ADVERTISEMENT
home / Care
केस पातळ होण्यामागे असू शकतात ही देखील काही कारणं

केस पातळ होण्यामागे असू शकतात ही देखील काही कारणं

‘केस’ हा दागिन्यांपेक्षाही प्रत्येक महिलेसाठी फार महत्वाचा आहे. एखाद्यावेळी गळ्यात दागिने नसले तरी चालतील पण डोक्यावर घनदाट केस असावे असे प्रत्येक महिलेला वाटते ( पुरुषांच्या बाबतीतही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.)  पण केसांची वाढ ही सर्वस्वी अनुवंशिकता, केसांची निगा, वय या अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. पण कधीकधी काहीजणांचे चांगले जाडजूड असलेले केस पातळ कधी होतात ते कळत नाही. अचानक केसांचा झुपका केसांच्या शेपटीमध्ये कधी बदलतो हे देखील अनेकांना कळत नाही.  पण केस पातळ होण्यामागेही काही कारणं आहेत त्यापैकी तुमचे केस या कारणांमुळे तर पातळ झाले नाहीत ना हे तपासून तुम्ही योग्य तो इलाज करु शकता.

केस पातळ होण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

केस पातळ होण्याची ही आहेत कारणं

पातळ केस

Instagram

ADVERTISEMENT
  • केस बांधण्याची पद्धत केसांसाठी फारच हानीकारक ठरु शकते. काही जणांना केस ओढून किंवा ताण देऊन किंवा घट्ट बांधतात . केस घट्ट बांधताना कपाळावरील आणि  मानेजवळील भागाचे केस ताणू लागतात. शिवाय असे करताना केस तुटतात देखील. केसांना तुम्ही मोकळे केले नाही तर केसांचे तुटणे असेच वाढत राहते.कालांतराने केस काह ठराविक भागी टक्कल पडल्यासारखे दिसू लागतात. 
  • जर तुम्ही तुमचे केस सतत विंचरत असाल तर आणि केसांना ओढून ताण देऊन विंचरत असाल तर केस मुळापासून दुखावले जातात. केसांची मुळ दुखावली गेली की,केसांच्या मुळांमध्ये पुन्हा केस येत नाही. अर्थात त्या भागात टक्कल पडू लागते. तुम्ही वेळीच केसांना विंचरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. 
  • केसांमध्ये झालेला कोंडा हा केस पातळ होण्यासाठी कारणीभूत असतो. कोंडा हा केसांमध्ये असलेल्या पोअर्समध्ये जाऊन बसतो. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या केसांच्या मुळांना कमजोर करते आणि त्यामुळे तेथे केसांची वाढ होत नाही. जर कोंड्याकडे दुर्लक्ष केले तर कालांतराने तुमचे केस पातळ होतात. 
  • केसांच्या सतत ट्रिटमेंट्सही तुमच केस पातळ करु शकतात. केसांवर जर सतत चुकीच्या केमिकल्सचा प्रयोग होत असेल तरीदेखील तुमचे केस गळू शकतात.केसांची गळती थांबली नाही की, केसांची पुन्हा वाढ होणेही थांबते. त्यामुळे कालांतराने केस पातळ होऊ लागतात. 
  • केसांना तेल लावण्याची सवय चांगली असली तरी देखील केसांना सतत तेल लावल्यामुळे केसांच्या स्काल्पवर तेलाचा थर राहिला तर केस वाढण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळेच केस पातळ होऊ लागतात. 
  • केस धुण्याची सवय ही चांगली आहे. पण केस धुण्याची तुमची रोजची सवयही तुमच्या केसांना कमजोर करु शकते. त्यामुळे केस आठवड्यातून जास्तीत जास्त दोनवेळा धुवा. केस धुताना केसा खसाखस घासू नका. केस अगदी हलक्या हाताने धुवा. केस धुतल्यानंतर ते काळजीपूर्वक पुसा. कारण  जर तुम्ही केस  कसेतरी पुसले तरी देखील केस दुखावण्याची शक्यता असते. 

आता तुमचेही केस पातळ होत असतील तर त्यामागे ही कारणेही असू शकतात. 

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

केसांसोबत त्वचेची काळजी घ्या MyGlamm च्या बेस्ट प्रॉडक्टसनी… 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

ADVERTISEMENT
01 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT