ADVERTISEMENT
home / मनोरंजन
त्या दिवसापासून बप्पी लहिरींनी सोनं घालायला केली सुरुवात.. जाणून घ्या कारण

त्या दिवसापासून बप्पी लहिरींनी सोनं घालायला केली सुरुवात.. जाणून घ्या कारण

इंडस्ट्रीमध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहतात. त्यापैकीच एक आहेत बप्पी लहिरी. त्यांच्या गाण्यासोबतच त्यांच्याविषयी काही लक्षात राहात असेल तर त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं. महिलांना असलेलं सोन्याचं वेड एखाद्यावेळी समजू शकतं. कारण तो महिलांचा अधिकार आहे. पण बप्पी लहिरींना सोन्याचे दागिने घातलेले पाहिले की, या कलाकाराला सोन्याचे भयंकर वेड आहे असेच म्हणावेसे वाटते. आज गायक,संगीतकार बप्पी लहिरींचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत की बप्पीदांनी सोनं घालायला नेमकी सुरुवात कधी केली आणि त्या मागे नेमकं कारण तरी काय आहे

म्हणून बप्पी लहरी घालतात सोने

Instagram

आता प्रत्येक मोठा कलाकार दुसऱ्या कलाकाराचा चाहता असतो. बप्पी लहिरी अमेरिकन गायक इलविस प्रेसलीचे फॅन होते. किंग ऑफ रॉक अँड रोल म्हणून त्यांची ओळख होती. ते सोन्याचे दागिने घालायचे. प्रेसली यांनी घातलेले दागिने बप्पीजींना आवडत होते.म्हणूनच जेव्हा ते गायक म्हणून आले. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि प्रेसलीवरील आपले प्रेम दाखवण्यासाठी गळ्यात दागिने घालायला सुरुवात केली आणि ती आवड ते अत्यंत आवडीने जपत आहे. एका मुलाखती दरम्यान बप्पीजींनी ही आठवण सांगत सोनं मला लकी असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

ADVERTISEMENT

अजयची भेट झाली नसती तर शाहरूखसोबत लग्न….

बप्पीदांकडे आहे सोनचं सोनं

Instagram

आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की, बप्पी लहरींकडे सोनं आहे तरी किती?  हाती आलेल्या महितीनुसार बप्पी लहरी यांच्याकडे 30 लाख रुपये किमतीचे सोनं आहे आणि साधारण 2 लाख रुपयांची चांदी आहे. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीला ते उभे राहिले होते त्यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती सादर केली होती. त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि  4.62 किलो सोनं आहे. ( हा आकडा आता नक्कीच वाढलेला असेल बप्पी लहरींनाच नाही तर त्यांच्या पत्नीलाही सोन्याची भयंकर आवड आहे. त्यांच्याकडेही सोनं आहे. पण त्याची नोंद सध्या कुठेही नाही. सोन्यासोबतच त्यांच्याकडे 4 लाखांचे हिरे आहेत. 2014 मध्ये त्यांच्याकडे एकूण 20 कोटींची संपत्ती होती. आता ती वाढलेली आहे. 

ADVERTISEMENT

अभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत

मायकल जॅक्सनलाही बप्पीदांचे वेड

Instagram

एक काळ असा होता की, मायकल जॅक्सन संगीत क्षेत्रातला सर्वेसर्वा होता. त्याची गाणी, त्याचा डान्स आणि लाईव्ह परफॉर्मन्स सगळ्यांना घायाळ करायचा. या मायकल जॅक्सनला मात्र बप्पी लहरी फारच आवडायचे. तो त्यांच्या संगीताचा फॅन होता. त्यांची अनेक गाणी मायकल जॅक्सनला आवडायची

ADVERTISEMENT

70 च्या दशकात कामाला केली सुरुवात

बप्पींनी त्यांचा संगीत प्रवास साधारण 70 च्या दशकात सुरु केला. साधारण 80 पर्यंत त्यांचा प्रवास छान सुरु होता. पण त्यानंतर त्यांची गाणी सो- सो चालत होती. पण ‘डर्टी पिक्चर’ मधील उलाला गाण्याने त्यांच्या करीअरला असे काही वर नेऊन ठेवले की, पुन्हा एकदा त्यांचे नाव पुढे आले. त्यांनी गायलेली बंबई से आया मेरा दोस्त, आय एम अ डिस्को डान्सर, यार बिना चैन कहाँ रे, तम्मा तम्मा लोहे ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहे. 

अशा या सोने प्रेमी बप्पी लहिरींना  #popxomarathi कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

27 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT