ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
या कारणामुळे ‘दबंग 3’ चा ट्रेलर घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

या कारणामुळे ‘दबंग 3’ चा ट्रेलर घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

‘स्वागत नही करोगे हमारा’ असे म्हणत सलमान खानच्या दबंगचा सिक्वल असलेला ‘दबंग 3’ चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला आणि हा हा म्हणता म्हणता त्याचे व्ह्यूज कोटींच्या घरात पोहोचले. सलमानच्या चाहत्यांची संख्या जगभरातून काही कमी नाही. पण हा ट्रेलरच इतका खास आहे की, त्यामुळेच सध्या दबंग 3 चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  तुम्ही गुगलवर येऊन नुसतं DA जरी क्लिक केलं तरी तुम्हाला दबंग 3 ट्रेलर असाच सर्च समोर येताना दिसेल. 

हा तर प्रीक्वल?

आतापर्यंत दबंगचे दोन भाग येऊन गेले आहेत. पहिल्या भागाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर सलमान खानने दुसरा भाग काढला आणि आता हा तिसरा भाग घेऊन सलमान सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पहिल्या काही सेकंदासाठी गोष्ट काही वेगळी असेल असे वाटते. पण दबंग 3 हा चित्रपट परत मागे जाणारा असणार आहे. कारण यात सलमानचाच एक डायलॉग आहे तो म्हणजे ‘कोई दबंग पैदा नही होता. उसके पिछेही एक कहानी होती है’ त्यामुळे चित्रपटात रज्जोची कहाणी आहे असे वाटते. यामध्ये सई मांजरेकर सोनाक्षीच्या रज्जो अवतारात दिसत आहे. त्यामुळे ती सोनाक्षीच्या तरुणपणातील भूमिका करत असल्याचा अंदाज आहे. 

काय आहे ट्रेलरमध्ये ?

ट्रेलरची सुरवात सलमानच्या दमदार एन्ट्रीने होते. आता सलमान खाकी वेषातील गुंडा आहे हे आपल्याला पहिल्याच भागात कळले आहे. पण हा गुंडा समाजोपयोगी काम करतो. ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा दिसते आणि त्यानंतर या चित्रपटाची कहाणी भूतकाळाचा वेध घेते असे लक्षात येते. कारण सई मांजरेकर सोनाक्षीसारख्या वेषात दिसते. इतकंच नाही. यावेळी ही कथा खासगी भांडणाची आहे. सोनाक्षीवर एकतर्फी प्रेम करणारा व्हिलन या भागात दिसणार आहे. त्याच्याशी चाललेली लढाई या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे ट्रेलर पाहिल्यानंतर काही अंशी निराशाच होताना दिसते. 

कलाकारांनी सेटवरच साजरी केली दिवाळी फराळ पार्टी

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर ट्रेलरची धूम

आता सलमान खानचा चित्रपट म्हटल्यावर तो खासच असणार यात काहीही शंका नाही. सलमान हल्ली वर्षातून एक किंवा दोनच चित्रपट करतो.त्यामुळे तो घेऊन येणारा चित्रपट खास असणार याची खात्री लोकांना असते. पण ‘किक’ या चित्रपटाच्यावेळीही लोकांना खूप अपेक्षा होती.ती अपेक्षा सलमान पूर्ण करु शकला नव्हता. मात्र चित्रपटाने दमदार कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपटही कमाई करेल यात काही शंका नाही. शिवाय चुलबुल पांडेचा कॉमेडी अंदाज या चित्रपटात पाहायाला मिळतोय तोही लोकांना आवडणारा असेल हे नक्की! 

रश्मी देसाई सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

प्रभुदेवाचे दिग्दर्शन

Instagram

ADVERTISEMENT

दबंग 3 चे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. सलमानसोबत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे या भागाचे दिग्दर्शनही प्रभुदेवाने केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा काहीही असली तरी प्रभुदेवाच्या दिग्दर्शनामुळे हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी एक मेजवानी असणार आहे. 

आता जर तुम्ही दबंग 3 चा ट्रेलर पाहिला नसेल तर तो आताच पाहा आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कळवा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

23 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT