पिरेड्स दर महिन्याला येतात. या पिरेड्सवर महिलांचे आरोग्य अवलंबून आहे. जर तुमचे पिरेड्स सुरळीत असतील तर तुम्हाला सहसा कोणता त्रास होत नाही. पण जर तुमचे पिरेड्स मागे पुढे येत असतील. तुमच्या पिरेड्सच्या तारखा सतत चुकत असतील तर मग तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. तुमचे पिरेड्स का चुकतात हे तुम्हाला माहीत आहे का? पिरेड्स चुकण्यामागील कारणं आणि त्यावर काय घरगुती उपाय करता येतील ते आपण आज पाहुयात.
पिरेड्स अनियमित होण्याचा किंवा चुकण्याचा त्रास तुम्हाला असेल तर त्यामागे काही कारणं सुद्धा असतात. तुम्हाला हा त्रास होत असल्यास त्यामागे ही काही कारणं हमखास असू शकतात. जाणून घेऊया. पिरेड्स अनियमित किंवा चुकण्याची कारणं
shutterstock
पिरेड्स चुकण्याचे मुख्य कारण आहे तो म्हणजे ताण. हल्लीचे लाईफस्टाईल इतके बदललेले आहे की, महिलांच्या कामाच्या वेळाही बदलल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यामुळे हा ताण महिलांना येत असतो. कामाच्या ओघात किंवा करीअर घडवण्याच्या तणावाखाली महिला किती ताण घेतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. नोकरदार महिलाच नाही तर गृहिणीसुद्धा कामाचा अतिरिक्त ताण घेतात. घराचे गणित सांभाळताना तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त काम करत असाल तर तुमच्यावर ताण येणारच. याचा थेट परीणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. याचा परीणाम तुमच्या पिरेड्सवरदेखील होतो. तुमच्या पिरेड्सच्या तारखा सतत बदलत राहतात. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर पिरेड्स येतही नाही. किंवा तुम्हाला त्या दरम्यान त्रासही होऊ लागतो.
म्हणजे तुमचे पिरेड्स आलेत जवळ, जाणून घ्या पिरेड्सची लक्षणं
Shutterstock
तुमचे वाढलेले वजनही तुमच्या पिरेड्स उशीरा येण्यामागचे कारण असू शकते. वजन वाढताना तुमच्या शरीरात फॅट वाढते. याचा परीणाम थेट तुमच्या पिरेड्सवर होतो. त्यामुळे जर तुमचे वजन वाढले असेल तर तुम्हाला ही तक्रार जाणवणे अगदी रास्त आहे. जर गेल्या काही महिन्यांपासून तुमचे वजन वाढलेले असेल तर तुम्हाला तुमचे पिरेड्स मागे पुढे होताना दिसतील. म्हणजे एखाद्या महिन्यात तुमचे पिरेड्स लवकर येतील एखाद्या महिन्यात तुमचे पिरेड्स पुढे जातील. त्यामुळे प्रत्येकवेळी पिरेड्स येताना तुम्हाला अगदी हमखास त्रास होईल.
Shutterstock
आता वजन वाढल्याने जसा तुम्हाला पिरेड्स चुकण्याचा त्रास होऊ शकतो. अगदी तसाच त्रात तुम्हाला वजन कमी झाल्यामुळे होऊ शकतो. तुमच्या शरीराची एक रचना असते. तुमच्या उंचीनुसार आणि वयानुसार तुमचे वजन असणे आवश्यक असते. त्याचे एक परिमाणच असते. आजच्या काळात बारीक दिसण्याचे फॅड अनेकांना असते. पण बारीक दिसण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वजन कमी करण्याची गरज नाही. जर तुम्ही अतिरिक्त वजन कमी केले तर त्याचा थेट परीणाम तुमच्या पिरेड्सवर होऊ शकतो. तुमच्या शरीरारातील हॉर्मोन्स बदलामुळे तुमचे पिरेड्स पुढे जाऊ शकतात किंवा ते आधीच येऊ शकतात. वजन कमी झाल्यामुळे तुमच्या पिरेड्सच्या फ्लोवरही त्याचा परीणाम होऊ शकतो.
तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?
Shutterstock
काही ठराविक वयामध्ये हार्मोन्स बदलाचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. महिलांमध्ये हार्मोन्स बदल पटकन जाणवून येतात. जर तुमच्यामध्ये सतत हार्मोन्स बदल जाणवत असतील तर मग त्याचा परीणाम तुमच्या पिरेड्सवर होणारच. जर तुमच्या पिरेड्सच्या तारखा सतत चुकत असतील तर तुम्हाला कदाचित हार्मोन्सबदलाचा त्रास असू शकतो. हार्मोन्स बदलाचे ठराविक असे वय नसते. तुम्हाला याचा त्रास पौंगडावस्थेनंतर कधीही जाणवू शकतो.
Shutterstock
जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत असाल. चांगलं काही वाचत असाल तर तुम्ही pcos आणि Pcod बद्दलही अगदी हमखास ऐकले असेल. आता PCOS म्हणजे Polycystic ovary syndrome याबद्दल अधिक सांगायचे झाले. तर तारुण्यात हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. महिलांना हा त्रास त्यांच्या आई होण्याच्या वयात होऊ शकतो. या त्रासामध्ये महिलांच्या शरीरातील मेल हार्मोन्स वाढते त्याचा परीणाम पिरेड्सवर होतो. तर PCOD हा त्यापेक्षा अधिक त्रासदायक असून यामध्ये फायब्रॉईडच्या गाठी होतात. यामध्ये हार्मोन्स इतके वाढतात की, त्याचा थेट परीणाम तुमच्या मासिक पाळीवर होतो. या व्यतिरिक्त याचा मोठा तोटा म्हणजे तुम्ही जर आई होण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला PCOD च्या त्रासामुळे गर्भधारणा होत नाही.
shutterstock
तुम्ही काही कारणास्तव औषधांचे सेवन करत असाल तर त्याचा थेट परीणाही तुमच्या आरोग्यावर होतो. अनेकांना काही गंभीर आजारांसाठी गोळ्या दिल्या जातात.या गोळ्या त्यांच्यामध्ये हार्मोनल बदल घडवून आणतात. या औषधांमुळेही तुमच्या मासिक पाळीवर परीणाम होऊ शकतो. काहींना औषधांच्या सेवनानंतर पिरेड्स येताना अडचणी येतात. तर काहींना लवकर मासिक पाळी येते. काहींचा फ्लो अति होतो. तर काहींना अजिबातच फ्लो होत नाही.
PCOD म्हणजे काय? (What is PCOD in Marathi)
Shutterstock
व्यायाम हा शरीरासाठी नक्कीच चांगला आहे. पण तो किती करावा हे देखील कळायला हवे. तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त 1 तास व्यायाम करणे अपेक्षित आहे. पण जर तुम्ही चांगलं दिसण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी अतिरिक्त व्यायाम करत असाल तर तुम्ही हे करणे आताच थांबवा. कारण महिलांना अति व्यायाम करणे त्रासदायक ठरु शकते. अतिरिक्त व्यायामुळे तुमच्या शरीरात सतत बदल होत राहतात.त्याचा परीणाम तुमच्या पिरेड्सवर होऊ शकतो.
Shutterstock
तुमच्या झोपण्याच्या वेळांवर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जर तुमची झोप अपुरी असेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. झोपण्याच्या चुकीच्या वेळा, अपुरी झोप यामुळे तुमचे हार्मोन्स बदलतात. तुमच्यावर अतिरिक्त ताण येऊ लागतो. आणि त्याचा परीणाम तुमच्या पिरेड्सवर होऊ लागतो.
Shutterstock
महिलांना ठराविक वयानंतर होणारा त्रास म्हणजे थायरॉईडचा त्रास होतो. आता हा त्रास सगळ्यांनाच होतो असे नाही.पण जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला पिरेड्सचा त्रास हमखास होऊ शकतो. थायरॉईडमध्ये पिरेड्ससंदर्भात अनेक वेगळे त्रास होऊ शकतात. म्हणजे तुमची मासिक पाळी लवकर येऊ शकते किंवा ती काही महिन्यांसाठी चुकू शकते. मासिक पाळी आल्यानंतर फ्लोमध्ये फरक पडू शकतो. तुमचा फ्लो जास्त, कमी होऊ शकतो.
वाचा – तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही
Shutterstock
मोनोपॉझमध्येही तुमच्या मासिक पाळीवर परीणाम होत असतो. तुमच्या शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोस्टोजन हे हार्मोन्स कमी जास्त होत असतात. पेरिमोनोपॉझमुळेही तुमच्या हार्मोन्सवर परीणाम होत असतात. त्यामुळेही तुमचे पिरेड्स चुकण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे जर तुम्हाला जर असा त्रास असेल तर मग तुम्ही योग्य ती काळजी घ्या.
तुमचे अनियमित पिरेड्स सुरळीत करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय ही करु शकता हे घरगुती उपाय कोणते ते आता पाहूया.
shutterstock
उत्तम त्वचेसाठी तुम्हाला व्हिटॅमिन C घेण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन C ला अॅसकॉर्बिक अॅसिड असे देखील म्हणतात. संत्र, लिंबू, मोसंबी यांसारखी फळ तुम्हाला अॅसकॉर्बिक अॅसिड देतात. तुमच्या शरीरातील इस्ट्रोजनची पातळी यामुळे वाढते आणि प्रोस्टोजनची मात्रा कमी करते. त्यामुळे तुमचे पिरेड्स सुरळीत होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन C चे नियमित सेवन करायला हवे.
shutterstock
अनियमित पिरेड्समुळे अनेक महिलांना खूप त्रास होतात. म्हणजे पोटात सतत दुखत राहणे. काहीही करु नये असे वाटणे वगैरे. जर तुम्हाला अननसाचे सेवन करता आले तर फारच उत्तम कारण अननसामध्ये असलेले ब्रोमेलेन आणि इन्झाईम्स तुमच्या एस्ट्रोजनवर परीणाम करतात. त्यामुळे तुमचे पिरेड्स सुरळीत होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या फळांमध्ये अननसाचा समावेश नक्की असू द्या.
shutterstock
पिरेड्स दरम्यान अनेकांचा फ्लो हा सुरळीत नसतो. अनियमित पिरेड्समुळे अनेकदा फ्लोवरही त्याचा परीणाम होतो. अॅपल सायडर व्हिनेगर हे ब्लड थीनर असून तुमचा फ्लो योग्य करण्यास ते मदत करते. या शिवाय तुमची त्वचाही अॅपल सायडर व्हिनेगरमुळे चांगली होते. त्यामुळे दररोज सकाळी उठून कोमट पाण्यात तुम्ही साधारण चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर प्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
shutterstock
पिरेड्स सुरळीत करण्यासाठी आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आलं हे उष्ण असतं. त्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतात. पिरेड्सचा फ्लो सुरळीत करण्यासोबतच तुमच्या पिरेड्ससाठी आवश्यक असलेले घटक त्यामुळे वाढण्यास मदत होते. तुम्ही आल्याचा चहा पित असाल तर फारच उत्तम. या शिवाय तुम्ही लेमन जिंजर टी किंवा असे काही नक्कीच करु शकता.
वाचा – आई व्हायचं असेल तर तुम्हाला माहीत हवा Ovulation चा योग्य काळ
shutterstock
होते. तुम्ही आल्याचा चहा पित असाल तर फारच उत्तम. या शिवाय तुम्ही लेमन जिंजर टी किंवा असे काही नक्कीच करु शकता. अतिरिक्त ताण-तणावामुळे तुमचे पिरेड्स अनियमित होऊ शकतात. ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा हा अगदी बेस्ट आहे. दिवसातून किमान 5 मिनिटं काढा आणि योगा करा. तुमच्या शरीराला आलेली मरगळ तर कमी होईल. शिवाय तुम्ही तणावमुक्त व्हाल. याचा फायदा तुम्हाला पिरेड्सदरम्यान फ्लो सुरळीत होण्यासाठीही होऊ शकतो.
shutterstock
पपई गरम असते. त्यामुळे पिरेड्ससाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हणतात पपईचे सेवन केल्यामुळे पिरेड्स लवकर येतात. जर तुमच्या पिरेड्सची तारीख चुकली असेल तर मग तुम्ही हमखास पपई खायला हवी. तुमचे पिरेड्स नियमित होतील.
shutterstock
तुमच्या पिरेड्सचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे दालचिनीचे सेवनन तुम्ही चहातून करु शकता. पिरेड्स दरम्यान तुम्हाला काहीही त्रास होत असेल तर तो त्रास कमी करुन तुमचा फ्लो सुरळीत करण्यास दालचिनी मदत करते.
shutterstock
अॅक्युपंचर हा देखील तुमचे अनियमित पिरेड्स नियमित करु शकतो. पण त्यासाठी तुम्हाला त्याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ते पाँईटस कळले तर तुम्हाला तुमचे पिरेड्स नियमित करता येतील. शिवाय पिरेड्स दरम्यानचा तुमचा फ्लो नियमित होईल.
shutterstock
शरीरासाठी कार्बोदक महत्वाची असतात. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली कार्बोदक मिळाली की, तुम्हाला त्रास होत नाही. पण कार्बोदकांचे सेवन करतानाही तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी, तुम्ही कार्बोदकांचे जास्त सेवन करणेही चांगले नाही. दूध, दही,आईस्क्रिम, भाज्या, सोडा यांमध्ये कार्बोदकं असतात.
shutterstock
कार्बोदकांसोबतच तुमच्या शरीरात फॅट असणे महत्वाचे असते. जर तुम्ही आहारात चीझ किंवा अन्य डेअरी प्रोडक्ट ठेवले तर त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक घटक मिळतात. याचा उपयोग तुम्हाला पिरेड्स सुरळीत होण्यासाठी होऊ शकतो.
तुमचे पिरेड्स जर आठवडाभरासाठी पुढे जात असतील तर ठिक आहे. पण जर त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे पिरेड्स चुकत असतील तर मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. काही जणांना पिरेड्स 15 दिवसांनी पुढेही जातात. पण हे चांगले नाही. साधारण प्रत्येक महिलेची पिरेड्स सायकल ही 28 दिवसांची असते.
काहींना PCOS आणि PCOD चा त्रास असेल तर काहींना पिरेड्स महिना महिना येत नाही. मोनोपॉझच्यावेळी सुद्धा 30 दिवसांहून अधिक काळासाठी पिरेड्स येत नाही. त्यावेळी महिनाभरासाठी पिरेड्स चुकणे ही तक्रार देखील अनेक महिला करतात.
पिरेड्स येण्याआधी प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी जाणवतात. म्हणजे काहींना आठवडाभर आधी पिंपल्स येऊ लागतात. काहींना पोट फुगल्यासारखे वाटू लागते.पाय किंवा कंबर दुखू लागणे, सारखे लघवीला झाल्यासारखे होणे, छाती जड असल्यासारखी वाटणे अशी काही वेगवेगळी लक्षणे पिरेड्स येण्याआधी जाणवतात. जर तुम्हाला अशी काही लक्षणे जाणवत असतील तर तुमचे पिरेड्स जवळ आलेत असे समजावे.
पिरेड्स दरम्यान पोटदुखीचा वेदना त्रास अनेकांना होतो. अनेकांची पोटदुखी असह्य असते. अशावेळी पोटदुखी कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. जर तुम्हाला अशी पोटदुखी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नका. कारण अति गोळ्या घेणे तुमच्या पिरेड्ससाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे गोळ्या घेणे शक्यतो टाळा.
पिरेड्स आल्यानंतर जर तुमचा फ्लो सुरळीत नसेल तर तुम्ही असा दिवसात फ्लो सुरळीत करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात फ्लो सुरळीत करण्यासाठी तुम्हाला कोरा चहा, गरम पाणी, गरम पाण्याचा शेक असे काही करण्यास काहीच हरकत नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहेत. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
You Might Like This:
रजोनिवृत्तीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय