Advertisement

मनोरंजन

म्हणून करिश्मा कपूरने दिला होता ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला होकार

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 15, 2021
म्हणून करिश्मा कपूरने दिला होता दिला तो पागल है चित्रपटाला होकार

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 12 च्या आगामी भागामध्ये सांगितिक मेजवानी, मनोरंजन आणि प्रतिभा दिसून येणार आहे. सध्या हा शो ग्रॅंड फिनालेच्या दिशेने घोडदौड करत आहे. प्रचंड ग्लॅमरसोबत या शो मध्ये करिश्मा कपूर स्पेशल हा भाग साजरा केला जाईल. निवेदक आदित्य नारायण हा परीक्षक अनु मलिक, सोनू कक्कर आणि हिमेश रेशमियासोबत 6 स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेणार आहेत. त्यात लोलोच्या प्रसिद्ध चित्रपटांची झलक दिसेल. याचवेळी करिश्मा कपूरने आपण दिल तो पागल है हा चित्रपट करणार नव्हतो असं सांगून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मग नक्की असं काय घडलं की, तिने या चित्रपटाला होकार दिला याची मनोरंजक गोष्टही तिने यावेळी सांगितली आहे. 

कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर

चित्रपटाला आधी दिला होता नकार

इंडियन आयडॉल 12 च्या सेटवर करिश्माने दिल तो पागल है या प्रसिद्ध चित्रपटामागील कथा उलगडली, ज्यामुळे तिला तिचा निर्णय बदलावा लागला.“मला दिल तो पागल है मध्ये अभिनयाची ऑफर मिळाली आणि मला आधी वाटले की, ती डान्स फिल्म आहे आणि माधुरी दीक्षितसोबत काम करतेय? माधुरी दीक्षितजींसोबत कोण डान्स करेल, म्हणून अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटाला नकार दिला होता. अखेर, यशजी आणि आदीने मला कथानक सांगितले. नंतर माझी आई मला म्हणाली, तू हे आव्हान स्वीकारले पाहिजे. ती (बबिता) हेदेखील म्हणाली की, तू माधुरी दीक्षितची मोठी चाहती आहेस, त्यामुळे तू हे केलच पाहिजेस. तू खूप मेहनत घे, नक्कीच यशस्वी होशील.” त्यानंतर करिश्माने या चित्रपटासाठी होकार दिला होता. 

करिश्मा कपूर पुढे म्हणाली की, ‘दिल तो पागल है हा तिच्यासाठी खूप स्पेशल चित्रपट आहे. उत्तम अभिनय करणे आणि त्यासाठीचे प्रयत्न या दोन्हींमध्ये शाहरूख खान आणि माधुरी जी हे दोघेही खूप प्रोत्साहन देत होते.” या चित्रपटासाठी करिश्माला अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले होते. तसंच त्यावेळी माधुरी दीक्षितच्या समोर तितक्याच ताकदीने करिश्मा उभी राहिली होती आणि त्यामुळेच तिचे खूप कौतुकही झाले होते. या चित्रपटाने करिश्माच्या करिअरलाही एक कलाटणी मिळाली होती. 

हेमांगी कवीच्या त्या बिनधास्त वक्तव्याला अनेकांनी दिला पाठींबा

करिश्माच्या कामगिरीला उजाळा

या आठवड्यात, टॉप 6 स्पर्धक, करिश्मा कपूरची प्रसिद्ध गाणी सादर करणार आहेत. याद्वारे इंडस्ट्रीतील तिच्या कामगिरीला उजाळा मिळणार आहे. करिश्माचे चित्रपट आजही तितकेच मनोरंजन करणारे ठरतात. अनेक चित्रपटातून काम केलेल्या करिश्माने थ्रिलर, विनोदी, भावनिक अशा सर्व भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आजही करिश्मा पुन्हा कधी चित्रपटात दिसणार असे विचारले जाते. करिश्मा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तर आपल्या दोन्ही मुलांना ती सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. आजही करिश्माचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे तिने पुन्हा एकदा चित्रपटातून कमबॅक करावा असं तिच्या चाहत्यांनाही वाटत आहे. मात्र करिश्मा काही जाहिरातीतून दिसत असली तरीही आता सध्या कोणताही नवा प्रोजेक्ट करत नाही. त्यामुळे चाहत्यांना त्यासाठी नक्कीच वाट पाहावी लागेल.

हंगामा 2′ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक