंतर पहिल्या भुलभुलैय्याशी तुलना करतात करतात तर काही प्रेक्षकांना कार्तिक आणि तब्बू (Tabbu) आवडल्याने पुन्हादेखील हा चित्रपट पाहू शकतो असा अभिप्राय देतात आणि म्हणूनच मी सिनेमॅक्समध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचे ठरवले आणि नक्की का हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. 

डॉल्बी साऊंडमधील अनुभव

कोणत्याही थिएटरमध्ये थरारक चित्रपट पाहताना डॉल्बी साऊंड खूप महत्त्वाचे काम करते. तोच अनुभव या चित्रपटाच्या बाबतीतही येतो. सिनेमॅक्समधील अगदी पहिल्या फ्रेमपासून या चित्रपटाने पकड कायम ठेवली आहे. मुळात हा चित्रपट पाहायला जाताना अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाबाबत मनात कोणतीही फ्रेम ठेऊन उपयोग नाही. चित्रपटाची कथा फँटसी असल्यामुळे ही फँटसी आहे हा विचार केल्यास, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यातही चित्रपटाच्या बॅकग्राऊंड म्युझिकने अधिक चांगले काम केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

कार्तिक – कियाराची फ्रेश जोडी 

मोठ्या पडद्यावर त्याच त्याच जोड्या पाहण्यापेक्षा आजकाल प्रेक्षकांचा कल फ्रेश जोडीकडे अधिक आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच कार्तिक आणि कियारा (Kiara Advani) यांची फ्रेश आणि एक वेगळी जोडी प्रेक्षकांसमोर आली असून या दोघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. दोघांचाही अभिनय अत्यंत सहज असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळते आहे. काही ठिकाणी जर लॉजिक लावायला गेलं तर मात्र हा चित्रपट सपशेल आपटला असता. 

तब्बूच्या अभिनयाची ताकद 

सिनेमॅक्समध्ये हा चित्रपट पाहण्याचा माझा अनुभव काही वेगळाच होता. मुळात मला भुतांच्या चित्रपटांची भीती वाटते. त्यातही त्यातील म्युझिक. मात्र तरीही प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की का आवडतो यासाठी मला हा चित्रपट पाहायचाच होता. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे तब्बू. तब्बूच्या अभिनयामुळेच हा चित्रपट तरला आहे. कार्तिक आर्यन आणि तब्बू या दोन्ही अभिनेत्यांनी हा पूर्ण चित्रपट उचलून धरला आहे. कार्तिकने आपण आऊटसाईडर असूनही आपल्या खांद्यावर एक चित्रपट पूर्ण उचलून धरू शकतो आणि तब्बूसारख्या अभिनेत्रीसमोर तितक्याच ताकदीने उभा राहू शकतो हे दाखवून दिले आहे. मात्र तरीही चित्रपटाची मुख्य बाजू सांभाळली आहे ती म्हणजे तब्बूच्या अभिनयाच्या ताकदीने हे कोणालाही नाकारता येणार नाही. 

ADVERTISEMENT

निष्कर्ष – या चित्रपटामध्ये कोणतेही लॉजिक नाही. मात्र दोन तास विरंगुळा आणि पुस्तकातील गोष्टीप्रमाणे ही कथा पाहायला गेली तर नक्कीच चित्रपटात प्राण आहे. कार्तिक, कियारा, राजपाल यादव आणि तब्बू यांच्या भूमिकांमुळे हा चित्रपट तरला आहे. मात्र अनेक ठिकाणी एडिटिंग चांगले झाल्याचे वाटत नाही. अनिस बज्झी स्वतः चांगला एडिटर असूनही बऱ्याच ठिकाणी सीन तुटक तुटक वाटतात. याबाबतीत जर प्रेक्षकांनी खोलात जाऊन विचार केला असता तर कदाचित चित्रपट थिएटरमध्ये चालला नसता. पण मित्रमैत्रिणींबरोबर अथवा कुटुंबाबरोबर वेळ घालविण्यासाठी क्लासी (Classy) नसला तरीही हा चित्रपट मासी (Massy) आहे असं नक्कीच म्हणता येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT