आपल्यापैकी काही जण रोज, काही जण आठवड्यातून एकदा तर काही जण महिन्यातून एकदा कोणत्या ना कारणाने देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी देवळात जातात. तेव्हा तुमच्यापैकी काही जणांच्या बाबतीत चपला चोरीला गेल्याची घटना घडली असेल किंवा कोणाची चप्पल चोरीला गेल्याचं तुम्हाला आढळलं असेलच.
फक्त देऊळचं नाहीतर इतरही धार्मिक ठिकाणी भक्तांसोबत असं होताना दिसतं. खरंतर प्रत्येक देवळात चपलांकरिता खास जागा आणि त्या सांभाळण्यासाठी लोकंही नेमण्यात आलेली असतात. तरीही असं कधीतरी घडतं. तुम्हाला माहीत आहे का, अशाप्रकारे तुमच्या चपला चोरीला जाण्यामागेही असू शकतो काही संकेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चपला चोरी जाण्यामागे जुन्या रूढी परंपरानुसार काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. जी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.
शुभ मानलं जातं चप्पल चोरीला जाणं
आपली एखादी गोष्ट चोरीला गेल्यावर आपल्याला साहजिकच दुःख होतं आणि ती चोरीला जाणं चुकीचं आहे. पण एका जुन्या रूढीनुसार चप्पल किंवा शूज चोरीला जाणं शुभ मानलं जातं. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलं ना. हो…मंदिराबाहेर तुमची चप्पल चोरीला गेल्यास ते तुमच्यासाठी चांगल मानलं जातं. काहीजण तर त्यांच्या स्वेच्छेने देवळाबाहेर त्यांचे चपला शूज सोडून येतात. यामुळे तुमचं पुण्य वाढतं असं म्हणतात.
असं का मानलं जातं
हा विचार किंवा ही परंपरा नक्की कधी आणि कशी सुरू झाली यामागील खास कारण माहीत नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या पायात शनीचा वास असतो. ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल त्यांना माहीत असेलच की, शनी किती कठोर ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शनीचा कोप होतो तेव्हा त्याने कितीही मेहनत केली तरी फळ मिळत नाही. तर असं म्हणतात की, शनीचा वास हा आपल्या पायांमध्ये असतो. त्यामुळे जर तुम्ही पाय आणि त्वचा दोघांशी निगडीत दान केल्यास शनी देव प्रसन्न होतो. याचं चांगल फळंही मिळतं आणि पाय किंवा त्वचेशी निगडीत आजारांपासून सुटका मिळते.
शनिवारी चप्पल चोरीला गेल्यास…
जर चप्पल चोरीची घटना शनिवारी झाली तर अजूनच चांगल असतं. शनिवारच्या दिवशी चप्पल किंवा शूज चोरीला गेल्यास ते शनी देवाला अर्पण केलं असं मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणावर शनीचा प्रार्दुभाव असेल तर त्यांनी चप्पलचं दान करावं. जर हे शनिवारी केल्यास त्याचं अजून चांगलं फळ मिळतं.
चप्पलांबाबत या गोष्टीही ठेवा लक्षात
- अनेकजणांना घरात आल्यावरही चपला न काढता फिरायची सवय असते. पण हे टाळा. बाहेरून घरी आल्यावर चपला काढा आणि मगच घरात जा.
- घरातील चपला किंवा शूज हे नेहमी व्यवस्थित ठेवावे. हे वैज्ञानिकरित्या आणि ज्योतिषाशास्त्रानुसार चांगलं मानलं जातं.
कधीही कोणाकडून किंवा कोणाला चपला गिफ्ट म्हणून देऊ किंवा घेऊ नये. - तुटलेली चप्पल कधीही वापरू नये. हे तुमच्या पायाच्या आरोग्यासाठीही चांगलं नाही आणि नशिबासाठीही. नेहमी चांगल्या आणि स्वच्छ चपला वापराव्यात
- कधीही इतरांच्या चपला किंवा शूज चुकूनही वापरू नये. रूढींनुसार हे तुमच्या दुर्भाग्यपूर्ण असतं तर विज्ञानानुसार यामुळे त्या व्यक्तीची त्वचेसंबधित समस्या तुम्हालाही होऊ शकते.
- कधीही चपला घालून जेवू नये.
- वास्तूनुसार घरातील चपला किंवा शूज चुकूनही ईशान्य दिशेला ठेऊ नये.