बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा फारच आदर्श अभिनेता असल्याचे अनेकांना माहीत आहे. कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सी काहीही न बोलणे तो पसंत करतो. चित्रपटात अधिकाधिक काम करत या वयातही वर्षाला चारहून अधिक चित्रपट करणारा अक्षय कुमार सेलिब्रिटींच्या कोणत्याही नाईट पार्टीत दिसत नाही. त्याच्या तरुणपणात त्याने अनेक अॅवॉर्ड शोज केले असले तरी काही काळानंतर त्याने मात्र या पार्टीत जाणे बंद केले आहे. त्याला अनेकदा अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. त्यावेळी त्याने सकाळी उठण्याच्या सवयीबद्दल सांगितले आहे. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का की अक्षय कुमार सेलिब्रिटी पार्टीत जात नाही.चला जाणून घेऊया कारण
बालिका वधू फेम ‘अविका’च्या आयुष्यात आला तिच्या स्वप्नांचा राजकुमार
अक्षय कुमारने दिले हे कारण
अक्षय कुमारला अनेकांनी शोजमध्ये हा प्रश्न विचारला आहे. कोणत्याही शूटिंगसाठी अक्षय पहाटे जाणं पसंत करतो. पण तो कोणत्याही शोसाठी रात्री जाण्याची तयारी अजिबात दाखवत नाही. अक्षय कुमार आपल्या आरोग्याची फारच काळजी घेतो. पन्नाशी पार होऊन अजूनही तो स्वत:चे स्टंट स्वत:च करतो. त्यामुळे त्याला त्याच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायची असते. त्यामुळे संध्याकाळी लवकर जेवून तो लवकर झोपतो.आरोग्याची उत्तम काळजी घेण्यासाठीच तो कोणत्याही लेट नाईट कार्यक्रमांना तो जात नाही. हे झाले एक कारण पण अक्षय कुमारने यामागचे आणखी एक कारण फार पूर्वी सांगितले होते. ते तुम्हाला माहीत आहे का?
Bigg Boss 14: शार्दुल पंडित खेळातून बाहेर, रुबिनाला वोटिंगमध्ये दिली टक्कर
अक्षय कुमार न जाण्यामागे हे आहे खरे कारण
अक्षय कुमार काही वर्षांपूर्वी रात्रीचे अवॉर्ड आणि पार्टीच करायचा. पण एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याला डान्स परफॉर्मन्स करण्यास सांगितले आणि त्याऐवजी त्याला पुरस्कार दिला जाईल असे सांगितले. पुरस्कार इतका स्वस्त आणि अशा गोष्टींमुळे मिळू शकतो हे कळल्यानंतर त्याने अशा शोजना जाणे सोडून दिले. अक्षय कुमारला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या आधी त्याने स्टेजवर अनेक परफॉर्मन्सही दिले आहेत. पण त्या एका घटनेनंतर त्याने अशा ठिकाणी जाणे पूर्णपणे सोडून दिले आहे.
पहाटेच करतो शूट सुरु
अक्षय कुमारला रात्री काम करायला मुळीच आवडत नाही.तो त्याच्या चित्रपटाचे कोणतेही शूट रात्री उशिराचे ठेवत नाही. त्याचे सगळे काम हे पहाटेच सुरु होते. त्यामुळे अनेक सहकालांकारांनाही सकाळीच यावे लागते. त्याच्यसोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांना अक्षय कुमारसोबत काम करायला आवडत असले तरीदेखील त्यांना सकाळीच या कामांना हजर राहावे लागते. त्यामुळे अक्षय कुमारच्या कोणत्याही कार्यक्रमाचे शूटिंग हे सकाळीच असते किंवा दिवस संपायच्या आत सुरु होते. पण एक नक्की की, त्याच्या याच सवयीमुळे त्याची काम वेळच्या वेळी पूर्ण होतात. आणि इतर कलाकारांच्या तुलनेत तो जास्त काम करतो.
नुकताच अक्षय कुमार साऊथचा हिंदी रिमेक असलेल्या लक्ष्मीमध्ये दिसला होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. पण अवघ्या काहीच तासात हा चित्रपट लाखो लोकांनी पाहिला.
कंगना रणौतने घातलेला हा लेहंगा बनवायला लागले 14 महिने