ADVERTISEMENT
home / आरोग्य
reasons why eyes look older than age

डोळ्यांमुळे दिसत असेल वाढलेले वय तर आहेत ही कारणे

वाढते वय कोणालाच आवडत नाही. पण वय वाढू लागल्यानंतर त्याचे पडसाद आपल्या डोळ्यांच्या आसपास उमटू लागतात. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणे, आयबॅग्ज, सुरकुत्या, ओढलेले डोळे हे सर्व दिसू लागते. वास्तविक सुरकुत्या येणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे आणि हे थांबवणं असंही शक्य नाही. पण याशिवाय काही अशी लक्षणे असतात ज्यामुळे वाढलेले वय डोळ्यांमुळे पटकन दिसून येते. याची नक्की कारणे काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवे. अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला डोळ्यांना त्रास होऊन तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागता जाणून घ्या. 

सतत सूर्याच्या संपर्कात राहणे 

uv rays
Shutterstock – UV rays

सूर्याची युव्ही किरणे त्वचेसंबंधी अनेक समस्यांचे कारण ठरते. यामध्ये पिगमेंटेशन आणि मेलोनोमा यांचा समावेश आहे. काही विशेषतज्ज्ञांच्या मते, सूर्याची किरणे ही वय वाढीव दिसण्यासाठी सर्वात मोठे कारण आहे. सुरक्षेसाठी कोणत्याही गॉगल अथवा सनस्क्रिनचा वापर केल्याशिवाय उन्हात बाहेर निघणे हे अत्यंत वाईट आहे. यामुळेच डोळ्यांखाली काळे डाग येण्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागता. आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. कारण डोळे हा अवयव अत्यंत नाजूक आहे. 

जास्त एक्सफोलिएट करणे 

आपल्या त्वचा एक्सफोलिएट करणे आवडते कारण आपल्याला त्वचा अधिक चमकदार आणि अधिक मऊ मुलायम हवी असते. पण डोळ्यांच्या आजूबाजूला एक्सफोलिएशन करणे तुम्हाला महाग ठरू शकते. या भागात तुम्ही अधिक एक्सफोलिएशन करणे योग्य नाही. यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा ही अत्यंत संवेदनशील असते आणि त्याखालील रक्त्तवाहिन्यांनी पटकन हानी पोहचू शकते. तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी नेहमी डोळ्यांच्या आजूबाजूचा परिसर टाळा. अन्यथा तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागता. 

डोळे चोळण्याची सवय असणे 

डोळे चोळण्याची सवय – Freepik

काही जणांना डोळे चोळण्याची सवय असते. तर कधी कधी धूळ, मातीचे कण अचानक डोळ्यात गेल्याने आपण जोरात डोळे चोळतो. पण तुम्ही अधिक वेळ डोळे रगडले तर त्याचा तुमच्या डोळ्यांखालच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांखाली काळे डाग निर्माण होतात. कोणाच्याही डोळ्यांची जळजळ होत असेल तर ती दूर करण्यसाठी डोळे रगडण्यापेक्षा डोळे थंड पाण्याने व्यवस्थित धुवा आणि गुलाबपाण्याचा वापर करा. अथवा तुम्ही डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाण्यासाठी आयड्रॉपचा वापर करा. यामुळे डोळ्यांना लवकर सुरकुत्या येणार नाहीत आणि तुमचे वयही लवकर दिसणार नाही. 

ADVERTISEMENT

अनुवंशिकता 

ज्या वेगाने वय वाढते, त्यामध्ये अनुवंशिकता जास्त प्रमाणात असते. तुमच्या आई – वडील आणि आजी आजोबांना जर सुरकुत्या आणि काळ्या वर्तुळांची समस्या जेव्हा तुम्हाला त्रासदायक ठरते तेव्हा तुमच्यामध्येदेखील ही समस्या निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे हे समजून जावे. तुम्ही याची अधिक काळजी घेतली तर या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळते.

मेकअपमुळे त्वचेमध्ये जळजळ

make up
मेकअप – Freepik

एक्सपायर्ड झालेले मेकअपचे उत्पादन तुम्ही वापरल्यास, त्वचेची जळजळ होते. तसंच तुम्ही नेहमीच मेकअप झोपण्यापूर्वी व्यवस्थित डोळ्यांखालून काढून घ्यायला हवा. असे न केल्यास, त्वचा कोरडी होते आणि एजिंग लाईन्स दिसतात. त्वचेवरील मेकअप जास्त वेळ ठेवल्यास, पोर्स बंद होतात. त्वचेची काळजी व्यवस्थित घ्यायला हवी. अति मेकअप केल्यास, कोलेजन तुटते आणि तुमच्या डोळ्यांखाली सुरकुत्या दिसून येतात. 

झोपेची कमतरता 

प्रत्येक माणसाला किमान आठ तास झोपेची आवश्यकता असते. आपली झोप पूर्ण न झाल्यास, त्याचा सर्वात पहिला परिणाम होतो तो म्हणजे डोळ्यांवर. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळे सुजतात आणि त्याखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. झोपेची कमतरता असेल तर आपल्या डोळ्यांखाली असलेल्या वाहिन्या या पसरतात आणि त्याचे एक जाळे तयार होते आणि त्यामुळे सुरकुत्या अधिक वाढतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित झोप रोज घ्यायलाच हवी. काळ्या वर्तुळांशिवाय, अपुरी झोप ही डोळ्यांखाली बॅग्ज विकसित करण्यास कारणीभूत ठरते. हे सामान्य नसून त्रासदायक ठरते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT